संतोष मासोळे

धुळे : राज्यातील सत्तेत तीन पक्ष सहभागी असले तरी तिघांमध्ये समन्वय नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. नबाब मलिक प्रकरणावरुन राष्ट्रवादीचे अजित पवार यांची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपकडून नागपूर अधिवेधनादरम्यान झाला असताना धुळ्यात अजित पवार गटाने मालमत्ता कर वाढीच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेत महापालिकेतील सत्ताधारी भाजपविरोधात मोर्चा काढून रणशिंग फुंकले. धुळे महापालिकेवर भाजपचे एकतर्फी वर्चस्व असतानाही दिलेली कोणतीच आश्वासने पूर्ण होत नसल्याने धुळेकरांमध्ये वाढत असलेला रोष भाजपसाठी डोकेदुखी ठरु लागला आहे.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
demand for ransom of Rs 2 crore case filed against three including Valmik Karad in kej
दोन कोटींच्या खंडणीची मागणी; वाल्मीक कराडांसह तिघांवर केजमध्ये गुन्हा
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
BJP, municipal corporation, Mahavikas Aghadi,
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची महापालिकेची तयारी, महाविकास आघाडीची पराभूत मानसिकता मात्र कायम
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
Vinayak Raut, BJP , former MP Vinayak Raut,
भाजपचे मताधिक्य गुणवत्तेवर नसून चोरी करून, माजी खासदार विनायक राऊत यांची टीका

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रच लढणार असल्याचे महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तीनही पक्षांच्या नेत्यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. परंतु, राजकारणात रात्रीतून काहीही होऊ शकते, हा ताजा इतिहास असल्याने तीनही पक्षांनी प्रत्येक जागेसाठी सावधगिरी म्हणून तयारी सुरु केली आहे. त्यामुळेच आतापर्यंत धुळ्यातील समस्यांवर शांत राहिलेला अजित पवार गट अचानक महापालिकेतील सत्ताधारी भाजपविरोधात आक्रमक झाला आहे. एरवी, ठाकरे गटाला ही भूमिका कायम घ्यावी लागत होती. महापालिकेतर्फे मालमत्ता करात वाढ करण्यात आली आहे. वाढीव घरपट्टी रद्द करुन नागरिकांना दिलेल्या नोटीसा मागे घ्याव्यात, या मागणीसाठी अजित पवार गटाने महापालिकेवर मोर्चा काढून भाजपला हादरा दिला. अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागीरदार, शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हेही वाचा… नाना पटोलेंच्या ‘घरकुलां’वर परिणय फुकेंचे अतिक्रमण?

वाढीव मालमत्ता कर आकारणीच्या नोटीस बजावण्याचा सपाटा महापालिकेने लावला असला तरी दुसरीकडे शहरवासीयांना पुरेशा मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध नाहीत. यात प्रामुख्याने पाणी, पथदिवे, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि रस्ते यांचा समावेश आहे. अनेक भागात पिण्याचे पाणी आठ-आठ दिवस मिळत नाही. बंद पथदिव्यांमुळे अनेक भागात अंधाराचे साम्राज्य असते. महापालिकेच्या बहुतेक शाळा मोडकळीस आल्या आहेत. रोजचा कचरा संकलन करणार्‍या गाड्याही वासाहतींमध्ये नियमित फिरत नाहीत.डॉक्टर आणि कर्मचार्‍यांअभावी आरोग्य व्यवस्था ढासळली आहे. अशा एक नव्हे तर, अनेक समस्यांमुळे शहरवासीय मेटाकुटीस आले आहेत. असे असतांना महापालिका प्रशासनाने वाढीव मालमत्ता कर आकारुन जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. महापालिकेने वाढीव मालमत्ता कर रद्द करावा,वाढीव कराच्या नोटीसा मागे घ्याव्यात, जुन्या दराप्रमाणेच मालमत्ता कर घेण्यात यावा, नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याकडे लक्ष द्यावे, अशा मागण्या राष्ट्रवादीने केल्या आहेत.

हेही वाचा… रायगडमध्ये पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात शिंदे गटातच नाराजी

धुळे शहराने यापूर्वी राष्ट्रवादीलाही संधी दिली होती. माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर एकहाती सत्ता उपभोगलेल्या अनेक नगरसेवकांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव अजूनही आहे. त्यामुळेच महायुतीच्या जागा वाटपात विधानसभेसाठी धुळे शहराची जागा राष्ट्रवादीसाठी सोडावी, अशी अपेक्षा केली जात आहे. मालमत्ता करवाढीचे निमित्त करुन भाजपविरोधात मोर्चा काढून अजित पवार गटाने त्यासाठी पार्श्वभूमी तयार करावयास सुरुवात केली असल्याचे मानले जात आहे. धुळेकरांमध्ये वाढत असलेल्या असंतोषाला शमविण्यासाठी भाजपचे खासदार डाॅ. सुभाष भामरे यांना रस्त्यांसाठी निधी मिळाला असून लवकरच शहरातील रस्ते चकाचक होणार, धुळेकरांना नियमितपणे पाणी मिळणार, अशी सारवासारव करावी लागत आहे. परंतु, याआधीही खुद्द भाजपच्या नगरसेवकांनी नागरिकांना सुविधा मिळत नसल्याच्या प्रश्नावर घरचा आहेर दिलेला असल्याने भाजपची कोंडी होऊ लागली आहे.

हेही वाचा… Maharashtra Assembly Winter Session 2023 Live : पाकव्याप्त काश्मीरसह संपूर्ण राज्यात एकत्रित निवडणूक घ्या; उद्धव ठाकरेंची मोदी सरकारकडे मागणी

लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने पक्ष श्रेष्ठींनी निर्णय घेतले असतील तरी स्थानिक पातळीवर होणाऱ्या अन्य निवडणुकांसाठी आम्ही तयारीत आहोत. शंभर टक्के उमेदवार देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट स्वबळावर निवडणूक लढेल. परंतु, वाढीव मालमत्ता कराविरुद्ध काढलेला मोर्चा हा भाजपविरुद्ध काढला होता, असे म्हणता येणार नाही. – इर्शाद जहागीरदार (प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी अजित पवार गट)

जनतेच्या समस्यांवर आवाज उठविणे चुकीचे नाही. परंतु, राज्यात सत्तेत एक असताना स्थानिक पातळीवर मोर्चा काढण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र बसून जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायला हवे होते. तसे घडले नाही. आपण विविध कर जमा करत असू तर, त्या तुलनेत मूलभूत सुविधाही द्यायलाच हव्यात याची जाणीव आहे. यामुळे मालमत्ता कर कसा कमी करता येईल, यासाठी प्रयत्न केला जाईल. इतर मूलभूत सोयी,सुविधा पुरविण्याचा प्रयत्न करण्यात येईल.- गजेंद्र अंपळकर (महानगर जिल्हाध्यक्ष, भाजप, धुळे)

Story img Loader