राज्यसभा निवडणुकीत हरियाणामध्ये भाजपा-जेजेपी युतीने कॉंग्रेसमधील पक्षांतर्गत वादाचा पुरेपूर वापर करत विजय मिळवला. यामुळेच कॉंग्रेसचे उमेदवार अजय माकन यांना आवश्यक मतसंख्या असूनही पराभवाचा सामना करावा लागला.

अतिशय चुरशीच्या झालेल्या लढतीत कार्तिकेय शर्मा विजयी झाले. कारण काँग्रेसचे असंतुष्ट आमदार कुलदीप बिष्णोई यांनी अजय माकन यांना मतदान केले नाही. तर दुसरे आमदार किरण चौधरी यांनी चुकीचे मत टाकल्याचा आरोप आहे. हरियाणाच्या विधानसभेत ९० सदस्य आहेत.-यामध्ये भाजपाचे ४०, काँग्रेसचे ३१ आणि जेजेपीचे १० आमदार आहेत. त्यांच्याशिवाय सात अपक्ष आमदार, इंडियन नॅशनल लोक दल आणि हरियाणा लोकहीत पक्षाचे प्रत्येकी एक आमदार आहेत.

हरियाणामध्ये राज्यसभेच्या २ जागांसाठी निवडणूक झाली. भाजपाला त्यांचे उमेदवार कृष्ण पनवार यांच्या विजयाबाबत खात्री होती. काँग्रेसलाही पुरेसे संख्याबळ असल्यामुळे अजय माकन हे निवडून येतील याची खात्री होती. मात्र माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे निलंबित नेते विनोद शर्मा यांचे चिरंजीव कार्तिकेय शर्मा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यामुळे निवडणूक चुरशीची झाली. 

३१ मे रोजी दुष्यंत चौटाला यांच्या नेतृत्वाखालील जेजेपीने त्यांच्या १० आमदारांचा शर्मा यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले.  ज्यामुळे कॉंग्रेसला ही निवडणूक गांभिर्याने घ्घेण्यास भाग पडले. मग पक्षांतर्गत दुफळी वाढू नये यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले. २ जून रोजी काँग्रेसने त्यांच्या आमदारांना रायपूर येथे नेले. मात्र कॉंग्रेसच्या २३१ आमदारांपैकी फक्त २८ आमदारच रायपूर येथे रिसॉर्टवर पोचले. बिष्णोई आणि चौधरी हे दोन आमदार यावेळी अनुपस्थित होते. हरियाणा कॉग्रेसने १० जून या मतदानाच्या दिवशीच त्यांच्या आमदारांसाठी प्रशिक्षण सत्र आयोजित केले होते. त्याचा परिणाम मतदानावर झाला. 

३ जून रोजी मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांनी यांनी भाजपा शर्मा यांना पाठिंबा देणार आहे. या घोषणेनंतर ७ अपक्ष आमदारांपैकी ६ आमदारांनी शर्मा यांना पाठिंबा जाहीर केला. ५ जून रोजी हरियाणा लोकहीत पक्षाचे गोपाल कांडा आणि त्यानंतर इंडियन नॅशनल लोकदलाचे अभय चौटाला यांनीसुद्धा कार्तिकेय शर्मा यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदी निवड न झाल्यामुळे बिष्णोई काँग्रेस पक्षावर नाराज होते. त्यामुळे त्यांनी पक्षाला मत न देण्याचा निर्णय घेतला होता. याचा फायदा भाजपाला झाला. 

अश्या तोडातोडीच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर हरियाणामध्ये राज्यसभेच्या २ जागांसाठी निवडणूक पार पडली.या निवडणुकीत भाजपाचे पनवार यांचा सहज विजय झाला. मात्र दुसऱ्या जागेचा निकाल धक्कादायक होता. पुरेसे संख्याबळ असूनही काँग्रेसच्या अजय माकन यांचा पराभव झाला आणि अपक्ष उमेदवार कार्तिकेय शर्मा निवडून आले. 

Story img Loader