न्यायमूर्ती अरुमुघस्वामी आयोगाच्या अहवालासंबंधात कायदेशीर सल्ला घेण्याचा निर्णय एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील  तामिळनाडू मंत्रिमंडळाने घेतल्याने आता माजी मुख्यमंत्री आणि एआयएडीएमके प्रमुख जे. जयललिता यांच्या कथित गूढ मृत्यूचे प्रकरण इतक्यात उलगडले जाणार नाही, यात शंका नाही. डिहायड्रेशन आणि ताप आल्यामुळे २२ सप्टेंबर २०१६ पासून चेन्नई येथील अपोलो रुग्णालयात जयललितांवर उपचार सुरू होते.  ५ डिसेंबर २०१६ रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. जयललितांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यामध्ये  यांच्या सोबत रहात असलेल्या शशिकला आणि डॉ. सिवाकुमार या दोघांची भूमिका महत्त्वाची होती.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जयललितांची जीवलग मैत्रीण असलेल्या शशिकला अनेक वर्ष सोबतच रहात होत्या. केंद्रीय यंत्रणेने त्यांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केल्यावर  आणि विविध प्रकरणांसंबंधात चौकशीचे आदेश दिल्यानंतरच्या काळात जायललिता प्रकरणातील शशिकलांच्या विरोधातील तपास हा अतिशय महत्त्वाचा आहे. जयललितांचे नातेवाईक आणि मुख्य सहाय्यक असलेले डॉ. सिवाकुमार हे त्यांचे वैयक्तिक चिकित्सकही होते. आजारी जयललिताना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी शशिकलांनी सर्वात आधी डॉ. सिवाकुमारना फोन केला होता.    

तत्कालिन आरोग्य मंत्री असलेले विजयभास्कर हे जयललिता यांच्या मंत्रीमंडळातील  त्यांचे एक विश्वासू अधिकारी होते. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यांनतर त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी रुग्णालयातच तळ ठोकला होता.   जयललितांच्या  रुग्णालयातील सीसीटीव्ही बंद करण्याच्या निर्णयाविषयी असलेल्या त्यांच्या  उत्तरदायित्वाकडे आयोगाच्या कामाची पद्धत माहीत असलेल्या सरकारी सूत्रांनी अंगुलीनिर्देश केला आहे. काही ठराविक गोष्टींसाठी जेव्हा सुरुवातीला रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला, तेव्हा  मुख्यमंत्री रुग्णालयात असल्याने ते सरकार आणि एआयएडीएमकेच्या आदेशांचे पालन करत असल्याचे सिद्ध झाले होते.  विजयभास्कर यांनी त्या काळात घेतलेल्या अनेक निर्णयासंबंधात त्यांना खुलासा करावा लागो शकतो, असे सरकारी सूत्रांचे मत आहे.    जयललिता यांच्या उपचारासंदर्भात, राज्याचे तत्कालीन कायदा मंत्री असलेल्या सी. वे. षण्मुगम यांनी माजी मुख्य सचिव पी. रामा मोहन राव यांच्या विरोधात चौकशीची मागणी केली होती.  राव यांच्या वर त्याकाळात भ्रष्टाचाराचे आरोप होते आणि ते वादग्रस्त अधिकारी असल्याचे म्हटले जात होते.