सुहास सरदेशमुख
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आमची विचारधारा हिंदुत्वाचीच असे सांगत महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप, शिवसेना, मनसे या तीन पक्षांबरोबरच आता शिंदे गटातील आमदारही स्वत:चे उमेदवार उतरवतील. त्यामुळे चार पक्षांमध्ये विभागलेले हिंदुत्व विरुद्ध एक एमआयएम असा राजकीय सामना महापालिका निवडणुकीत दिसेल. या नव्या राजकीय पटमांडणीत एमआयएम हा सर्वाधिक जागांवर निवडून येणारा पक्ष असू शकतो असा दावा केला जात आहे.बंडखोरी यशस्वी झाल्यानंतर मतदारसंघात परतलेल्या संजय शिरसाठ यांच्या शक्तिप्रदर्शनात चारचाकी गाड्यांचा ताफा अधिक होता. तर प्रदीप जैस्वाल यांचेही जोरदार स्वागत झाले. या राजकीय घडामोडीत माजी आमदार किशनचंद तनवाणी हेही काठावर उभे असल्याचे चित्र आहे. अशा पटमांडणीत महापालिका निवडणुकीत भाजप व मित्रपक्षाचा वातावरण निर्मितीमध्ये वरचष्मा असेल असे दिसून येत आहे.
महापालिका निवडणुकीनंतर महापौर आणि सत्ताधारी होण्यासाठी भाजप पुन्हा नवी गटबांधणी करू शकेल, पण नव्या राजकीय पटावर आता हिंदुत्ववादी असल्याचा दावा करणारे चार पक्ष एकमेकांसमोर उभे असू शकतात. संजय शिरसाठ, प्रदीप जैस्वाल हेही त्यांचे समर्थक उमेदवार रिंगणात उतरवतील, तसेच भाजपही आपली शक्ती असणाऱ्या वाॅर्डात अधिक ताकद लावेल. त्यासाठी नामांतरचा मुद्दाही पुन्हा वापरला जाईल. मनसेकडूनही हिंदुत्वाचा झेंडा उंचावत भोंग्याचा विषय चर्चेत आणला होता. त्यांनीही आपले उमेदवार कोठे उतरवता येतील याची जुळवाजुळव सुरू केली आहे. शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यास इच्छुक असणारे तरुण आता आपआपल्या नेत्यांचे समर्थक म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. त्यामुळे ‘ हिंदुत्व’वादाच्या झेंड्याखाली चार पक्ष असे चित्र दिसू लागले आहे.
औरंगाबाद महापालिकेत शिवसेना २९ , भाजप २२ , एमआयएम २६ , काँग्रेस १० , बीएसपी ५, राष्ट्रवादी ४, डेमोक्रॅटिक अपक्ष १७ असे पक्षीय बलाबल आहे. महापालिकेच्या स्तरावर माजी आमदार किशनचंद तनवाणी स्वत:चा गट असावा असे प्रयत्न करत आले आहेत. या वेळीही त्यांनी शिवसेनेऐवजी स्वतंत्र गट असावा असे त्यांचे प्रयत्न सुरू झाले असून त्यांनी शिंदे गटात सहभागी व्हावे असे सांगणारे फलक शहरभर लावण्यात आले आहेत. दरम्यान बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे म्हणाले,‘ बदललेल्या परिस्थितीमध्ये हिंदुत्ववादी भूमिका घेणारे चार पक्ष मैदानात असू शकतात. पण विभागलेली शक्ती जर एमआयएमला फायदा देणारी असेल तर मतदार पुन्हा शिवसेनेकडेच वळतील.’ दरम्यान हिंदुत्ववादी अशी प्रतिमा निर्माण करणाऱ्या गटात शिंदेगटाची भर पडल्याने आणि सत्तचे पारडेही त्यांच्या बाजूने असल्याने महापालिकेच्या निवडणुकीचा पट आता अधिक किचकट बनण्याची शक्यता आहे. दरम्यान सेनेतील काही पदाधिकारीही आता शिंदे समर्थक आमदारांच्या बाजूने दिसू लागले आहेत. सत्तेची ताकद असणाऱ्या गटात जाण्यासाठी इच्छुकांची संख्याही वाढताना दिसून येत आहे.