हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून येत्या १२ नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत विजयी कामगिरी करण्यासाठी भाजपासह सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. तर निवडणुकीच्या तोंडावर भाजपाप्रमाणे काँग्रेसलाही बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवारी दाखल केली म्हणून काँग्रेसने रविवारी सहा नेत्यांना निलंबित केले आहे. हिमाचल प्रदेशात सत्तेत परतण्यासाठी काँग्रेसकडून अथक प्रयत्न केले जात आहेत.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा हिमाचल प्रदेशात आठ सभा आणि रोड शो करणार आहेत. १० नोव्हेंरपर्यंत मंडी, कुल्लू, कांगरा, चंबा हमीरपूर, उना, शिमला आणि सिरमौरमध्ये त्या काँग्रेसचा प्रचार करणार आहेत. १४ ऑक्टोबरला सभेला संबोधित करत प्रियांका गांधी यांनी हिमाचल प्रदेशात निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला आहे. काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत जुनी पेन्शन योजना सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. हिमाचल प्रदेशात १ लाख रोजगार देण्याचे आश्वासनही काँग्रेसने दिले आहे.
नक्की पाहा – PHOTOS : पुण्यात लुल्लानगर परिसरात सातव्या मजल्यावरील ‘Vegeta’ हॉटेल जळून खाक
काँग्रेसमध्ये २० बंडखोर आहेत, तर भाजपामध्ये त्यांची संख्या १८ आहे. यापैकी दहा बंडखोर हे विद्यामान आमदार आहेत, ज्यांना पक्षाने तिकीट दिलेलं नाही. या अपक्षांचा परिणाम मंडी आणि कुल्लु जिल्ह्यातील दहा जागांच्या निकालावर होऊ शकतो.
विद्यमान सरकारकडे मतदानाचा कल असण्याचा इतिहास असलेल्या या राज्यात आपल्याला यंदा संधी मिळेल अशी आशा बाळगून, काँग्रेस अशा संकटांना दूर ठेवत आहे. काँग्रेसला यंदा आपली जागांची संख्या वाढवण्यात प्रियंका गांधीची मदत होईल अशीही अपेक्षा आहे. २०१७ मध्ये काँग्रेसने राज्यात केवळ २१ जागा जिंकल्या होत्या, ज्या भाजपाने जिंकलेल्या ४४ जागांपेक्षा निम्म्या होत्या.
हेही वाचा – Shivshahi bus caught fire : पुण्यातील शास्त्रीनगर चौकात शिवशाही बसला भीषण आग
राज्यात काँग्रेसच्या प्रचाराचे नेतृत्व करणाऱ्या प्रियंका गांधींनी सोमवारी मंडी जिल्ह्यातील मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या मतदरासंघाता जाहीर सभेला संबोधित केले. काँग्रेस एकमेव पर्याय असल्याचं त्यांनी सांगितलं.
यावेळी प्रियंका गांधी म्हणाल्या, “मी कोणत्याही छोट्या भागात गेले की ते मला सांगतात की माझ्या आजीने तिथे भेट दिली होती. त्यांनी इंदिरा गांधींना ज्याप्रकारे खीर दिली होती तशीच ते मलाही खीर देतात. ४० वर्षानंतरही त्यांचे तिच्यावर प्रेम आहे. सध्याचे राजकारण बदलले आहे. सध्याच्या काळात पैसा, लोभ आणि खोटी आश्वासनं आहेत. इंदिरा गांधींच्या काळात असे नव्हते, म्हणूनच ते त्यांचा आदर करतात.” याशिवाय इंदिरा गांधी यांचे हिमाचलशी असलेल्या संबंधाबद्दल प्रियंका म्हणाल्या की, “इंदिरा गांधींना माहीत होते की हिमाचलच्या लोकांनीच हिमाचलला घडवलं आहे.”
बंडाळी थोपवण्यासाठी भाजपाकडून कडक भूमिका? –
या निवडणुकीत विजयी कामगिरी करण्यासाठी भाजपासह सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपाने सर्व ६८ जागांसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली असून प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र तिकीट न मिळाल्यामुळे येथे भाजपामधील अनेक नाराज नेत्यांनी बंड पुकारले असून स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे. पक्षातील याच बंडाळीला थोपवण्यासाठी भाजपाने मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाला हानी पोहोचविण्याचे काम करणाऱ्या नेत्याला पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित केले जाईल, असा सज्जड दम येथील भाजपाने दिला आहे.