गुजरातमध्ये भाजपाने काहीश्या दुरावलेल्या पाटीदार समाजाला आता जवळ करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ मे रोजी गुजरातला भेट दिली. या भेटीमध्ये पंतप्रधांनी काही प्रकल्पांचे उदघाटन केले. यामध्ये काही इतर प्रकल्पांसह राजकोट जिल्ह्यातील आटकोट गावात पाटीदार समाजाने बांधलेल्या एका बहू विशेष सुविधा रुग्णालयाचे उदघाटन करण्यात आले. २०१७ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी आरक्षणाच्या मुद्द्यावरून दुरावलेल्या पाटीदार समजला जवळ करण्याचा हा आणखी प्रयत्न होता. नरेंद मोदी त्यांच्या गुजरात राज्यात एकूण १७ कार्यकमांना उपस्थित होते. त्यांपैकी ६ कार्यक्रम हे पाटीदार समाजचे होते.
पाटीदार समाजाचा मोठा प्रभाव
२०१७ च्या निवडणुकीपूर्वी दुरावलेल्या पाटीदार समाजाला आकर्षित करण्यासाठी पाटीदार समाजाच्या भूपेंद्र पटेल यांना गुजरातचे मुख्यमंत्री करण्यात आले आणि नवीन मंत्रालयाचा समावेश करण्यात आला. गुजताच्या राजकारणार पाटीदार समाजाचा मोठा प्रभाव आहे. गुजरातच्या एकूण ६ कोटी लोकसंख्येपैकी पाटीदार समाजाची संख्या १२% आहे. असे अनेक विधानसभा मतदार संघ आहेत तिथे १५% मतदार हे पाटीदार समाजाचे आहेत ज्यांचा मतदानावर थेट परिणाम होऊ शकतो. हा समाज निवडणुकीच्या राजकारणात निधी मिळवून देण्यासाठी खुप महत्वाची भूमिका पार पडतो. २०१७ च्या निवडणुकीत पाटीदारांच्या रोषाचा फटका भाजपाला फार मोठ्या प्रमाणात बसला होता, तर २०२१ च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाटीदार समाजाने आम आदमी पक्षाला पाठिंबा दिला होता.
मोदींच्या उपस्थितीत झालेले पाटीदार समाजाचे कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ एप्रिल रोजी भुजमधील के ले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे व्हर्चुअल उदघाटन केले होते. जे पाटीदार समाजाच्या संस्थेने बांधले होते. परवाडीया हॉस्पिटलचे उदघाटन झाले तेसुद्धा पाटीदार धर्मदाय ट्रस्टने बांधले आहे. २९ एप्रिल रोजी मोदींनी गुजरात पाटीदार2 बिजनेस समिट २०२२ ला संबोधित केले आहे. २०२२ मध्ये गुजरातमध्ये तिसऱ्या शिखर परिषदेत बोलताना पाटीदार समाजाच्या लोकांना उद्देशून म्हणाले की ” काही भागात तुमच्या मुलांनी आमच्या विरोधाचे झेंडे हातात घेतले आहेत. त्यांना समजावून सांगा की आधी तुमची काय परिस्थिती होती आणि आता आपण किती प्रगती केली आहे.भाजपाच्या एका जेष्ठ नेत्याच्या मते “आमच्या पक्षासाठी ‘सबका साथ, सबका विकास’ ही फक्त केवळ एक घोषणा नसून एक रणनिती आहे. आम्ही केवळ एका समाजाला खुश ठेवू शकत नाही. तर आणखी एका नेत्याने पाटीदार समाजाला ‘भाजपाचा कणा’ म्हटले आहे.