आम आदमी पक्ष विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीत सामील झालेला असला तरी काँग्रेसशी अद्याप त्यांचे मनोमिलन झालेले नाही. काँग्रेसने दिल्ली विधेयकाच्या विरोधात संसदेत भूमिका घेऊन ‘आप’ला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर त्यांनी दिल्ली लोकसभेच्या जागा स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर आता आम आदमी पक्षही काँग्रेसशासित राज्यात ताकदीनिशी निवडणुकीत उतरण्याची तयारी करत आहे.

छत्तीसगढमध्ये सध्या काँग्रेसचे सरकार आहे. छत्तीसगढमध्ये ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा शनिवारी (दि. १९ ऑगस्ट) कार्यक्रम झाला. यावेळी बोलत असताना त्यांनी मोफत वीज, महिलांना प्रति महिना सन्मान निधी आणि बेरोजगारांना तीन हजार रुपयांचा महागाई भत्ता देणार असल्याचे आश्वासन दिले. छत्तीसगडमध्ये काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीप्रमाणेच अनेक सोयी-सुविधा मोफत देण्याच्या घोषणांचा फॉर्म्युला ‘आप’ने छत्तीसगढमध्ये राबविल्याचे दिसून येते. केजरीवाल यांनी यावेळी दहा आश्वासने दिली आहेत.

Pankaja Munde
Pankaja Munde : महायुतीत ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेवरुन दोन मतप्रवाह; अजित पवारानंतर आता पंकजा मुंडेंनीही मांडली भूमिका
south nagpur constituency
South Nagpur Vidhan Sabha Election 2024: नवीन चेहऱ्याला…
BJP Brought these issues in Election
BJP : ‘लव्ह जिहाद’ ते ‘व्होट जिहाद’, ‘रझाकार’ ते ‘हिंदुत्व’ भाजपाने विधानसभा निवडणुकीत कुठले मुद्दे आणले?
amravati district dmk factor
अमरावती जिल्‍ह्यात ‘डीएमके’ घटक निर्णायक ठरणार?
hinganghat vidhan sabha constituency
हिंगणघाटमध्ये बंडखोर उमेदवार निर्णायक ठरणार ?
no alt text set
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
Chandrapur constituency dalit muslim and obc factor
चंद्रपूर मतदारसंघात दलित, मुस्लीम व ओबीसी ‘फॅक्टर’ महत्त्वाचा
tumsar assembly constituency
तुमसर विधानसभेत जात, पक्ष अन् चिन्ह दुय्यम स्थानी; उमेदवारच केंद्रस्थानी !
nagpur bjp leaders taking election campaign rally
Nagpur Assembly Election 2024: भाजप स्टार प्रचारकांच्या सभा फक्त पक्षाच्या उमेदवारांसाठीच, महायुतीतील घटक पक्षाकडे दुर्लक्ष

‘आप’च्या कार्यकर्ता संमेलनात बोलत असताना केजरीवाल यांनी दिल्ली आणि पंजाबमधील कारभाराचे दाखले दिले. तिथे मतदारांना दिलेली आश्वासने सत्तेत आल्यानंतर पूर्ण करण्यात आली आहेत, याची आठवण त्यांनी करून दिली.

२४ तास अखंडीत पाणीपुरवठा, प्रत्येकाला ३०० युनिटपर्यंत मोफत वीज, नोव्हेंबर २०२३ पर्यंत थकीत असलेले वीज बिल माफ करणे, १८ वर्षांवरील प्रत्येक महिलेला प्रति महिना रुपये १००० सन्मान राशी (सन्मानवेतन) आणि सर्व शालेय विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण.. अशी अनेक लोकप्रिय आश्वासने केजरीवाल यांनी दिली.

दिल्लीप्रमाणेच छत्तीसगढमधील प्रत्येक नागरिकाला मोफत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा दिल्या जातील, प्रत्येक गावात आणि शहरातील प्रत्येक वॉर्डात मोहल्ला क्लिनीक, प्रत्येक बेरोजगाराला रोजगार आणि रोजगार मिळेपर्यंत प्रति महिना रुपये ३००० भत्ता, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत तीर्थयात्रा, भ्रष्टाचार मुक्त छत्तीसगढ बनविण्याचा प्रयत्न, छत्तीसगढमधून भारतीय सैन्य दलात असलेले जवान आणि राज्यातील पोलीस शहीद झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना रुपये एक कोटींचा निधी ‘सन्मान राशी’ म्हणून दिला जाईल आणि कंत्राटी कामगारांना सामावून घेतले जाईल, असेही इतर आश्वासने केजरीवाल यांनी दिली.

केजरीवाल पुढे म्हणाले की, दहावे आश्वासन शेतकरी आणि आदिवासी बांधवासाठी असेल. मात्र ते आताच न सांगता पुढील दौऱ्यात जाहीर करू. यावेळी केजरीवाल यांच्यासमवेत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान उपस्थित होते. केजरीवाल यांनी मागच्या महिन्यात बिलासपूर येथे जाहीर सभा घेतली होती. तसेच मार्च महिन्यात ‘आप’ कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता.

छत्तीसगढमध्ये २०१८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीतही ‘आप’ने ९० पैकी ८५ मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांच्यापैकी एकालाही विजय मिळवता आला नव्हता. काँग्रेसने ९० पैकी ६८ जागांवर विजय मिळवत प्रचंड बहुमताने सरकार स्थापन केले होते. भाजपाला फक्त १५ जागांवर विजय मिळवता आला. २०१३ साली झालेल्या निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक ४९ मतदारसंघात विजय मिळवून सत्ता स्थापन केली होती. छत्तीसगढमध्ये भाजपा आणि काँग्रेस यांच्या प्रमुख लढत असताना जर ‘आप’ पक्षाने पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीला सामोरे गेल्यास तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.