सुहास सरदेशमुख

आमची विचारधारा हिंदुत्वाचीच असे सांगत महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप, शिवसेना, मनसे या तीन पक्षांबरोबरच आता शिंदे गटातील आमदारही स्वत:चे उमेदवार उतरवतील. त्यामुळे चार पक्षांमध्ये विभागलेले हिंदुत्व विरुद्ध एक एमआयएम असा राजकीय सामना महापालिका निवडणुकीत दिसेल. या नव्या राजकीय पटमांडणीत एमआयएम हा सर्वाधिक जागांवर निवडून येणारा पक्ष असू शकतो असा दावा केला जात आहे.बंडखोरी यशस्वी झाल्यानंतर मतदारसंघात परतलेल्या संजय शिरसाठ यांच्या शक्तिप्रदर्शनात चारचाकी गाड्यांचा ताफा अधिक होता. तर प्रदीप जैस्वाल यांचेही जोरदार स्वागत झाले. या राजकीय  घडामोडीत माजी आमदार किशनचंद तनवाणी हेही काठावर उभे असल्याचे चित्र आहे. अशा पटमांडणीत महापालिका निवडणुकीत भाजप व मित्रपक्षाचा वातावरण निर्मितीमध्ये वरचष्मा असेल असे दिसून येत आहे.

Thane Anti Corruption Bureau arrested senior clerk for demanding two percent to clear dues
लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात

महापालिका निवडणुकीनंतर महापौर आणि सत्ताधारी होण्यासाठी भाजप पुन्हा नवी गटबांधणी करू शकेल, पण नव्या राजकीय पटावर आता हिंदुत्ववादी असल्याचा दावा करणारे चार पक्ष एकमेकांसमोर उभे असू शकतात. संजय शिरसाठ, प्रदीप जैस्वाल हेही त्यांचे समर्थक उमेदवार रिंगणात उतरवतील, तसेच भाजपही आपली शक्ती असणाऱ्या वाॅर्डात अधिक ताकद लावेल. त्यासाठी नामांतरचा मुद्दाही पुन्हा वापरला जाईल. मनसेकडूनही हिंदुत्वाचा झेंडा उंचावत भोंग्याचा विषय चर्चेत आणला होता. त्यांनीही आपले उमेदवार कोठे उतरवता येतील याची जुळवाजुळव सुरू केली आहे. शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यास इच्छुक असणारे तरुण आता आपआपल्या नेत्यांचे समर्थक म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. त्यामुळे ‘ हिंदुत्व’वादाच्या झेंड्याखाली चार पक्ष असे चित्र दिसू लागले आहे. 

औरंगाबाद महापालिकेत शिवसेना २९ , भाजप २२ , एमआयएम २६ , काँग्रेस १० , बीएसपी ५, राष्ट्रवादी ४, डेमोक्रॅटिक अपक्ष १७ असे पक्षीय बलाबल आहे. महापालिकेच्या स्तरावर माजी आमदार किशनचंद तनवाणी स्वत:चा गट असावा असे प्रयत्न करत आले आहेत. या वेळीही त्यांनी शिवसेनेऐवजी स्वतंत्र गट असावा असे त्यांचे प्रयत्न सुरू झाले असून त्यांनी शिंदे गटात सहभागी व्हावे असे सांगणारे फलक शहरभर लावण्यात आले आहेत. दरम्यान बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे म्हणाले,‘ बदललेल्या परिस्थितीमध्ये हिंदुत्ववादी भूमिका घेणारे चार पक्ष मैदानात असू शकतात. पण विभागलेली शक्ती जर एमआयएमला फायदा देणारी असेल तर मतदार पुन्हा शिवसेनेकडेच वळतील.’ दरम्यान हिंदुत्ववादी अशी प्रतिमा निर्माण करणाऱ्या गटात शिंदेगटाची भर पडल्याने आणि सत्तचे पारडेही त्यांच्या बाजूने असल्याने महापालिकेच्या निवडणुकीचा पट आता अधिक किचकट बनण्याची शक्यता आहे. दरम्यान सेनेतील काही पदाधिकारीही आता शिंदे समर्थक आमदारांच्या बाजूने दिसू लागले आहेत. सत्तेची ताकद असणाऱ्या गटात जाण्यासाठी इच्छुकांची संख्याही वाढताना दिसून येत आहे.

Story img Loader