संजय मोहिते

बुलढाणा : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) जिल्हाध्यक्षपदाची भाकरी फिरविली आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांचे चार जिल्हाप्रमुख नवीनच आहे. मात्र, काँग्रेसला खांदेपालटसाठी मुहूर्त सापडत नसल्याचे चित्र आहे. काँग्रेस नव्या दमदार नेतृत्वाच्या हाती पक्षाची धुरा सोपविणार कधी? असा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’
Bhosari assembly, politics, ajit Gavan, Mahesh Landge
भोसरी राजकारण तापलं; महेश लांडगेंच्या तंबीला अजित गव्हाणेंचे प्रत्युत्तर, म्हणाले “पराभवाच्या छायेतून…”
maharashtra assembly election 2024 amol kolhe allegations bjp for online cash payment to voters
भोसरीत भाजपकडून ‘ऑनलाइन लक्ष्मी दर्शन’?, कोणी केला हा गंभीर आरोप
Assembly Election 2024 Malegaon Outer Constituency Dada Bhuse print politics news
लक्षवेधी लढत: मालेगाव बाह्य : मंत्री दादा भुसे यांचा मार्ग यंदा खडतर
loksatta readers feedback
लोकमानस: संशय आणि असुरक्षिततेचा परिणाम
Devendra Fadnavis criticizes Rahul Gandhi for spreading chaos in India print politics news
‘भारत जोडो’तून अराजक पसरवण्याचे काम; देवेंद्र फडणवीस यांची राहुल गांधींवर टीका

भाजपने अलीकडेच खांदेपालट केला आहे. पक्षाने काळाची गरज लक्षात घेऊन यासाठी धक्कादायक निर्णय घेतले. चार दशकांच्या काळात भाजपने प्रथमच दोन जिल्हाध्यक्ष नेमले आहे. यामागे जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार, १३ तालुके, १४१० गावे, विस्तीर्ण क्षेत्रफळ लक्षात घेण्यात आले. ‘मिशन-४५’मध्ये समाविष्ट बुलढाणा लोकसभा मतदारसंघ, ७ विधानसभा मतदारसंघ, त्यातील मलकापूर विधानसभेचा रावेर लोकसभा मतदारसंघात असलेला समावेश, ६० सदस्यीय जिल्हापरिषद, १३ पंचायत समित्या, नगरपरिषदा, बाजार समित्या, खरेदी विक्री संघ, ८७० ग्रामपंचायती असा जिल्ह्याचा ‘राजकीय पसारा’ आहे. या दोन्ही बाबी लक्षात घेऊन भाजपने दोन अध्यक्ष नेमण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर, भाजपने आमदार आकाश फुंडकर यांना विधानसभेसाठी मोकळे केले आहे.

हेही वाचा… श्वेतपत्रिका राजकीय हिशेब चुकते करण्याचे हत्यार

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार गटाने जिल्हाध्यक्षपदी रेखा खेडेकर यांची नियुक्ती केली आहे, तर शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दोन जिल्हाप्रमुख नेमून वर्षभरापूर्वीच नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. काँग्रेसकडून मात्र अद्याप जिल्हा संघटनेत कुठलेही बदल करण्यात आलेले नाही.

हेही वाचा… ‘भाई’ तुम्ही कोठे आहात?

प्रस्थापित नेत्यांना भाजपचा धक्का

भाजपने घाटाखालील ७ तालुक्यांची सचिन देशमुख तर घाटावरील ६ तालुक्यांची धुरा गणेश मांटे यांच्यावर सोपविली आहे. जिल्ह्यात बहुसंख्य असलेल्या मराठा मतदारांऐवजी निर्णायक संख्येत असलेल्या व भाजपचा पारंपरिक मतदार असलेल्या वंजारी समाजाला मांटेच्या रूपाने नेतृत्वाची संधी देण्यात आली. भाजपच्या वाटणीवरील तीन मतदारसंघातील पुढील उमेदवार कुणबी-मराठा समाजाचे राहणार, असे चित्र आहे. मांटे व देशमुख यांची नियुक्ती करून पक्षाने प्रस्थापित नेत्यांना धक्काच दिला आहे. नव्या काळातील नेते तयार करण्याची पूर्वतयारी म्हणूनही याकडे पाहिले जात आहे.