जळगाव : लोकसभा निवडणूकीचा प्रचार सुरु झाला असताना जिल्ह्यात भाजपला गळती लागली आहे. भाजपचे जळगावचे खासदार उन्मेष पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख तथा पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्याने भाजपला हा मोठा हादरा मानला जात आहे. जळगाव मतदारसंघात भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांना ठाकरे गटाकडून करण पवार यांचे आव्हान असणार आहे.

जळगाव मतदारसंघ ३० वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. या मतदारसंघात उमेदवार देताना भाजपने वारंवार धक्कातंत्राचा अवलंब केला आहे. २०१९ च्या निवडणुकीत तत्कालीन खासदार ए. टी. पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी गृहीत धरली जात असताना, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली होती. वाघ यांनी प्रचार सुरू करुन १०-१२ दिवस होत नाहीत तोच वाघ यांच्याऐवजी उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर करुन भाजपने अजून एक धक्का दिला होता. त्यावेळी वाघ यांनी स्वतः सामंजस्याची भूमिका घेत समर्थकांमधील नाराजी दूर केली होती.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
ajit pawar meet sharad pawar
अजितदादा सहकुटुंब पवारांच्या भेटीला, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नेत्यांची गर्दी
BJP, municipal corporation, Mahavikas Aghadi,
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची महापालिकेची तयारी, महाविकास आघाडीची पराभूत मानसिकता मात्र कायम
Gulabrao Deokar, Gulabrao Deokar latest news,
गुलाबराव देवकर यांच्या पक्ष प्रवेशास अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांचा विरोध, पक्ष प्रवेशाच्या विरोधात फलक झळकला
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
gulabrao deokar loksatta news
गुलाबराव देवकर यांचा प्रचार केल्याबद्दल ठाकरे गटाला पश्चाताप, जळगाव जिल्ह्यात आत्मक्लेश आंदोलन

हेही वाचा : तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”

भाजपने आता जळगाव मतदारसंघात खासदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी नाकारून गेल्या निवडणुकीत अचानक उमेदवारी रद्द केलेल्या स्मिता वाघ यांना संधी देऊन पुन्हा धक्कातंत्र अवलंबविले. त्यामुळे स्वत: खासदार पाटील आणि त्यांचे समर्थक प्रचंड नाराज झाले. भाजपकडून आयोजित बैठका, मेळाव्यांमधील त्यांची अनुपस्थिती सर्वांनाच खटकत होती. दुसरीकडे, जळगावमध्ये ठाकरे गटही तुल्यबळ उमेदवाराच्या शोधात असल्याने पाटील यांच्या ठाकरे गटातील नेत्यांबरोबर बैठकांना सुरुवात झाली. आपण उमेदवारी केल्यास भाजपकडून कोणतेही कारण पुढे करुन आपणास अडकविले जाईल, या भीतीने स्वत:ऐवजी त्यांचे मित्र पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष व भाजपचे पारोळा-एरंडोल विधानसभा क्षेत्रप्रमुख करण पवार यांना उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांचा आग्रह होता. पवार यांनी अपक्ष लढावे व ठाकरे गटाने त्यांना पाठिंबा द्यावा, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती. खासदार पाटील यांच्याबरोबरच्या बैठकांमध्ये ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांचाही सहभाग होता. काही बैठका महाजन यांच्या निवासस्थानी झाल्या होत्या. त्यानंतर मुंबईत मंगळवारी खासदार संजय राऊत आणि उध्दव ठाकरे यांच्याशी पाटील आणि पवार यांची चर्चा झाली. या बैठकीतच जळगाव मतदारसंघात उमेदवारीसाठी पवार यांच्या नावाला ठाकरे यांनी संमती दिली.

खासदार पाटील यांच्या जळगाव लोकसभा मतदारसंघातील कामांचा आणि अनुभवाचा करण पवार यांना लाभ होणार आहे. शिवाय, चाळीसगाव, पाचोरा-भडगाव, चोपडा, अमळनेर यांसह इतर विधानसभा मतदारसंघांतील खासदार पाटील यांचा चांगला जनसंपर्क, शेतकर्यांना पीकविम्याच्या लाभासाठी केंद्र व राज्य सरकारकडे केलेले प्रयत्न, संसदेतील उत्तम कामगिरी, पाडळसरे प्रकल्प, बोदवड उपसा सिंचन योजना, विमानतळ यांसह विविध प्रकल्पांच्या कामांना दिलेली गती यांचाही पवार यांना प्रचारात लाभ होण्याची शक्यता आहे. पवार यांचे पारोळा-एरंडोल, अमळनेर या मतदारसंघांत प्राबल्य आहे. मराठा समाजाचे असूनही ओबीसींमध्येही त्यांचे संबंध आहेत. सर्वच राजकीय पक्षांत पवार यांचा मित्रपरिवार मोठा आहे. पाटील यांच्या साथीने पवार यांचे भाजपच्या उमेदवार वाघ यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे.

हेही वाचा : उमेदवारी जाहीर होताच महुआ मोईत्राना झटका; ईडीकडून मनी लाँडरिंगचा खटला दाखल

संकटमोचक गिरीश महाजनांना धक्का

रावेर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या उमेदवारीमुळे रावेरसह यावल, भुसावळ, मुक्ताईनगर यांसह इतर ठिकाणी सुरू झालेली पक्षांतर्गत धुसफूस थांबविल्यानंतर भाजपसमोर जळगाव मतदारसंघातील करण पवार यांची उमेदवारी भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्यासाठी धक्का मानली जात आहे. काँग्रेससह इतर पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये आणणारे महाजन यांना आता प्रथमच भाजपमधून आणखी नेते दुसरीकडे जाऊ नयेत, यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

हेही वाचा : “जो मै बोलता हूँ, वो मै..”, जाहीर सभेत अशोक चव्हाणांचा ‘रावडी’ अंदाज

करण पवार कोण आहेत ?

करण पवार (पाटील) हे पारोळा-एरंडोलचे माजी आमदार भास्करराव पाटील यांचे नातू, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांचे पुतणे आहेत. शिक्षण बीएपर्यंत झाले आहे. पारोळा पालिकेचे भाजपचे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. राजकीय कारकीर्द नगरसेवकपदापासून सुरू झाली. त्यांनी उपनगराध्यक्षपदही भूषविले आहे. त्यांचे आजोबा भास्करराव राजाराम पाटील हे पारोळा- भडगाव मतदारसंघाचे तीन पंचवार्षिक आमदार होते. त्यांनी दुष्काळी तालुका असलेल्या मतदारसंघातील तामसवाडी येथे धरणनिर्मिसाठी प्रयत्न करीत त्यांच्या कार्यकाळात ते पूर्णत्वास नेले. वडील बाळासाहेब भास्करराव पाटील हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, नियोजन मंडळाचे माजी सदस्य व पारोळा बाजार समितीचे माजी सभापती होते. आई सुजाता बाळासाहेब पाटील या पारोळा पंचायत समितीच्या माजी सदस्या, पत्नी अंजली पवार (पाटील) महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व नगरसेविका आहेत. खासदार उन्मेष पाटील यांचे करण पवार निकटवर्तीय मानले जातात.

Story img Loader