छत्रपती संभाजीनगर : सकाळी नऊ – साडेनऊची वेळ. इदगाह मैदानावर ‘ ईद’ची नमाज ‘ अदा’ करायला मुस्लिम समाज एकत्र झालेला. शहरातील इदगाह मैदानावर जरा नवल झाले एरवी शुभेच्छा देणारे हिंदू बांधव असायचे या मैदानावर पण या वेळी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी अनेकांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या समोर एमआयएमचे नेते खासदार इम्तियाज जलील आले आणि त्यांनी चंद्रकांत खैरे यांची गळाभेटच घेतली. राजकीय लढ्यात समोरासमोर उभे ठाकणारी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काहीशी लवचिक झाली आणि मुस्लिम बहुल भागातील राजकीय कार्यकर्त्यांचा राबताही खैरे यांच्या निवासस्थानी वाढू लागला होता. त्यामुळेच खासदार जलील आणि चंद्रकांत खैरे यांची गळाभेट चर्चेचा विषय ठरली. २०१९ च्या निवडणुकीमध्ये खासदार जलील यांनी चंद्रकांत खैरे यांचा ४ हजार २३४ मतांनी पराभव केला होता तेव्हापासून सार्वजिक कार्यक्रमात जलील आणि खैरे यांच्यामध्ये फारसा संवाद होत नसे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा