बुलढाणा : सरलेले वर्ष लोकसभा आणि विधानसभा या मोठ्या निवडणुकांचे वर्ष ठरले. या निवडणुकांनी जिल्ह्यातील विविध पक्षीय दिग्गज नेत्यांना अविस्मरणीय राजकीय धडे, तर काहींना मोठे होण्याची संधी दिली. या धड्यातून आता हे नेते काय ‘धडा’ घेतात आणि संधीचे सोने कसे करतात, यावर त्यांची राजकीय कारकीर्द ठरणार आहे.

२०२४ वर्षाच्या प्रारंभी लोकसभा, तर उत्तरार्धात विधानसभा निवडणुका पार पडल्या. शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट लोकसभेच्या रणसंग्रामात प्रथमच समोरासमोर उभे ठाकले. २००९ ते २०१९ दरम्यान सलग विजयाची हॅटट्रिक करणारे प्रतापराव जाधव (शिंदे गट) आणि ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर असा तो सामना होता. वरकरणी हा सामना विषम आणि एकतर्फी वाटणारा होता. तीनदा मिळविलेले विजय आणि त्यातही माजी मंत्री राजेंद्र शिंगणेंसारख्या लोकनेत्याचा दोनदा केलेला पराभव, यामुळे जाधव यांनीही ही लढत एकतर्फी समजून लढली. राज्यात आघाडीला असलेले अनुकूल वातावरण व १५ वर्षे खासदार असल्याने जाधव यांच्याविरोधातील ‘अँटीइन्कम्बन्सी’ यामुळे खेडेकरांनीदेखील ही लढत हलक्यात घेत निर्णायक टप्प्यात आपला ‘हात आखडता’ घेतला. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यामुळे ही लढत तिरंगी आणि गुंतागुंतीची ठरली. मात्र, युती आणि आघाडीने त्यांना गणतीत न घेण्याची चूक केली. जाधव आणि खेडेकर यांना अतिआत्मविश्वास नडला. फरक एवढाच की अनुभवामुळे विजय कठीण हे लक्षात येताच जाधव यांनी व्युहरचना बदलून सर्वस्व पणाला लावत निसटलेला विजय खेचून आणला. तुपकरांनी घेतलेली पाऊणलाख, वंचित आघाडीचे वसंत मगर यांनी घेतलेली सुमारे एक लाख मते आणि खामगाव, जळगाव या युतीच्या बालेकिल्ल्यात मिळालेले मताधिक्य यांमुळे जाधव तरले. ‘मेरिटचा विद्यार्थी काठावर उत्तीर्ण’, असे त्या निकालाचे वर्णन करता येईल. प्रतिस्पर्धी कोणीही असो, कोणतीही लढत सोपी नसते, हा मोठा धडा जाधवांना मिळाला. तसेच तुम्ही कितीही मोठे नेते असाल, पण जनसंपर्क आणि विकासकामे यांची जोड आवश्यक असतेच, हा दुसरा धडादेखील त्यांना या लढतीने दिला. वातावरण कितीही अनुकूल असो उमेदवार कोण, किती कुवतीचा, तो ‘इलेक्टिव्ह मेरिट’च्या निकषास पात्र आहे का हे महत्त्वाचे, हा धडा थेट शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना मिळाला.

Manipur CM N. Biren Singh
Manipur Violence: मणिपूरच्या अशांततेचं पाप काँग्रेसचंच; पंतप्रधान मोदींवरील टीकेला उत्तर देताना बिरेन सिंह यांचा पलटवार
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
all-party feliciation Abdul Sattar chhatrapati sambhaji nagar
अब्दुल सत्तारांच्या सर्वपक्षीय सत्काराकडे महायुतीतील नेत्यांची पाठ
शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत असं राष्ट्रवादीच्या नेत्यांना का वाटतंय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत असं राष्ट्रवादीच्या नेत्यांना का वाटतंय?
member registration campaign BJP
वर्धा : भाजपसाठी ‘ ५ ‘ तारीख महत्वाची; नेते, पदाधिकारी कामाला लागले
ajit pawar sharad pawar (4)
Ajit Pawar : “लबाडाघरचं आवातनं जेवल्याशिवाय…”, अजित पवारांचा शरद पवारांना टोला; म्हणाले, “ते वक्तव्य म्हणजे नुसत्या थापा”
Devendra Fadnavis applauded by Narendra Modi Amit Shah print politics news
मोदी, शहांकडून फडणवीस यांच्यावर कौतुकाची थाप! मुख्यमंत्री पदाचे संकेत
Ratnagiri and Sindhudurg
कोकणातून काँग्रेसचा ‘हात’ गायब; रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग जिल्ह्यांत एकही जागा नाही

हे ही वाचा… Manipur Violence: मणिपूरच्या अशांततेचं पाप काँग्रेसचंच; पंतप्रधान मोदींवरील टीकेला उत्तर देताना बिरेन सिंह यांचा पलटवार

