Haryana : घुंगट-बिंगट सगळं उडून गेलं आहे, आता देश खुला झाला आहे. आता सगळ्या मॅडमच दिसतील. सगळ्या शिकल्या सवरलेल्या आहेत. मनसा देवी यांनी हे वक्तव्य तळ्याकाठी बसून केलंय. मनसा देवी या कटालहेरी गावातल्या रहिवासी आहेत, करनाल या गावाजवळ हे गाव आहे.

मनसा देवी यांचे हे शब्द फक्त शब्द नाहीत. हरियाणातल्या महिलांची सद्यस्थिती काय? हे दाखवणारे हे शब्द आहेत. हरिणाया हे मुलांमागे मुलींचा जन्मदर कमी असण्यासाठी कुप्रसिद्ध झालं होतं. एक हजार मुलांमागे ८३३ मुली असं प्रमाण होतं. २०२३ मध्ये हे प्रमाण ९२१ मुलींवर पोहचलं आहे. कटलअहेरी गावात फक्त महिला सरपंच आहे, तिचं नाव डिंपल आहे. या ठिकाणी ड्रोन ऑपरेटरही महिला आहे. आम्ही तिला ड्रोनदीदी म्हणतो. असंही या महिलांनी सांगितलं आहे.

Jammu Kashmir Election 2024
Jammu Kashmir Election 2024 : जम्मू-काश्मीर विधानसभेचा तिसरा टप्पा इंजिनियर रशीद, सज्जाद लोन यांच्यासाठी का आहे महत्वाचा; राजकीय गणित काय?
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Why Atishi was AAP choice to Delhi CM
Atishi Marlena Delhi New CM: केजरीवाल यांनी आतिशी मार्लेना यांनाच मुख्यमंत्री पद का दिले? ‘आप’ची मोठी खेळी
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली

५ ऑक्टोबरला हरियाणात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. ९० जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. भाजपा आणि काँग्रेस अशी दुरंगी लढत या ठिकाणी आहे. काँग्रेसने ९० पैकी १० जागांवर महिलांना संधी दिली आहे. डिंपल ज्या एका गावाच्या सरपंच आहेत त्यांनी १२ वीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. गुरुग्रामच्या सुनील कुमार यांच्याशी लग्न झालं. तिथल्या गावकऱ्यांनी माझे पती यांना सरपंच म्हणून निवडलं होतं. पण ही जागा महिलांसाठी राखीव झाली. त्यानंतर हे सरपंचपद माझ्याकडे आलं. हरियाणा सरकारने ५० टक्के आरक्षण जाहीर केलं. त्यामुळे मी निवडले गेले.

डिंपल यांच्या सासू यांनी याबाबत हे सांगितलं की सगळ्या कागदपत्रांवर सह्या तर डिंपलच्याच होतात. तर डिंपललाही सरपंचपदाचं महत्त्व काय आहे ते देखील कळलं आहे. तसंच सरपंच म्हणून गावात काय बदल झाले पाहिजेत यातही ती लक्ष घालते.

नीलमच्या दिवाणखान्यात बसून कुष्ठरोगाचा फॉर्म भरणारा आरोग्य विभागाचा अधिकारी सांगतो, “पूर्वी अधिकारी प्रॉक्सी हजेरी स्वीकारत असत, पण आता प्रशासनाकडून महिला सरपंचांनी प्रत्यक्ष भेटींना हजर राहावे अशी अपेक्षा आहे.” सीता देवी, ज्यांचे घर एका चिंचोळ्या गल्लीत आहे, त्यांनी “ड्रोन दीदी” म्हणून तिचा मार्ग निवडला. त्या सांगतात “मी हरियाणा विज्ञान मंचची सदस्य आहे, आणि जेव्हा त्यांनी (इफ्को) सेल्फ हेल्प ग्रुप (SHG) सदस्यांकडून ड्रोन ऑपरेटरसाठी अर्ज मागवले तेव्हा मी प्रतिसाद दिला,” सीता म्हणतात, तिचे पती, पदवीधर असून, तिने तिला पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित केले. २००७ मध्ये लग्न झालं त्यानंतर मला त्यांनी शिकवलं. अशा पद्धतीची सध्याची हरियाणातील महिलांची स्थिती आहे. जी निश्चितच सकारात्मक आहे.