संतोष प्रधान

कर्नाटकातील तिरंगी निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाला सत्तेच्या समीकरणात नेहमीच महत्त्व प्राप्त होते. यंदाची निवडणूक भाजपसाठी सोपी नसल्याने देवेगौडा यांच्या पक्षाचा उपयोग करून घेण्याची भाजपची खेळी असू शकते. या दृष्टीनेच देवेगौडा आणि कुमारस्वामी या पितापुत्रांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

Rahul Gandhi And Arvind Kejriwal.
Delhi Election 2025 : काँग्रेसला हवी ‘आप’ची साथ, ‘हात’ मिळवण्यास केजरीवालांचा नकार
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
Congress Shiv Sena Thackeray faction leaders meet Chief Minister for opposition demand for Assembly Deputy Speaker Leader of Opposition post Print politics news
विधानसभा उपाध्यक्ष, विरोधी पक्षनेतेपदाची विरोधकांची मागणी; मुख्यमंत्र्यांची भेट
markadwadi villagers marathi news
मारकडवाडी ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करणे आवश्यक, रामदास आठवले यांची भूमिका
Tanaji Sawant ON Mahayuti Government
Cabinet Expansion : मंत्रिमंडळात जुन्या नेत्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार? शिवसेना नेत्याचं मोठं विधान
Markadwadi EVM Issue.
Markadwadi : “राम सातपुते फडणवीसांचं डबडं, ते वाजतच राहणार”, मारकडवाडी प्रकरणावरून उत्तम जानकरांची टीका

देवेगौडा यांच्या पक्षाचा पूर्वीएवढा प्रभाव सध्या राहिलेला नाही. जुन्या म्हैसूर विभागात या पक्षाची चांगली पकड आहे. वोकलिंग समाजाचे प्रभावक्षेत्र असलेल्या म्हैसूरू विभागात देवेगौडा यांनी आपले वर्चस्व कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे. म्हैसूरू पट्ट्यात भाजपला आतापर्यंत तेवढे यश मिळालेले नाही. या पट्ट्यात काँग्रेस आणि जनता दलात लढत होते. या पट्ट्यात भाजपला अपेक्षित यश मिळणार नसल्यास काँग्रेसला रोखण्याकरिता भाजप पडद्याआडून जनता दलाला मदत करेल, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

हेही वाचा… प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैशांचा व्यवहार काँग्रेसच्या आमदारावर शेकणार ?

भाजपने २००४ नंतर देवेगाौडा यांची मदत घेतली होती. काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता भाजप आणि देवेगौडा यांचे पक्ष एकत्र आले. त्यात निम्मा काळ मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा उभयतांमध्ये करार झाला होता. यानुसार पहिले दोन वर्षे देवेगौडा यांचे पुत्र कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले. भाजपकडे मुख्यमंत्रीपद सोपविण्याची वेळ आली तेव्हा देवेगौडा आणि कुमारस्वामी यांनी प्रादेशिक अस्मितेचा रंग देण्याचा प्रयत्न केला. यामुळेच भाजपबद्दल सहानुभूती निर्माण झाली. २००८च्या निवडणुकीत भाजपला सत्ता मिळाली व येडियुरप्पा दक्षिणेकडील राज्यातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री झाले.

हेही वाचा… राजू शेट्टी, संभाजीराजे यांची लोकसभेची तयारी सुरु

२०१८च्या निवडणुकीत भाजपला ११३चा जादुई आकडा गाठण्यात नऊ आमदारांचे संख्याबळ कमी पडले. काँग्रेसने मुख्यमंत्रीपद देऊ केल्याने जनता दलाने काँग्रेसशी हातमिळवणी करीत मुख्यमंत्रीपद मिळविले. तेव्हा भाजपने मदतीसाठी संपर्क केला असता मुख्यमंत्रीपदाची मागणी कुमारस्वामी यांनी केली होती. पण भाजपने मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिला होता, असे सांगण्यात येते.

हेही वाचा… Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटकात पुन्हा भाजप की काँग्रेस ? सत्ता कायम राखण्याचे भाजपपुढे मोठे आव्हान

नव्वदीच्या घरात असलेले देवेगौडा आता थकले आहेत. पक्षाची पूर्वीएवढी ताकदही राहिलेली नाही. अशा वेळी ३० ते ३५ जागा जिंकून सत्तेच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजाविण्याची देवेगौडा आणि कुमारस्वामी या पितापुत्रांचा प्रयत्न आहे. वोकलिंग आणि मुस्लीम मतदारांच्या पाठिंब्यावर जास्तीत जास्त जागा जिंकण्याची जनता दलाची योजना आहे. काँग्रेसला वातावरण अनुकूल ठरत असल्यास काँग्रेसच्या मतांमध्ये फूट पाडण्याकरिता भाजपचे धुरिण जनता दलाचा वापर करून घेण्याची शक्यता आहे. जनता दलाला सारी मदत अशा वेळी केली जाऊ शकते.

हेही वाचा… Maharashtra News Live : “संभाजीनगरमध्ये सर्वांनी शांतता राखावी”; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन, प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर…

देवेगौडा आणि कुमारस्वामी या दोघांचाही काँग्रेसचे सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांना विरोध आहे. सिद्धरामय्या हे एकेकाळी देवेगौडा यांचे निकटवर्तीय होते. पण देवेगौडा यांनी पुत्र कुमारस्वामी यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपविल्याने सिद्धरामय्या यांनी वेगळा मार्ग पत्करला. शिवकुमार हे वोकलिंग समाजाचे असून, त्यांंचे व कुमारस्वामी यांचे तेवढे सख्य नाही. यामुळेच काँग्रेसकडे सत्ता जाण्यापेक्षा कुमारस्वामी भाजपला मदत करण्याची शक्यचा नाकारता येत नाही, असे राजकीय वर्तुळात बोलले जाते.

Story img Loader