Haryana Politics : हरियाणात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीची तयारी, मतदारसंघांची पुनर्बांधणी, प्रचार, जाहिराती आणि युतीसंदर्भात बैठका सुरु आहेत. अशातच हरियाणात जननायक जनता पक्ष आणि चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पक्षाने युतीची घोषणा केली आहे. दलित आणि जाट मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न म्हणून या युतीकडे बघितलं जात आहे. या घोषणेनंतर विविध राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे. या युतीमुळे हरियाणात भाजपा आणि काँग्रेसचं टेन्शन वाढेल, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे.

चंद्रशेखर आझाद यांचा आझाद समाज पक्ष हा हरियाणात पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढतो आहे. आझाद यांच्या पक्षाने यंदाची लोकसभा निवडणूकही लढवली होती. या निवडणुकीत त्यांना नगीना लोकसभा मतदारसंघातून विजय मिळाला होता. या विजयानंतर हरियाणात त्यांचे राजकीय वजनही वाढलं आहे.

देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं? बावनकुळे म्हणाले... (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
expectations from mahayuti
लेख : नव्या सरकारकडून अपेक्षा
impeachment motion against justice Shekhar Yadav
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींविरोधात महाभियोगाची शक्यता; महाभियोग म्हणजे काय? आजवर किती न्यायाधीशांवर झाली कारवाई?
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!

हेही वाचा – SP BSP Alliance : सपा-बसपा एकत्र येणार? भाजपाच्या मायावतींवरील टीकेला अखिलेश यादवांचं उत्तर; नव्या आघाडीची चर्चा, बसपाचेही दरवाजे खुले?

हरियाणात विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. दोन्ही पक्षांनी केलेल्या घोषणेनुसार, यापैकी ७० जागा जेजेपी तर २० जागा आझाद समाज पक्ष लढणार आहे. ही युती पुढची ४०-५० वर्ष टीकेल, अशी भावना दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. तसेच आगामी काळात आम्ही दलित, गरीब आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी काम करू, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. यावेळी बोलताना जेजेपीचे प्रमुख दुष्यंत चौटाला, यांनी त्यांचे पणजोबा देवीलाल यांच्या आठवणींनाही उजाळा दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न मिळावा, या मागणीसाठी कांशीराम यांनी दिल्लीत आंदोलन करण्याची घोषणा केली, तेव्हा देवीलाल यांनी या आंदोलनाला समर्थन दिलं होतं. ज्यावेळी देवीलाल हे उपपंतप्रधान बनले तेव्हा त्यांनी डॉ. आंबेडकर यांना केवळ भारतरत्न पुरस्कारच दिला नाही, तर संसद भवन परिसरात त्यांचा पुतळाही बसवला. कांशीराम आणि देवीलाल या दोन्ही नेत्यांनी दलित, मागासवर्गींसाठी मोठं काम केलं आहे, असे ते म्हणाले.

खरं तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला, तर या निवडणुकीत जेजेपीला १० जागांवर विजय मिळाला होता. या निवडणुकीत जेजेपी किंगेमकर म्हणून उदयास आली होती. पुढे जेजेपीच्या मदतीने भाजपाने हरियाणात सरकार स्थापन केलं आणि दुष्यंत चौटाला हे उपमुख्यमंत्री झाले. मात्र, या वर्षाच्या सुरुवातील जेजेपी आणि भाजपाची युती संपुष्टात आली. त्यानंतर जेजेपीच्या सात आमदारांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी दोघांनी भाजपात, तर एकाने काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा – Soyabean Price: लोकसभेला कांद्याने रडवले; आता ‘सोयाबीन’चा मुद्दा तापला, दर कोसळल्यामुळे विधानसभेला महायुतीसमोर आव्हान?

हरियाणातील जातीय समीकरणांचा विचार केल्यास जेजेपी आणि आझाद पक्ष यांच्या युतीची नजर जाट आणि दलित मतदारांवर असणार आहे. हरियाणात जाट मतदार एकूण लोकसंख्येच्या २६ टक्के आहे, तर दलित मतदार जवळपास २१ टक्के आहे. महत्त्वाचे म्हणजे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जेजेपीचे चार उमेदवार हे राखीव मतदारसंघातून निवडून आले.

जेजेपी आणि आझाद यांच्या पक्षाने युतीची घोषणा करण्यापूर्वी भारतीय राष्ट्रीय लोकदल आणि बसपाने युतीची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, हरियाणातील दलितांनी कधीच कोण्या एका पक्षाला मतदान केलेलं नाही, त्यामुळे दोन्ही युतींना किती यश मिळेल, याबाबत सांगणं कठीण आहे. याशिवाय या युतीमुळे भाजपा आणि काँग्रेसचं टेन्शन वाढणार असल्याचं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.

हरियाणात भारतीय राष्ट्रीय लोकदल आणि बसपाने १९९८ मध्ये पहिल्यांदा युती केली होती. मात्र, २००९ मध्ये ही युती संपुष्टात आली. २००९ मध्ये बसपाने कुलदीप बिश्नोई यांच्या नेतृत्वाखालील हरियाणा जनहित काँग्रेसबरोबर युती केली. पण ही युतीही जास्त काळ टीकली नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बसपाने काँग्रेस बरोबर युती करण्याचा प्रयत्न केला. पण काँग्रेसने प्रतिसाद न दिल्याने त्यांनी पुन्हा भारतीय राष्ट्रीय लोकदल बरोबर युती करण्याचा निर्णय घेतला, पण ऐन निवडणुकीपूर्वी ही युती संपुष्टात आली. त्यानंतर बसपाने लोकतंत्र सुरक्षा पक्षाबरोबर युती केली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या युतीला एकूण ६ टक्के मतं पडली, त्यापैकी बसपाला ३.६ टक्के मतं होती.

Story img Loader