वृत्तसंस्था, श्रीनगर
जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचार सोमवारी संपुष्टात आला. जम्मू व काश्मीरमधील ९०पैकी २४ जागांवर बुधवारी, १८ सप्टेंबरला मतदान होत आहे. त्यापैकी १६ जागा काश्मीर खोऱ्यात तर आठ जागा जम्मू विभागात आहेत. अखेरच्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तीन प्रचार सभा घेतल्या.

जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभा निवडणुका तब्बल १० वर्षांनी आणि अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर प्रथमच होत आहेत. चार महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका शांततेत पार पडल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठीही शांततेत मतदान होण्याची अपेक्षा आहे. तब्बल साडेतीन दशकांच्या कालावधीत यंदा प्रथमच काश्मीर खोऱ्यात कोणत्याही भीतीविना प्रचार सभा पार पडल्या. त्यामध्ये जनतेचा उत्साही सहभागही दिसून आला. खोऱ्यात मुख्यत: नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी या दोन पक्षांमध्ये लढत आहे. हे दोन्ही पक्ष राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत. नॅशनल कॉन्फरन्सने काँग्रेसशी आघाडी केली आहे. जम्मूमध्ये काँग्रेस (पान ७ वर) (पान १ वरून) आणि भाजपने सर्व ताकद पणाला लावली आहे. त्याशिवाय मोठ्या संख्येने अपक्ष, अनेक लहान पक्ष, जमात-ए-इस्लामीचे निवडणुकीच्या राजकारणात पुनरागमन, इंजिनीयर रशीद या नेत्याची जामिनावर सुटका आणि त्यांच्या अवामी इत्तेहाद पार्टी (एआयपी) या पक्षाची अखेरच्या क्षणी जमातबरोबर झालेली युती हेही घटक निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी उत्सुक आहेत. भाजपने काश्मीर खोऱ्यातील ४७ पैकी केवळ १९ मतदारसंघांमध्ये उमेदवार दिले आहेत. त्यामुळे ‘एआयपी’सारखे लहान पक्ष आणि अपक्ष भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप ‘एनसी’ आणि ‘पीडीपी’ करत आहेत. या १९ मतदारसंघांपैकी पहिल्या टप्प्यात आठ ठिकाणी मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात जम्मू व काश्मीर या दोन्ही विभागांमध्ये काँग्रेसचे प्रत्येकी चार ठिकाणी उमेदवार आहेत, तर एनसीचे जम्मूमध्ये सहा आणि काश्मीरमध्ये १२ उमेदवार आहेत. दुसऱ्या टप्प्याचे मतदान २५ सप्टेंबरला होणार आहे.

Arvind Kejriwal resign today
केजरीवाल यांचा आज राजीनामा? राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
jammu kashmir elections
“जम्मू-काश्मीरमध्ये गांधी-अब्दुल्ला आणि भाजप यांच्यात थेट लढत”, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन
sangli islampur
चावडी: इस्लामपूरची ताकद कुणाच्या पाठीशी…
Deepak Kesarkar Sawantwadi Assembly Constituency Vidhan Sabha Nivadnuk 2024
कारण राजकारण: केसरकरांसमोर ठाकरे गटाबरोबर भाजपचेही आव्हान, लोकसभेत मताधिक्यात वाढ
IIT Bombay
IIT Bombay : मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनची आयआयटी मुंबईला १३० कोटींची देणगी; जागतिक दर्जाचं नॉलेज सेंटर उभारणार
health system, CM Eknath Shinde,
आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निवासी डॉक्टरांच्या सुविधांसाठी निधी देणार
Ashok Chavan Bhaskarrao Khatgaonkar Patil
Ashok Chavan : “आमच्याबरोबर राहिले तर सुरक्षित राहतील”, अशोक चव्हाणांचा ‘या’ नेत्याला इशारा

हेही वाचा : Parliamentary Standing Committee : काँग्रेसला मिळाल्या संसदेच्या चार स्थायी समित्या, सत्ताधाऱ्यांबरोबरच्या वाटाघाटीत मोठं यश

प्रचाराचे मुद्दे

● अनुच्छेद ३७० रद्द केल्यामुळे जम्मू आणि काश्मीरच्या विकासाला चालना मिळाली आहे, येथील दहशतवाद संपुष्टात आल्याचा दावा भाजपचा दावा आहे.

● नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडी विजयी झाल्यास राज्यात दहशतवाद पुन्हा वाढीस लागेल, असा इशारा भाजप नेते देत आहेत.

● दुसरीकडे विरोधकांनी जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळवून देण्याचे आश्वासन जनतेला दिले आहे.

● पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांच्यासह अनेकांनी पहिल्या टप्प्यासाठी प्रचारसभा घेतल्या.