छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोषाच्या केंद्रस्थानी पाणीप्रश्न राहावा, अशी रणनीती आता उद्धव ठाकरे गटाच्यावतीने आखली जात आहे. शुक्रवारी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांनी पाणी योजनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पाहणी दौरा केला. दसऱ्यानंतर मोर्चा काढण्याचे नियोजन ठाकरे गटाच्यावतीने सुरू करण्यात आले आहे. त्याचे नेतृत्व आदित्य ठाकरे यांनी करावे असेही ठरविले जात आहे. सत्तेत महाविकास आघाडी सरकार असताना भाजपच्यावतीने देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मोर्चा काढण्यात आला होता. आता तीच रणनीती शिवसेनेकडून आखली जात आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये पाण्याचा मुद्दा रोष निर्माण करू शकतो याचा अनुभव यापूर्वी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी घेतला आहे. गेली १५ वर्षे शहराचा पाणी प्रश्न सोडविता न येणारे दोन्ही सत्ताधारी गट पाणी प्रश्नाचा कळवळा आपल्याला असल्याचे आवर्जून भासवत असतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा