कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचत असताना कोल्हापुरातील गादीचा वाद वेगवेगळ्या वळणांनी तापत चालला आहे. आता तर राजा विरुद्ध राजा, गादी विरुद्ध गादी , वारस विरुद्ध वारस असे वादाला वादग्रस्त वळण मिळाले आहे. राजघराण्याचा ‘ खरा वारसदार मीच ‘ अशी भूमिका म्हणत श्रीमंत शाहू महाराज आणि धुळ्याचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे मैदानात उतरले आहेत. वादाला राजकीय किनार असल्याचे आरोपही होऊ लागले आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यावेळी छत्रपती घराण्यातील उमेदवारीवरून चर्चेत आली आहे. महाविकास आघाडीकडून राजर्षी शाहू महाराजांचा वारसा असलेले श्रीमंत शाहू महाराज काँग्रेसचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात महायुतीकडू संजय मंडलिक या शिंदेचे खासदारांनी आव्हान दिले आहे. छत्रपती घराण्यातील उमेदवारी असल्याने त्यावरून विरोधकांनी गादी , वारस हा मतदारांना आकर्षित करणारा मुद्दा उपस्थित करायला सुरुवात केली आहे.

अर्थात त्याला तोंड फोडले ते संजय मंडलिक यांनीच. निवडणुकीआधी मंडलिक यांना मौनी खासदार अशा शब्दात विरोधकांनी हिणवयाला सुरुवात केली होती. याच मुखदुर्बळ खासदारांनी गादीचा विस्फोटक मुद्दा प्रचारात आणल्याने वादाचे रान पेटले. १९६२ सालच्या निद्रिस्त दत्तक विधान प्रकरणाला मंडलिक यांनी नव्याने उकळी दिली. शाहू महाराज यांच्या दत्तक विधानाला जन आंदोलनात्मक विरोध झाल्याचे संदर्भ त्यांनी दिले. ‘ राजर्षी शाहू महाराज यांचे विचारांचे खरे वारसदार आताचे शाहू महाराज नव्हे; तर सामान्य जनता आहे ‘, असा मुद्दा त्यांनी प्रचारात आणला. अशा टिकेकडे लक्ष द्यायचे नाही अशी भूमिका छत्रपती घराण्यातील शाहू महाराज, संभाजीराजे, मालोजीराजे अशा सर्वानीच घेत मंडलिक यांना अनुल्लेखाने मारायला सुरुवात केली. कोल्हापुरातील शाहू इतिहासकारांनी मंडलिक यांनी मांडलेले मुद्दे चुकीचे असल्याचे नमूद करत शाहू महाराज यांचे दत्तक विधान वैध असल्याचा निर्वाळा दिला होता. इकडे त्यावर टिच्चून मंडलिक यांनी गादीचा मुद्दा तापवायचे धोरण काही सोडले नाही. इतकेच काय त्याच्या वकील सुपुत्रांनीही शाहू महाराजांना टीकेचे लक्ष्य केले. यातून प्रकरणाची धग कायम राहिली.

crores of revenue is not being collected in Gadchiroli due to sand smugglers instalments
विकासात राज्याचा पहिला जिल्हा होऊ पाहणाऱ्या गडचिरोलीत वाळू तस्करांच्या हप्त्यांमुळे…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
tur dal price , tur dal price sangli , tur dal,
तूरडाळ सामान्यांच्या आवाक्यात !
Parents who give nylon manja to their children are also facing action by nashik police
मुलांना नायलॉन मांजा देणारे पालकही कारवाईच्या फेऱ्यात
Bed Sheet production in Solapur
सोलापूरच्या चादर व्यवसायाचे पानिपत!
nylon manja loksatta news,
पुणे : नायलॉन मांजा विक्री करणारी महिला ताब्यात, संक्रातीत पतंगबाजीसाठी छुप्या पद्धतीने मांजा विक्रीचा प्रकार उघड
Raigad district administration will implement bamboo cluster scheme planting 35 lakh bamboos
रायगडात ३५ लाख बांबूची लागवड होणार
Gold and silver ornaments worth 15 lakhs on idol of goddess were robbed
देवीच्या मूर्तीवरील १५ लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

