स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने कर्नाटक सरकारने काही जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. या जाहिरातींमुळे कर्नाटकात नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. एक जाहिरातीच्या व्हिडिओमध्ये काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्टांवर टीका करण्यात आली असल्यामुळे वाद रंगला आहे. या जाहिरातींमधून जवाहरलाल नेहरूंचा फोटो गहाळ झाल्यामुळे काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काँग्रेसने सत्ताधारी भाजपावर फाळणीच्या वेळी ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांचा अनादर केल्याचा आणि अखंड द्वेष बाळगला असल्याचा आरोप केला आहे.
फाळणीच्या स्मरण दिनानिमित्ताने भाजपाने आपल्या ट्विटर अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला आहे. यात भाजपाने लिहिले आहे “ज्यांना भारताचा सांस्कृतिक वारसा, सभ्यता, मूल्ये, तीर्थक्षेत्रे याबद्दल काहीच माहिती नव्हती, त्यांनी एकत्र राहणाऱ्या लोकांमध्ये तीन आठवड्यांत सीमारेषा आखली. या फुटीरतावादी शक्तींविरुद्ध लढण्याची जबाबदारी त्या वेळी कुठे होती?”
स्ट्राइक म्युझिक आणि आर्काइव्ह फुटेजचा वापर करून तयार केलेल्या व्हिडिओमध्ये काँग्रेसला दोष देण्यात आला आहे. बर्याच फुटेजमध्ये नेहरू, महम्मद अली जिना आणि कम्युनिस्टांना देशाच्या फाळणीला परवानगी दिली असल्याचा उल्लेख केला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की “१४ ऑगस्ट हा फाळणीचा स्मरण दिन म्हणून साजरा करण्याचा पंतप्रधानांचा खरा हेतू काय आहे? सध्या राजकीय लढाईसाठी अत्यंत क्लेशदायकरित्या ऐतिहासिक घटनांचा पायरी म्हणून वापर केला जात आहे. फाळणीत लाखो बेघर झाले आणि लाखोंनी आपला जीव गमावला. त्यांचे बलिदान विसरता कामा नये किंवा त्यांचा अनादर होता कामा नये.”
रमेश म्हणाले की “सत्य हे होते की हिंदुत्व विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांनी दोन राष्ट्र सिद्धांताची उत्पत्ती केली आणि जीनांनी ती सिद्ध केली”. ते पुढे म्हणाले की “सरदार पटेल यांनी लिहिले आहे की जर आपण फाळणी मान्य केली नाही तर भारताचे अनेक तुकडे होतील आणि संपूर्णपणे उद्ध्वस्त होईल.” ते पुढे म्हणाले, “भारतीय राष्ट्रीय काँग्रेस गांधी, नेहरू, पटेल आणि इतर अनेकांचा वारसा कायम ठेवेल ज्यांनी राष्ट्राला एकसंध करण्यासाठी अथक प्रयत्न केले. द्वेषाच्या राजकारणाचा पराभव होईल.” काँग्रेस नेते पवन खेरा यांनी ट्विट केले की, “मी अशा कुटुंबातून आलो आहे ज्याने फाळणीदरम्यान डझनभर सदस्य गमावले. संघ-लीग द्वंद्वगीताने एक वातावरण तयार केले ज्यामुळे घटना घडल्या. आपल्या पूर्वजांच्या दुष्कृत्यांसाठी माफी मागून पंतप्रधान वातावरण व्यवस्थित करू शकतात.