-दीपक महाले
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेच्या चारही आमदारांनी तसेच काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना साथ दिल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे वळविण्यासाठी भाजपने गळ टाकून ठेवला आहे. परंतु, अद्यापतरी त्यांच्या गळास कोणीही लागलेले नाही. सर्वांनी थांबा आणि वाट पाहा हे धोरण स्वीकारले आहे.
प्रकाश आवाडेंच्या भाजपा प्रवेशाची केवळ औपचारिकता
जळगाव जिल्ह्यात शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना त्यापासून काँग्रेस, राष्ट्रवादीने स्वत:ला दूर ठेवले आहे. जळगाव शहरात काँग्रेसची स्थिती अतिशय वाईट आहे. महापालिकेत या पक्षाचा एकही नगरसेवक नाही, यावरून त्या पक्षाची अवस्था लक्षात येऊ शकेल. मागील विधानसभा निवडणुकीप्रसंगी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांचा पक्ष नेतृत्वाशी बेबनाव झाल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर मात्र काँग्रेसमधून कोणीही बाहेर पडले नाही. शहराच्या मानाने ग्रामीण भागात काँग्रेस अजूनही तग धरून आहे.
सत्तांतरामुळे सांगलीत राष्ट्रवादीच्या भरतीला ब्रेक; प्रवाह पुन्हा भाजपाच्या दिशेने
सध्या जिल्ह्यात भाजपचे सहा, तर शिवसेनेचे तीन ठिकाणी नगराध्यक्ष आहेत. दोन ठिकाणी स्थानिक आघाडीचे, तर एका ठिकाणी अपक्ष नगराध्यक्ष आहे. जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात होती. आता प्रशासक आहे. जिल्ह्यातील चार मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी एक मतदारसंघ आहे. चार मतदारसंघात शिवसेनेचे (सध्या शिंदे गटाचे) आणि मुक्ताईनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष आमदार (शिंदे गट) आहेत. जिल्ह्यात १५ पंचायत समित्यांपैकी सहा भाजप, एक महाविकास आघाडी आणि तीन शिवसेनेच्या ताब्यात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीप्रमाणेच भाजप शिवसेनेचे माजी आमदार, पदाधिकाऱ्यांकडेही लक्ष ठेवून आहे. परंतु, भाजपऐवजी शिंदे गटाकडे जाण्यासाठी सध्यातरी थांबा आणि वाट पाहा, या भूमिकेत सेनेचे पदाधिकारी आहेत.