हेही वाचा : ज्योतिरादित्य शिंदे म्हणतात, काँग्रेसकडे देशाला देण्यासारखं काही राहिलेलं नाही

खऱ्या वारशाचा दावा

आता या वादाला थेट राजघराण्याच्याच वादाची किनार मिळाली आहे. संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. या सभेत सहभागी होण्यासाठी इचलकरंजी लोकसभा निवडणूक त्यांनी १९८४ साली काँग्रेसचे खासदार बाळासाहेब माने यांच्याविरोधात समाजवादी काँग्रेसकडून लढवली होती. पराभूत झाले तरी ५५० किमीवरून आलेल्या राजघराण्यातील तरुणाने घेतलेली मते लक्षवेधी ठरली होती. प्रचाराच्या निमित्ताने आलेल्या कदमबांडे यांनी कोल्हापूरच्या राजगादीचा खरा वारस कोण, या वादावर नव्याने टिपणी केली. ‘ राजर्षी शाहू महाराज व छत्रपती राजाराम महाराज यांच्या रक्तामासाचा, विचाराचा वारसदार मीच आहे. ते संपत्तीचे वारसदार होऊ शकतात ,’ अशा शब्दात शाहू महाराजांचे पणतू राजवर्धन कदमबांडे यांनी आपली भूमिका मांडताना श्रीमंत शाहू महाराज यांच्यावर टीका केली होती. ‘ जुना राजवाडा येथे माझे वास्तव्य होते. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे राजाराम महाराजांचे वारसदार नाहीत. प्रिन्सेस पद्माराजे यांचा मुलगा म्हणून या गादीवर माझा हक्क आहे,’ असे सांगत कदमबांडे यांनी खरा वारसदार आपणच असल्याचा दावा मांडला.

हेही वाचा : इंदूरमध्ये काँग्रेस उमेदवार भाजपात; निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सोडणाऱ्या नेत्यांची यादी

छत्रपती बोलते झाले !

कालपर्यंत कोल्हापुरात गादीचा वारसदार, मान गादीला मत मोदीला, मान गादीला मतही गादीला अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या अंगाने टीकाटिपणी होऊ लागली होती. थेट राजघराण्याची संबंधित कदमबांडे यांनी तोफ डागल्याने या वादात श्रीमंत शाहू महाराज यांना उतरणे भाग पडले. विरोधकांच्या जाळ्यात महाराजांना एका अर्थी अलगद अडकले. ‘ राजर्षी शाहू महाराज यांच्या कन्या अक्कासाहेब महाराज विक्रमसिंह पवार अर्थात छत्रपती शहाजी महाराज यांच्या कन्या शालिनी राजे यांचा मी पुत्र आहे. म्हणजे मी राजर्षी शाहू महाराज यांचा खापर पणतू असल्याने थेट रक्ताचा वारसदार आहे,असा ऐतिहासिक दाखला त्यांना द्यावा लागला. ज्या राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजासाठी अहोरात्र केले. अशा विचारधारेच्या विरोधात राजवर्धन कदमबांडे यांचे काम सुरू आहे. ते स्वतःला राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसदार म्हणतात याचे आपल्याला मनस्वी दुःख होत आहे, अशी खंत शाहू महाराज यांनी बोलून दाखवली. दरम्यान, राजवर्धन कदमबांडे यांना खास कोल्हापूरला विमानाने बोलावून घेतले. हा वाद उकरून काढायसाठीच हे प्रकरण भाजपने घडवून आणले आहे, असा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात हे प्रकरण आणखी कसे वळण घेते याचे कुतूहल निरीक्षकांना आहे.

Story img Loader