बदलापूर: विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता सप्टेंबर महिन्याच्या मध्यावधीत लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभेसाठी इच्छुकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. आषाढ महिन्यात काही इच्छुकांनी वर्षा सहलींचे आयोजन करून मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न केला होता. आता श्रावणात तीर्थयात्रेच्या माध्यमातून मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. विधानसभेची निवडणूक जाहीर होईल तेव्हा होईल मात्र आता सहल आणि तीर्थयात्रेचा आस्वाद घ्यावा, अशा भूमिकेतून नागरिकही याला मोठा प्रतिसाद देत आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर ठाणे जिल्ह्यात अनेक राजकीय गणिते बदलली. भिवंडी लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव झाला. याचे खापर पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्यावर फोडले. पदवीधर मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीनंतर बदलापूरसारख्या शहरात शिवसेना आणि भाजपात खटके उडाले. त्यानंतर मुरबाड विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा अशी थेट मागणी स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली. बदलापूरचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी त्यासाठी जय्यत तयारी सुरू केली. आषाढ महिन्याचा बेत साधत म्हात्रे यांच्या माध्यमातून बदलापूर शहरातील विविध प्रभागातील नागरिकांना वर्षा सहलीसाठी टप्प्याटप्प्याने नेण्यात आले. दोन वेळचा नाश्ता, शाकाहार – मांसाहारी जेवण आणि यासाठी रिसॉर्ट तसेच शेतघरांची यासाठी निवड केली गेली. यात बदलापुरातील अनेकांनी सहभाग नोंदवला.

tourism mahabaleshwar news in marathi
महाबळेश्वरला २६ ते २८ एप्रिल पर्यटन महोत्सवाचे आयोजन, शंभूराज देसाई यांची माहिती
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Namdev Shastri Maharaj kirtan on Bhandara mountain postponed
पिंपरी : नामदेव महाराज शास्त्री यांचे भंडारा डोंगरावरील कीर्तन रद्द
Chandrahar Patil On Maharashtra Kesari 2025
Chandrahar Patil : ‘गदा’वापसी : “मानाच्या दोन्ही गदा परत करणार”, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची मोठी घोषणा
mahant namdevshastri latest news in marathi
“नामदेव शास्त्रींनी माफी मागावी अन्यथा…”, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा इशारा
Prayagraj Stampede
Mahakumbh Stampede: महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीनंतर पंतप्रधान मोदींचा तीन वेळा योगी आदित्यनाथांना फोन, नेमकी चर्चा काय झाली?
allegations over the post of Guardian Minister of Raigad
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून आरोपप्रत्यारोप
Raigad Guardian minister post , Aditi Tatkare ,
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना – राष्ट्रवादीत खडाखडी 

हेही वाचा : भाजपा-संघामध्ये तब्बल पाच तासांची बैठक; नव्या अध्यक्षाच्या निवडीबरोबरच ‘या’ विषयावर झाली खलबतं

जिल्ह्यात अनेक इच्छुकांनी आषाढ महिन्यात ओल्या पार्ट्या आयोजित केल्या होत्या. त्यानंतर आता श्रावणातल्या पहिल्या मंगळवारपासून मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र दर्शन सुरू आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघातील अंबरनाथ, मुरबाड, कल्याण या तालुक्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद गटनिहाय महिलांना त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी नेले जात आहे. घरापासून बसव्यवस्था, चहापाणी आणि नाश्ता, एक वेळचे जेवण, त्रंबकेश्वर दर्शन, छोटेखानी संवाद कार्यक्रम असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. महिला, त्यातही ज्येष्ठ महिला या तीर्थक्षेत्र दर्शनाचा लाभ घेताना दिसत आहेत. निवडणूकपूर्व या उपक्रमातून मतांची तजवीज केली जात असून विविध माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचे सर्व प्रयत्न सर्वच पक्षातील इच्छुक करताना दिसत आहेत.

हेही वाचा : लोकसभेमध्ये अनुसूचित जातींमधील ‘प्रबळ’ गटांना आहे अधिक प्रतिनिधित्व? काय सांगते आकडेवारी?

लाडकी बहीण आणि आनंदाचा शिधा –

या उपक्रमांसोबतच राज्य सरकारने जाहीर केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, तरुणांची प्रशिक्षण योजना यांची माहिती आणि अर्ज भरून घेण्याची लगबग सुरू आहे. आनंदाचा शिधा, विविध कागदपत्रांची जुळवाजुळव, मतदार नोंदणी उपक्रम या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सत्ताधारी पक्षातील माजी नगरसेवक आणि पदाधिकारी करताना दिसत आहेत.

Story img Loader