निवडून येण्याच्या क्षमतेला प्राधान्य

यातून धडा घेत विधानसभेत केवळ निष्ठा की निवडून येण्याची क्षमता, या निकषांपैकी ‘मातोश्री’ने विधानसभेत क्षमतेला प्राधान्य दिले. यामुळे जिल्ह्यातील ठाकरे गटाचे अस्तित्व टिकून राहिले. मेहकर मतदारसंघात पक्षाला सिद्धार्थ खरात या नवख्या चेहऱ्याने विजय मिळवून दिला. बुलढाण्यात मूळच्या काँग्रेसच्या आणि हाती मशाल घेतलेल्या जयश्री शेळके यांनी कडवी झुंज देत केवळ ८४१ मतांनी पराभव स्वीकारला. निसटत्या विजयातून जाधव यांनी मोठा धडा घेत जिल्ह्यातील संपर्क वाढविला आहे. स्वबळावर पाऊणलाख मते घेत तुपकरांनी राजकीय चमत्कार घडवला. मात्र, विधानसभेतील त्यांचे ‘तटस्थ धोरण’ त्यांच्यासाठी काहीसे घातक ठरले. ते राजकीय वर्तुळात काहीसे दुर्लक्षित झाल्याचे चित्र आहे.

भ्रमाचा भोपळा फुटला

विधानसभा लढतीने दिग्गजांना मोठे धडे देत चिंता आणि चिंतनास भाग पाडले. विजयाचा अतिआत्मविश्वास नसावा, जनतेला गृहीत धरू नये, आपण काहीही केले तरी जनता माफ अथवा मदत करेल, आपापले मतदारसंघ म्हणजे आपली जहागिरी, आपण अजिंक्यच, या भ्रमात नेत्यांनी राहू नये, हा तो मोठा धडा होय. यामध्ये १९९५ पासून सलग आमदार, मंत्री, पालकमंत्री राहिलेले राजेंद्र शिंगणे (सिंदखेडराजा) तीनदा आमदार झालेले मेहकरचे संजय रायमूलकर, पहिल्यांदा आमदार झालेले काँग्रेसचे राजेश एकडे (मलकापूर), चिखलीच्या आमदार श्वेता महाले, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचा समावेश आहे. यातील आमदार महाले आणि गायकवाड दुसऱ्यांदा विजय झाले खरे, मात्र काठावरच. आपल्या विरोधातील जनमताच्या सुप्तलाटेचा प्रत्यय त्यांना विजयी झाल्यावर आला. मात्र, यंदाचा नवख्या उमेदवाराकडून झालेला दारुण पराभव शिंगणे, रायमूलकर यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा ठरला. शिंगणे यांनी हा पराभव शांततेत स्वीकारला, मात्र रायमूलकर अजूनही हे स्वीकारायला तयार नाहीत, असे चित्र आहे. चिखलीचे माजी आमदार राहुल बोन्द्रे (काँग्रेस), सिंदखेडराजाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर (शिंदे गट) यांनाही यंदाच्या पराभवाने धडा दिला. यातून वरील नेते काय बोध घेतात आणि कोणकोणत्या दुरुस्ती करतात, यावरच त्यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.

हे ही वाचा… Nitish Kumar : आता बिहारमध्येही महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ योजना? निवडणुकीच्या तोंडावर नितीश कुमार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

मंत्रिपदाची हुलकावणी अन् ‘लॉटरी’

जळगावचे भाजप आमदार संजय कुटे यांना मिळालेला धडा वेगळाच ठरावा. २००४ पासून सलग विजयी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक, शिवसेनेतील बंडात पडद्यामागे निभावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे यंदा त्यांचे मंत्रिपद पक्के समजले जात होते. मात्र, ऐनवेळी त्यांच्या ऐवजी (कोणतेही ‘लॉबिंग’ न करता) आकाश फुंडकर यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली. कुटे यांना अतिआत्मविश्वास, जिल्ह्यातील अन्य भाजप आमदारांशी जुळवून न घेण्याचे धोरण आणि त्यांच्या विरुद्ध झालेले सामूहिक प्रयत्न, या बाबी त्यांना भोवल्या. त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रगतीला मोठा ‘ब्रेक’ लागला. ‘गड आला, पण सिंह गेला’ अशी त्यांची गत झाली आहे.

नवख्यांना संधी

विधानसभा निवडणुकीत दोन नवीन चेहऱ्यांना थेट आमदारकीची संधी मिळाली. मंत्रालयीन नोकरी सोडून राजकीय आखाड्यात उतरलेले सिद्धार्थ खरात हे मेहकरचे आमदार झालेत. सिंदखेडराजातून मनोज कायंदे हे आमदार झाले. सर्वात मोठी संधी (नव्हे ‘जॅकपॉट’च) खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांना मिळाला. त्यांना अनपेक्षितरित्या मंत्रिपद मिळाले. आता हे नेते या संधीचे सोने कसे करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Story img Loader