छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीपूर्वी भारत संकल्प यात्रेतून लाभार्थी मतदार बनविण्याच्या प्रक्रियेला भाजपकडून वेग दिला जात आहे. लाभार्थींनी आपली यश कहाणी आपल्या तोंडून सांगावी, अशी रचना आखण्यात आली आहे. ‘मेरी कहानी मेरी जुबानी’ या प्रयोगाला विकास यात्रेतून केंद्रीय मंत्री हजेरी लावत आहेत. नुकतेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कामगार मंत्री भुपेंद्र यादव यांनी बचत गटातील महिलांच्या कपड्याच्या दुकानातील व्यवहाराची माहिती त्यांच्याच तोंडून ऐकली. बचत गटासाठी मिळणारी कर्ज प्रक्रिया आणि त्यातून मिळालेले लाभ याचे कौतुक महिलांनी केले. काही लाभार्थींनी करोनामध्ये पंतप्रधान स्वनिधी योजनेतून मिळालेल्या कर्जामुळे आयुष्यात झालेल्या सकारात्मक बदलाची कहाणी सांगितली. मंत्र्याच्या भाषण कमी वेळाचे आणि लाभार्थ्यांना अधिक बोलते करण्याची प्रक्रिया महिलांना भाजपचा मतदार बनिवणारी असल्याचा दावा केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा