लक्ष्मण राऊत

जालना : जालना लोकसभा मतदारसंघातून सहाव्यांदा भाजपची उमेदवारी निश्चित असल्याने रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून पक्षाची प्रतिमा उंचावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचप्रमाणे पाणीपुरवठा, विद्युत विकास इत्यादींच्या संदर्भात मतदारसंघात करण्यात येत असलेले प्रयत्न जनतेसमोर ठेवण्यावर लक्ष केंद्रित केलेले आहे. ‘ लाभार्थी वाढले तर मतदार वाढतील’ या राजकीय सूत्राला गती दिली जात आहे.

Rahul Gandhi ashok chavan nanded
नांदेडमध्ये राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबिय बेदखल !
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Panvel issue of commuters loot of passengers Panvel,
पनवेल : प्रवाशांच्या समस्यांचा मुद्दा प्रचारातून गायब, रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट, असुरक्षित प्रवासाबाबत सर्वपक्षीय नेते गप्पच
Rights and Duties of the Opposition in democracy
चतु:सूत्र : लोकशाहीत विरोधी पक्षाची गरज
right to vote opportunity to create the future
मताधिकार ही भविष्य घडविण्याची संधी!
Pune Voting Free Petrol, Pune Voting, Petrol,
पुणेकरांनो मतदान करा अन् मोफत पेट्रोलसोबत बरंच काही मिळवा! विविध संघटनांकडून मतदान वाढविण्यासाठी पाऊल
Ramdas Athawales message of unity to Advocate prakash ambedkar
रामदास आठवलेंकडून ॲड.आंबेडकरांना पुन्हा ऐक्याची साद; म्हणाले, ‘आपण दोघेही नरेंद्र मोदींच्या..’
Devendra Fadnavis applauded by Narendra Modi Amit Shah print politics news
मोदी, शहांकडून फडणवीस यांच्यावर कौतुकाची थाप! मुख्यमंत्री पदाचे संकेत

निवडणुका नसल्या तरी आपल्या भागातील मतदारांशी संपर्क ठेवणारे नेते म्हणून दानवे यांची ओळख आहे. स्वपक्षातील कार्यकर्त्यांसह विरोधी पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवण्याची त्यांची कार्यशैलीही जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात परिचित आहे. आता लोकसभा निवडणूक जवळ आली असल्याने पक्ष पातळीवर प्रयत्न करतानाच केंद्र व राज्य शासनाच्या विविध उपक्रमांच्या कार्यक्रमांचे माध्यम त्यांनी निवडले आहे.

हेही वाचा… हिंगोलीतील जातीय समीकरणातूनच राधेश्याम मोपलवारांचे नाव चर्चत

अलिकडेच केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून त्यांनी भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथे जनतेशी संवाद साधला. केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांसह परिसरातील जनतेची चांगली गर्दी या कार्यक्रमाच्या वेळी होती. विविध योजनांची माहिती देणाऱ्या स्टॉल्सवरही गर्दी झाली होती. यावेळी दानवे यांनी आपल्या भाषणात केंद्राच्या अनेक योजनांची माहिती दिली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार गरीब तसेच शेतकऱ्यांशी समर्पित असल्याचे सांगितले. यावेळी पंतप्रधानांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे लाभार्थ्यांशी संवाद साधला. या आधी २७ नोव्हेंबर रोजी दानवे यांच्या हस्तेच विकसित भात संकल्प यात्रेची सुरुवात करण्यात आली होती. पावणेदोन महिन्यांपूर्वी जालना लोकसभा मतदारसंघातील बदनापूर या तालुक्याचे ठिकाणी ‘मेरी माटी-मेरा देश अमृत कलश यात्रा’च्या निमित्ताने कार्यक्रमास उपस्थिती लावली होती. यावेळी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतील घरकुलांच्या लाभार्थ्यांचाही मेळावा आयोजित करण्यात आला होता. केंद्र आणि राज्य शासन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत कल्याणकारी योजना पोहोचविण्यास कटिबद्ध असल्याचे दानवे यांनी यावेळी सांगितले होते. हे दोन्ही कार्यक्रम जरी शासकीय असले तरी त्यामधून प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्हणजेच पर्यायाने भाजपच्या प्रतिमावर्धनाचेच प्रयत्न झाले.

हेही वाचा… अकोल्यात पोटनिवडणूक होणार ? प्रशासनाकडून तयारी

जायकवाडी जलाशयातून नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झालेली असली तरी जालना शहराचा पाणीप्रश्न सुटलेला नाही. सध्या आठ-दहा दिवसांना नळांना पाणी येते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना देवेंद्र फडणवीस आणि दानवे यांच्या नेतृत्वाखाली जालना शहरात पाणी प्रश्नावर मोर्चा काढण्यात आला होता. आता हा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आपण करीत असल्याची माहिती दानवे यांनी जनतेसमोर ठेवली आहे. जालना शहराच्या पाणीपुरवठ्यात सुधारणा व्हावी यासाठी आपल्या विशेष प्रयत्नांमुळे ७२ कोटी ७९ लाख रुपयांच्या निधीस राज्य शासनाने तत्त्वत: मान्यता दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा… पालघर लोकसभा मतदारसंघावर भाजपा दावा कायम

उर्जा विकासात पुढाकार घेतल्याचा दावा

जालना शहरात सध्या १३२ केव्हीची दोन उपकेंद्रे आणि २२० केव्हीची दोन उपकेंद्रे कार्यान्वित आहेत. याशिवाय १३२ केव्हीचे ११ औद्योगिक ग्राहक आहेत. त्यामुळे शहरात ४०० केव्हीचे नवीन उपकेंद्र सुरू करण्यासह अन्य मागण्या दानवे यांनी केल्या आहेत. या सर्व मागण्यांचा तपशील जाहीर करून विद्युत विकासासाठी आपण करीत असलेले प्रयत्न त्यांनी मतदारांसमोर ठेवले आहेत.