बिपीन देशपांडे

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात रात्री तीन वाजता बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांच्या मतदारसंघातील दौरा संपवला. भाजप नेत्यांबरोबर स्नेहभोजन घेत तर वेगवेगळया स्वरुपाच्या गर्दीला संबोधित करत मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेली बांधणी जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरू शकेल असे मानले जात आहे.

Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
lokjagar article about issues in maharashtra assembly election
लोकजागर : भीती आणि आमिष!
sunetra pawar dhairyasheel mane on central textile committee
केंद्रीय वस्त्रोद्योग समितीवर धैर्यशील माने, सुनेत्रा पवार
eknath shinde comment ladki bahin yojana daryapur vidhan sabha
मुख्‍यमंत्री म्हणतात, मी शंभरवेळा तुरूंगात जाण्‍यास तयार…कारण…
maharashtra assembly election 2024 religious polarization experiment in solapur city central assembly elections
लक्षवेधी लढत : धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग यशस्वी होणार?
Heritage walk for voting awareness with the help of Municipal Corporation Mumbai print news
मतदानाच्या जनजागृतीसाठी ‘हेरिटेज वॉक’, महापालिकेचा संस्थेच्या मदतीने अनोखा उपक्रम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबादेतील रविवार दौरा – त्यातही विशेषतः रात्री दहानंतरच्या भेटी-गाठी समर्थक आमदारांना बळ देणाऱ्या होत्या. या दौऱ्यात संजय शिरसाठ आणि प्रदीप जैस्वाल हे समर्थक आमदार मुख्यमंत्र्यांची जणू सावली म्हणूनच वावरत होेते. तरुणाईसमोर त्यांनी पोलीस भरतीची घोषणा केली तर शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एक हजार कोटींची घोषणा केली. शहरातील या शक्तीप्रदर्शनात पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांनी अतिउत्साह न दाखवता एक पाऊल मागे राहणेच पसंत केले. त्याच पध्दतीने भाजप नेत्यांनीही उत्साही गर्दीसमोर शिंदे हेच पुढाकार घेतील असे जाणीवपूर्वक घडवून आणले. हेच शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत, असा संदेश जाईल याची काळजी घेताना ते दिसले. प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाठ आणि राजेंद्र जंजाळ यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले. त्यात तरुणाई आणि सैन्य तसेच पोलीस भरतीसाठी येथे असलेला तरूण वर्ग येईल, याची व्यवस्था केली होती. तरूणांनी पोलीस भरतीच्या मागणीचा रेटा लावत जोरदार घोषणाबाजी सुरू केल्यानंतर मात्र मुख्यमंत्र्यांना सात हजार पोलीस पदांच्या भरतीची घोषणा करावी लागली. शिंदे-फडणवीस सरकार ८o हजार पदांची भरती करेल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी एक हजार कोटी देईल, या घोषणाही मुख्यमंत्र्यांनी तरुणाई समोर केल्या. प्रत्येक ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खंबीर पाठबळ असल्याचा वारंवार उल्लेख केला.

हेही वाचा… काँग्रेस नेत्यांकडून पटोलेंच्या तुलनेत पवारांना झुकते माप, पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यातील चित्र, राजकीय वर्तुळात चर्चा

हेही वाचा… कोल्हापूरातील निस्तेज शिवसेनेत चैतन्य जागवण्याचे आदित्य ठाकरे यांच्यासमोर आव्हान

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या दौऱ्यात भाजपचे आमदार अतुल सावे यांच्या निवासस्थानी रात्री अडीचच्या सुमारास केंद्रीय राज्यमंत्रीद्वय रावसाहेब दानवे आणि डॉ. भागवत कराड यांच्यासमवेत स्नेहभोजन घेतले. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी आमदार जैस्वाल यांचे नारळीबागेतील निवासस्थान, आमदार संजय शिरसाठ यांचे कोकणवाडीतील तर पैठणचे आमदार संदिपान भुमरे यांच्या राजीव गांधी क्रीडा संकुलाजवळील संपर्क कार्यालयास भेट देऊन तिघांना पाठबळाचा संदेश दिला. आमदार शिरसाठ यांनीही कार्यालयजवळ तरूणांचे मोठे शक्ती प्रदर्शन केले. मुख्यमंत्र्यांच्या मार्गात स्वागतासाठी लावलेल्या फलकांवर शिरसाठ यांच्या माजी नगरसेवक मुलासह त्यांच्या कन्येचेही छायाचित्र आवर्जून लावण्यात आले होती. मध्यरात्री ३ च्या सुमारास दूध डेअरी चौकातील बाळासाहेब ठाकरे यांच्या शिल्पाकृतीस अभिवादन करून मुख्यमंत्री मुंबईकडे रवाना झाले. तत्पूर्वी टिव्ही सेंटरवरील छत्रपती संभाजी महाराज, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अण्णा भाऊ साठे, भडकल गेटवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, समर्थनगर परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर, क्रांती चौकातील शिवाजी महाराज व कोकणवाडीतील अहिल्यादेवी होळकर या शिल्पकृतींना त्यांनी अभिवादन केले. तर संभाजी महाराज व डॉ. आंबेडकर यांच्या पुतळा परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी प्रत्येकी पाच कोटी देण्याची घोषणा केली.