कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी आणि संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यातील राजकीय मतभेद वाढीस लागले आहेत. संसद ते शिवार अर्थात लोकसभेची उमेदवारी आणि त्यातून चालणारे पक्षाचे राजकारण या विषयावरून दोघांमधील अंतर आणखीनच रुंदावले आहे. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्यासोबत चळवळीत काम केल्यानंतर राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. त्यांच्यासमवेत सदाभाऊ खोत व रविकांत तुपकर यांचाही समावेश होता. शेट्टी यांच्याशी मतभेद झाल्यानंतर खोत यांनी स्वाभिमानीला रामराम ठोकून ठोकला. भाजपशी सत्तासोबत करून राज्यमंत्रपद मिळवले. पुढे रयत क्रांती संघटना स्थापना केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याच काळामध्ये रविकांत तुपकर यांची व खोत यांची मैत्री वाढली. रयत क्रांतीच्या माध्यमातून विधानसभेची उमेदवारी मिळेल असे तुपकर यांना वाटत असल्याने ते स्वाभिमानीपासून बाजूला गेले होते. उमेदवारीची अपेक्षा फोल ठरल्याने त्यांनी विधानसभा निवडणूक संपल्यानंतर पुन्हा शेट्टी यांची भेट घेऊन कोल्हापुरात घरवापसी केली होती. त्यानंतर पुढील ३ वर्ष शेट्टी – तुपकर यांचे ऐक्य कायम राहिले. मात्र लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागली तसे गेल्या वर्षभरापासून दोघातील अंतर कमालीचे वाढत चालले आहे. हे पाहून खोत यांनी तुपकर यांची भेट घेऊन पुन्हा मैत्र जागवले.

हेही वाचा : वंचितमुळे अकोल्यातील राजकीय समीकरणे बदलणार ? भाजपपुढे आव्हान

मागील ऑगस्ट महिन्यामध्ये तुपकर यांनी राजू शेट्टी यांना दहा पानी पत्र पाठवून अनेक प्रश्न उपस्थित करताना नाराजीचे दर्शन घडवले होते. पुणे येथे पक्षाच्या शिस्तपालन समितीमध्ये हा विषय गाजला होता. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील यांनी तुपकर यांना फटकारले होते. हे पेल्यातील वादळ लवकरच संपेल असे म्हणत शेट्टी यांनी सावरून घेण्याचा प्रयत्न केला खरा. पण हे वादळ आता अधिकच फोफावत चालले असून त्यात स्वाभिमानीच्या आणखी एका फुटीची बीजे रोवली गेली आहेत.

लोकसभेवरून संघर्ष

अलीकडे तुपकर यांनी स्वतंत्र वाटचाल सुरू केल्याचे दिसत आहे. नोव्हेंबर महिन्यात बुलढाण्यात पंधरवड्याची एल्गार यात्रा काढली. तेव्हा कोठेही स्वाभिमानीचे बॅनर किंवा राजू शेट्टी यांचा फोटो नव्हता.त्यातून तुपकर यांनी शेट्टी यांच्याशी फारकत घेतल्याचे संकेत मिळाले. तथापि आजही तुपकर हे स्वाभिमानीचा कार्यकर्ता असून आपल्याला कोणी संघटनेतून हटवू शकत नाही, असे ठणकावून सांगतात. त्याचा रोष आहे तो राजू शेट्टी यांच्या लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाच्या स्वार्थी भूमिकेवर. युती – आघाडी करताना शेट्टी यांच्याकडून जागा वाटपाचा आकडा वाढवून सांगितला जातो. प्रत्यक्षात कमी जागा घेतल्या गेल्याने कार्यकर्त्यांची मेहनत, प्रयत्न वाया जातात. स्वतःच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या राजकारणासाठी कार्यकर्त्यांचा किती काळ बळी दिला जाणार, अशी विचारणा तुपकर करतात. मागील वेळीही वर्धा मध्ये सुबोध मोहिते, सांगलीमध्ये महेश खराडे यांनी स्वाभिमानी कडून तयारी केली होती. पण त्यांचा हिरमोड करण्यात आला. हा पूर्वानुभव पाहता यावेळी बुलढाणा लोकसभा मतदारसंघात जनतेच्या मागणीनुसार स्वतंत्रपणे लढणार आणि यश मिळवणार,असा विश्वास रविकांत तुपकर यांनी’ लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला. मी आजारी असतानाच्या काळात शेट्टी बुलढाण्यात होते. तरीही ते शेतकरी आंदोलनाकडे फिरकले नाहीत,असा आरोप त्यांनी केला आहे.

हेही वाचा : फुटीनंतरही उद्धव ठाकरे गटाचे वर्चस्व कायम राहिलेल्या परभणीत भगवा पुन्हा फडकणार ? 

वाटा वेगळ्या

राजू शेट्टी यांनी रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी कडून लढावे अशी अपेक्षा व्यक्त करताना दिसतात. बुलढाण्यामध्ये मी होतो तेव्हा तेथील आंदोलन सर्वपक्षीय होते. ते स्वाभिमानीचे नव्हते. अन्य पक्षाच्या आंदोलनात शिरकाव करणे हा माझा स्वभाव नाही. बुलढाणासह अनेक मतदारसंघांमध्ये अनेकांनी तयारी केली आहे. बुलढाणा मध्ये नकार मिळाला तर अन्य पर्यायांचा विचार केला जाईल. रविकांत तुपकर यांचा बुलढाणा मध्ये प्रशांत डिक्कर यांच्याशी मतभेद आहेत. त्याचा राग इतरांवर काढला जात आहे. पक्ष शिस्त पाळताना अशा बाबी करून चालत नाहीत, असे शेट्टी यांचे म्हणणे आहे. अर्थात ही मतांतरे पाहता राजू शेट्टी आणि तुपकर यांच्यातील वाटा वेगळा झाल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे.