दयानंद लिपारे

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारपासून शिवसेनेचे अधिवेशन कोल्हापुरात सुरू होत असताना या जिल्ह्यातच शिंदेसेना रुजवण्याचे आव्हान असणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला कोल्हापुरातून मोठ्या अपेक्षा असल्या तरी त्यासाठी त्यांची भिस्त भाजप – अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसवर अवलंबुन असणार आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचा पैस अद्यापतरी कोल्हापूर जिल्ह्यात विस्तारलेला दिसत नाही.

Eknath shinde, shiv sena role, Airoli, belapur assembly election
ऐरोलीतील बंडखोरांना शिंदे गटाचे अभय? बेलापुरात कारवाई, ऐरोलीत आस्ते कदम
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले
maharashtra assembly election 2024 religious polarization experiment in solapur city central assembly elections
लक्षवेधी लढत : धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग यशस्वी होणार?
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या महत्त्वाच्या राजकीय उपक्रमांची सुरुवात कोल्हापुरातून करत असत. एकनाथ शिंदे यांनीही हाच पायंडा पाडला आहे. राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्ताने शिवसेनेचा भगवा झंजावात कोल्हापुरात निर्माण करण्याची निर्माण करण्याची त्यांची योजना आहे. शिवसेनेच्या स्थापनेनंतर पहिले राष्ट्रीय अधिवेशन मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात होत आहे. यासाठी शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी तयारी चालू केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यानिमित्त शिवसैनिकांत उत्साह आहे.

हेही वाचा… मतदारसंघ आढावा : उस्मानाबाद (धाराशिव); ठाकरे गट वर्चस्व राखणार की महायुती आव्हान देणार ?

लोकसभेचे खडतर आव्हान

राज्यात महायुतीचे शासन आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व जागा जिंकण्याचे ध्येय त्यांनी ठेवले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसंकल्प अभियानाद्वारे राज्यभर प्रचार मेळावे घेऊन निवडणुकीचे रणसिंग फुंकायला सुरुवात केली आहे. त्याचा पुढचा टप्पा पक्षाच्या कोल्हापुरात होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये गाठला जाणार आहे. एकनाथ शिंदे कोल्हापुरात येत असताना जिल्ह्यातील दोन्ही जागा राखणे हे त्यांच्या समोरचे कडवे आव्हान असणार आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे अर्धा डझन कोल्हापूर दौरे झाले. कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. इतके करूनही शिंदेसेनेला लोकसभेसाठी वातावरण कितपत अनुकूल हा डसणारा प्रश्न आहे. कोल्हापूरचे संजय मंडलिक व हातकणंगलेचे धैर्यशील माने यांच्या विषयीचे सांगितले जाणारे अहवाल हे नकारात्मक आहेत. लोकसंपर्काचा अभाव, रखडलेली विकास कामे. मतदारांशी तुटलेली नाळ, ठाकरेसेनेपासून घेतलेली फारकत यामुळे त्यांच्याविषयी जनमत प्रतिकूल बनत चालले आहे. त्यामुळेच हा धोका घेण्यापेक्षा भाजपनेच या दोन्ही जागांवर आपला दावा सांगायला सुरुवात केली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा अशी मागणी केली आहे. कोल्हापूर महानगर भाजपने तसा ठराव केला आहे. शिवाय, खासदार धनंजय महाडिक, शौमिका महाडिक यांनी लढण्याची तयारी दाखवली आहे. हातकणंगले मधूनही भाजपच्यावतीने माजी आमदार सुरेश हाळवणकर, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे, शिरोळ मधून संजय पाटील, मराठा क्रांती आरक्षण मोर्चाचे नेते सुरेश पाटील यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. परिणामी, राष्ट्रीय अधिवेशन भरत असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेच्या या दोन जागा मिळवणे हे शिंदे यांच्यासमोर कडवे आव्हान असणार आहे.

हेही वाचा… ‘उपऱ्यां’ना राज्यसभेची उमेदवारी देण्याची परंपरा कायम !

शिंदे यांनी कोल्हापूरसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला हे खरे आहे. मागील काही दशकाच्या तुलनेने योजना मंजुरीचा दणका उडाला आहे. तथापि, निधीच्या विनियोगाबद्दल तक्रारींचा मारा होऊ लागला आहे. कोल्हापुरात १०० कोटीचे रस्ते होणार असा गाजावाजा केला असला तरी त्यातील भ्रष्टाचारावर खुद्द पालकमंत्री हसत मुश्रीफ यांनीच महापालिकेच्या प्रशासक के. मंजू लक्ष्मी, वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाहीरपणे खडसावले होते. सीपीआर जिल्हा रुग्णालयातील औषध घोटाळा चर्चेत आहे. अशातच विरोधकांनीही अशा मुद्द्यांचे भांडवल करण्यास सुरू केले जात असल्याने शिंदे सरकारची प्रतिमा उंचावण्याऐवजी डागाळली जात आहे.

हेही वाचा… काँग्रेसच्या चेहऱ्यावरील जातवर्चस्वाचा ओरखडा पुसण्याचा प्रयत्न

विधानसभेचे गणित

मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अशा भावना शिवसेनेकडून व्यक्त केल्या जात आहेत. तसे व्हायचे असेल तर विधानसभेसाठी शिंदे यांच्यामागे राज्यातून तसेच कोल्हापुरातून किती आमदार असणार यावर सारे गणित अवलंबून असणार आहे. महायुतीच्या जागा वाटपात कोल्हापुरात दोन जागा वाट्याला येण्याची शक्यता आहे. येथेही महाविकास आघाडीचे कडवे आव्हान असल्याने विधानसभा निवडणूक जिल्ह्यातून फारसे यश येईल असे सध्यस्थितीत दिसत नाही.