चंद्रपूर : माजी मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र तथा प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत चंद्रपूर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असून भाजपच्या एका माजी नगरसेवकानेही काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, आयात उमेदवार नको, तर स्थानिकालाच उमेदवारी द्या, अशी आग्रही भूमिका चंद्रपुरातील ४० माजी नगरसेवकांनी घेतली आहे. पक्षश्रेष्ठींना त्यांनी आपल्या भावना कळवल्याचे बोलले जात आहे. माजी नगरसेवकांच्या या दबावतंत्रामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद रंगण्याची चिन्हे आहेत.

चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. मागील विधानसभा निवडणुकांमध्ये येथे काँग्रेसचा सातत्याने पराभव होत आला आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला या मतदारसंघात आघाडी मिळाली. यामुळे काँग्रेसच्या गोटात उत्साह संचारला आहे. यामुळे कुणाल राऊत यांनी येथून निवडणूक लढण्याची इच्छा पक्षाकडे व्यक्त केली. दुसरीकडे, भाजपचे माजी नगरसेवक राहुल घोटेकर यांनीदेखील काँग्रेस नेते व माजी नगरसेवकांच्या गाठीभेटी घेत उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याशिवाय काही डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते व दोन विधानसभा निवडणुकांचा अनुभव असलेले महेश मेंढे यांनीही तयारी सुरू केली आहे.

कसब्यात एक ॲक्सिडेंटल आमदार तयार झाला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार रविंद्र धंगेकर यांना टोला
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
On Friday Rahul Gandhi spoke with Prakash Ambedkar he said he will campaign against his candidate
‘तुमच्या उमेदवाराच्या…’ॲड. प्रकाश आंबेडकर व राहुल गांधींमध्ये नेमकी काय चर्चा
Panvel issue of commuters loot of passengers Panvel,
पनवेल : प्रवाशांच्या समस्यांचा मुद्दा प्रचारातून गायब, रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट, असुरक्षित प्रवासाबाबत सर्वपक्षीय नेते गप्पच
Shekhar Shende filed complaint against Dr Pankaj Bhoyer for giving sarees and utensils to women
सरकारी सेवेतील लाडक्या बहिणींना साडी-भांडी; तक्रार होताच आमदार म्हणतात…
right to vote opportunity to create the future
मताधिकार ही भविष्य घडविण्याची संधी!
Yogi Adityanath criticizes Congress, Yogi Adityanath Akola, Akola,
माझ्यासाठी देश व सनातन धर्माशिवाय दुसरे काही नाही, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल, ‘काँग्रेसचे अस्तित्व…’

हेही वाचा : स्थानिक निवडणुका लांबल्याने आठ हजार कोटींचा निधी मिळेना

इच्छुकांची गर्दी पाहता युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश अडूर यांनी पुढाकार घेत शहरातील एका हॉटेलमध्ये ४० माजी नगरसेवकांची नुकतीच बैठक घेतली. या बैठकीला शहर काँग्रेस समितीचे अध्यक्ष रामू तिवारी उपस्थित होते. बैठकीत उपस्थित माजी नगरसेवकांनी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यालाच देण्यात यावी, अशी आग्रही भूमिका मांडली.

जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून इतर पक्षातून उमेदवार आयात करतात. काँग्रेस कार्यकर्ते या आयात उमेदवारांचा प्रचार करून त्यांना निवडून आणतात. नंतर हेच नेते निष्ठावंत कार्यकर्त्यांना विसरून जातात. यामुळे कोणालाही उमेदवारी द्या, मात्र उमेदवार हा पक्षाचा कार्यकर्ता असावा व स्थानिक असावा, असा सूर बैठकीत उमटला. या दबावतंत्राच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे नेते चंद्रपूर विधानभा मतदारसंघाबाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : संघकार्यावरील आक्षेप असंविधानिक; राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांचे मत

काही माजी नगरसेवक गैरहजर

बैठकीत राजेश अडूर व माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर या दोन नावांवर चर्चा झाली. बैठकीचे निमंत्रण पक्षाच्या सर्वच माजी नगरसेवकांना देण्यात आले होते. मात्र, नेत्यांची नाराजी नको म्हणून काही माजी नगरसेवकांनी बैठकीला पाठ दाखवली. पडवेकर निमंत्रण मिळूनही बैठकीला अनुपस्थित राहिले.