दयानंद लिपारे

कोल्हापूर : राज्यात दोन पक्षांचे सरकार असताना कोल्हापूरमध्ये अंतर्गत मध्ये मतभेदाने उचल खाली होती. आता त्यात राष्ट्रवादी हा तिसरा भिडू मिसळल्याने त्याची तीव्रता वाढत आहे. कोल्हापूर भाजपने पालकमंत्री बदलण्याची मागणी करत दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला आहे. इचलकरंजी भाजपने जिल्ह्यातील एक मतदारसंघ पक्षाकडे मिळावा असे म्हणत धैर्यशील माने यांच्या जागेवर नजर रोखली आहे. जिल्ह्यातील दोन आमदार सत्तेत सामावले असल्याने तेथील इच्छुकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे.

A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
Two arrested in conspiracy to murder Ambernath MLA Dr Balaji Kinikar thane news
शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट ? अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कटात दोघे अटकेत
Vishal Gawli in custody at Naupada police station thane news
विशाल गवळी नौपाडा पोलीस ठाण्यातील कोठडीत, रेल्वे मार्गे गाठले होते बुलढाणा
butibori flyover collapse
बुटीबोरी पुल खचल्यावर सरकारला जाग, सुरक्षा ऑडिटबाबत फडणवीस गडकरींशी चर्चा करणार
Satish Wagh murder case, Satish Wagh Wife ,
सतीश वाघ खून प्रकरणात पत्नी सामील, मारेकऱ्यांना पाच लाखांची सुपारी; पत्नी गजाआड

गतवर्षी जूनमध्ये शिंदे शिवसेना व भाजप असे नवे सत्ता समीकरण आकाराला आले. गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापुरात एकनाथ शिंदे शिवसेना व भाजप यांच्यात या ना त्या निमित्ताने खटके उडत आहेत. राज्यात दोन्ही पक्षाचे सरकार असताना राज्य शासनाने मंजूर केलेल्या योजना, निधी याची माहिती केवळ शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून दिली जात असल्याने भाजप अंतर्गत खदखद पक्षाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी मांडली आहे. इचलकरंजी महापालिकेत राज्य शासनाच्या माध्यमातून येत असलेल्या निधीची माहिती जिल्हाप्रमुख रवींद्र माने हे देत असतात. त्यावरून भाजप अध्यक्ष अनिल डाळ्या यांनी माने यांना समक्ष जाब विचारला होता. अशा पद्धतीने परस्पर घोषणा करणे अपेक्षित नाही, असे मत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त करून सत्तेच्या भागीदारीची जाणीव करून दिली आहे.

हेही वाचा… सत्तेतील ‘दादा’प्रवेशाने ठाण्यात भाजप खुशीत

भाजपचा डोळा लोकसभेवर

कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिंदे गटाकडे आहेत. यापैकी एक जागा भाजपला मिळावी अशी मागणी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी पत्रकार परिषदेत केली. हा हुंकार नेमका इचलकरंजीतून उमटण्याला राजकीय स्थानमाहात्म्य आहे. भाजपचा डोळा हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाठोपाठ हाळवणकर हे लोकसभेसाठी इच्छुक असल्याच्या चर्चेनेही वेग पकडला आहे. याची खबरबात लागल्यानंतर शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच खासदार धैर्यशील माने यांनी हाळवणकर यांच्याशी संपर्क साधून मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे. इतके झाले असले तरी भाजप आपल्या मागणी पासून बाजूला हटण्याची चिन्हे अद्याप तरी दिसत नसल्याने लोकसभेच्या जागेवरून स्पर्धा,संघर्ष सुरू राहणार असे दिसत आहे.

हेही वाचा… जळगावातील राष्ट्रवादी शरद पवार यांच्याबरोबर

पालकमंत्री टीकेचे धनी

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांची कामगिरी तशी सुमार राहिली आहे. आठवड्यातून एकदा कोल्हापुरात येऊन बैठकाचे सत्र आवरायचे नि पुन्हा कोकणच्या दिशेने धाव घ्यायची असा त्यांचा क्रम ठरला आहे. जिल्ह्यातील महत्त्वाची कामे प्रलंबित राहिली असल्याने नाराजी आहे. कोल्हापूरचे पर्यटन आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याच्या राणा भिमीदेवी थाटाच्या घोषणा त्यांच्याकडून होत असताना महालक्ष्मी, जोतिबा यासारख्या महत्वाच्या देवस्थानांच्या विकास रखडला आहे. हा मुद्दा लक्षात घेऊन कोल्हापूर भाजपचे महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, प्रदेश सचिव महेश जाधव यांनी पर्यटन पालकमंत्र्यांना हटवण्यात यावे, अशी मागणी केली आहे. अर्थात, ही बाब जिल्हा प्रशासनाच्या हाती नाही तर ते राज्यकर्त्यांचे काम आहे. यानिमित्ताने भाजपने शिंदे गटावर कुरघोडी केली आहे. शिंदे शिवसेनेच्या विरोधात कोणी काही बोलले की प्रतिक्रिया देण्यास टपून असणाऱ्या स्थानिक नेत्यांनी आणि स्वतःला प्रति पालकमंत्री म्हणणाऱ्यांनी मौन पाळल्याने त्याचीही चर्चा होत आहे. हे लोक सत्तेसाठी पालकमंत्री केसरकर यांना चिकटले असल्याची तिखट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

हेही वाचा… जळगाव जिल्ह्यात तीन पक्षांचे तीन मंत्री

नव्या मित्रांमुळे कुरबुरी

शिंदे शिवसेना – भाजप या दोन सत्तेमध्ये राष्ट्रवादी हा नवा पक्ष सामील होताच त्याचेही पडसाद जिल्ह्याच्या राजकारणात उमटायला सुरुवात झाली आहे. हसन मुश्रीफ हे थेट मंत्री झाले असल्याने कागलचे भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे कमालीचे नाराज झाले आहेत. शेजारच्या चंदगड मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील हे सत्ताधारी पक्षात सहभागी झाले आहेत. गतवेळी तेथून भाजपकडून निवडणूक लढवलेले अशोक चराटी, भाजपचे बंडखोर शिवाजी पाटील, माजी मंत्री भरमू पाटील यांच्यात नाराजी निर्माण झाली आहे. त्यांच्या समर्थकांनी कडवट प्रतिक्रिया नोंदवत खदखद व्यक्त केली आहे. त्यामुळे हा असंतोष उफाळण्या पूर्वी शमवला जाणार की तो आणखी उसळून याची उत्सुकता आहे.

Story img Loader