अमरावती : भाजपने उमेदवारांच्या पहिल्या यादीत जिल्ह्यातील दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा करून श्रीगणेशा केला असला, तरी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या नावाची प्रतीक्षा आहे. उमेदवारी न मिळाल्यास कुठल्याही पक्षाचा झेंडा हाती घेण्याची तयारी इच्छुकांनी चालवली आहे. जिल्ह्यातील आठ मतदारसंघांपैकी सर्वच ठिकाणी बंडखोरीची लागण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना जागावाटपावेळी तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यामुळे कार्यकर्ते दुभंगले असले, तरी इच्छुकांची गर्दी कमी झालेली नाही. शिवसेनेचे दोन्ही गट मतदारसंघाचा पुर्वेतिहास सांगून दावा करू लागले आहेत, त्यामुळे जागावाटप अडचणीचे बनले आहे.
हेही वाचा : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेले मताधिक्य भाजपसाठी अडचणीचे!
बडनेरा मतदार संघात आमदार रवी राणा यांच्या विरोधात भाजपच्या तुषार भारतीय यांनी ‘आर-पार’च्या लढाईची घोषणा केली आहे. बडनेरात रवी राणांना महायुतीचा पाठिंबा मिळाल्यास भाजपमधून बंडखोरी अटळ मानली जात आहे. अमरावतीत भाजपमधून माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता हे निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. अमरावतीची जागा महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळण्याचे संकेत आहेत. आमदार सुलभा खोडके यांनी जोमाने प्रचारही सुरू केला आहे. दुसरीकडे, काँग्रेसतर्फे माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्यासह अनेक इच्छूक उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहेत.
दर्यापूरच्या जागेवर शिवसेना शिंदे गटाने दावा केला आहे. पण, भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांनी शिंदे गटाचे अभिजीत अडसूळ यांच्या उमेदवारीला विरोध चालवल्याने पेचप्रसंग उभा ठाकला आहे. हीच स्थिती मेळघाटमध्ये आहे. प्रहार जनशक्ती पक्षातून बाहेर पडलेले आमदार राजकुमार पटेल यावेळी शिंदे गटाकडून निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. पण, भाजपनेही दावा केला आहे. मोर्शीतून अजित पवार गट आग्रही आहे. आमदार देवेंद्र भुयार यांना महायुतीची उमेदवारी हवी आहे, पण भाजपने हट्ट धरला आहे. भाजपचे दोन पदाधिकारी राजीनामा देऊन महाविकास आघाडीची उमेदवारी मागण्यासाठी गेल्याने भाजपमध्ये अस्वस्थता आहे. अचलपूरमधून प्रवीण तायडे यांना उमेदवारी मिळाली, पण काही जुने नेते त्यामुळे नाराज झाले आहेत. तिवसा मतदारसंघात भाजपमध्येच उमेदवारांची स्पर्धा आहे.
हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपचाच दबदबा ?
महाविकास आघाडीत बडनेरा आणि मोर्शी या दोन जागा वगळता इतर ठिकाणी काँग्रेसने प्रबळ दावेदारी केली आहे. पण, इच्छुकांची गर्दी मोठी आहे. एकट्या दर्यापुरातून काँग्रेसतर्फे १५ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. महाविकास आघाडी किंवा महायुतीची उमेदवारी न मिळाल्यास, परिवतर्न महाशक्ती आघाडी, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी अशा पक्षांची दारे असंतुष्टांसाठी खुले होऊ शकतात, असे चित्र आहे.