सुहास सरदेशमुख

औरंगाबाद : तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात अडकून पडलेल्या जयदत्त क्षीरसागर यांचा राजकीय संभ्रम अजूनही कायम असल्याचे चित्र राजकीय पटलावर दिसून येत आहे. शिवसेनेत जाण्यापूर्वी त्यांना वाटणारे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीचे ममत्व अद्यापि त्यांच्या मनात कायम आहे. किंबहुना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांची शिवसेनेत कुचंबणाच झाली असे सांगणारा त्यांच्या समर्थकांचा मोठा गट बीड जिल्ह्यात आहे. पण असे असतानाही त्यांना भाजपमध्ये अजूनही स्थान मिळाले नाही. शिंदे गटात त्यांचे पारंपरिक राजकीय विरोधक सुरेश नवले गेल्याने त्यांना तिथेही जाणे अवघड झाले आहे. पुतण्या संदीप राष्ट्रवादीत असल्याने पुन्हा स्वगृही जाण्यातही त्यांना अडचणी असल्याने जयदत्त क्षीरसागर हे राजकीय गोंधळलेल्या अवस्थेत दिसून येत आहे.

cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
airoli vidhan sabha marathi news
ऐरोलीतील बंडोबांना शिंदे सेनेचे अभय ?
eknath shinde comment ladki bahin yojana daryapur vidhan sabha
मुख्‍यमंत्री म्हणतात, मी शंभरवेळा तुरूंगात जाण्‍यास तयार…कारण…
tempo hit on Satara road, Woman died Satara road,
सातारा रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू, दाम्पत्य जखमी; अपघातानंतर टेम्पोचालक पसार
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
Paithani web series on Zee 5 OTT entertainment news
आई मुलीच्या नात्याची ‘पैठणी’

हेही वाचा… “सिंगूरमधून टाटांना मी नाही तर…” ‘नॅनो’ प्रकल्पावरुन ममता बॅनर्जींचा विरोधकांवर आरोप

हेही वाचा… अकोल्यात ‘वंचित’ला भाजपची साथ

शिक्षण संस्थांच्या माध्यमातून जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या समर्थकांचे जाळे विणले असून त्यांनी चालवलेल्या सूत गिरणीचा कारभार देशात उत्तम मानला जातो. केंद्र सरकारनेही त्यांच्या कामाचे कौतुक केले होते. राजकीयदृष्टया भाजपमध्ये जाण्यासाठी जयदत्त क्षीरसागर उत्सुक असल्याचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी असतानाच स्पष्ट झाले होते. मात्र, शिवसेना- भाजप युतीमध्ये बीडची जागा शिवसेनेकडे असल्याने जयदत्त क्षीरसागर यांनी शिवबंधन बांधले. पण ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये रमले नाहीत. सेना नेतृत्वावर नाराज असल्याचे संकेत त्यांनी अनेकदा दिले. शिवसेनेकडूनही जयदत्त क्षीरसागर यांना फारसे बळ दिले गेले नाही. भाजप आणि शिंदे गटाची समीकरणे जुळल्यानंतर बीड विधानसभा मतदारसंघ कोण लढविणार हे गुलदस्त्यात आहे. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर हे राजकीयदृष्टया गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

हेही वाचा… शिवसेनेतील भाऊबंदकीचा नंदुरबारमध्ये भाजपला लाभ; नंदुरबार जिल्हा परिषदेत विजयकुमार गावित यांची सत्ता

हेही वाचा… विश्लेषण: पुण्यात अचानक इतका पाऊस का पडला? तब्बल ३३९ टक्के अतिरिक्त पाऊस पडण्यामागे कारण काय?

राजकीय पटलावर संभ्रमाचे वातावरण असले तरी नगरपालिकेत क्षीरसागर कुटुंबियांची सत्ता असून गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री अतुल सावे यांच्या ऑनलाईन उपस्थितीमध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन होणार आहे. जनतेच्या मनात क्षीरसागर भाजपच्या बाजूचे आहेत, असा संदेश दिला जात आहे. मात्र, त्यांना भाजपमध्ये घेतले जात नाही. पंकजा मुंडे यांना न दुखावता बीड जिल्ह्यातील अन्य ओबीसी नेत्यास किती जवळ करायचे यावरून भाजपमध्येही संभ्रम असल्याने जयदत्त क्षीरसागर यांची कोंडी झाली आहे. नेमकी हीच अवस्था शिंदे गटाचे माजी मंत्री सुरेश नवले यांनीही नेमकी मांडली असून आता तरी भूमिका स्पष्ट करा, असे त्यांनी जयदत्त क्षीरसागर यांना डिवचले आहे.