कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आतापासूनच विधानसभा निवडणुकीचे वारे गतीने वाहू लागले असताना नवे चेहरेही या आखाड्यात उतरण्यास उतरताना दिसत आहेत. दुसरीकडे मातब्बर राजकीय वारसा असलेले अर्धा डझनाहुन अधिक वारसदारांना आमदारकीचे वेध लागले आहे. संघर्षपूर्ण लढतीत मतदार त्यांचा मार्ग प्रशस्त करणार का याचे कुतूहल असणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात अनेक बड्या राजकीय घराण्यांचे वर्चस्व राहिले आहे. पूर्वी ते काँग्रेसमध्ये सर्वाधिक संख्येने होते. राष्ट्रवादीचा उदय झाल्यानंतर निम्म्या प्रस्थापितांनी हातावर घड्याळ बांधले. केंद्रात राज्यात भाजपचे स्थान उंचावल्यानंतर अनेक नेते या पक्षात आले. त्यामुळे आगामी लोक विधानसभा निवडणुकीसाठी या विविध पक्षातील मातब्बर राजकीय घराण्यातील वारसदार राजकीय वारसा पुढे चालवण्यासाठी आमदारकी मिळवण्याच्या हेतूने आखाड्यात उतरताना दिसत आहेत.

raigad district land deals
रायगड जिल्ह्यात जागा जमिनींचे व्यवहार जोमात, नऊ महिन्यांत पावणे तीन हजार कोटींचा महसूल जमा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
BJP member registration deadline has passed but not even half of target has been met
भाजप सदस्य नोंदणी! ‘तारीख पे तारीख’ सदस्य जुळता जुळेना
Chhatrapati Sambhajinagar, water , arrears ,
छत्रपती संभाजीनगरमध्ये नळजोडणीची १२१ कोटींची थकबाकी
Rane family on Sindhudurg DPDC
सिंधुदुर्ग डीपीडीसी पूर्णपणे राणे कुटुंबीयांच्या ताब्यात; इतर कोणत्या जिल्ह्यात एकाच कुटुंबाचा वरचष्मा?
upper tehsil office at ashvi in sangamner taluka
संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालय
National Sports Championship inaugurated in Uttarakhand sports news
तंदुरुस्त भारत घडवा! पंतप्रधान नरेंद्र मोदींचे युवकांना आवाहन; उत्तराखंडमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
Uttarakhand UCC portal marriage registrations
Uttarakhand UCC: समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर उत्तराखंडमध्ये विवाह नोंदणी कशापद्धतीने सुरू आहे?

हेही वाचा : ‘आता पाठिंबा नाही’ म्हणणाऱ्या बिजू जनता दलाने गेल्या दशकभरात कशाप्रकारे निभावली आहे भाजपाशी दोस्ती?

जिल्ह्याच्या पूर्वेकडून सुरुवात केली तर शिरोळ मतदारसंघात दिवाणगत आमदार स. रे. पाटील यांचे सुपुत्र, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष, उद्यान पंडित गणपतराव पाटील हे काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची तयारी करीत आहेत. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यांच्या वडिलांनी विठ्ठलराव नाईक निंबाळकर यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासह महत्त्वाची जबाबदारी निभावलेली होती. करवीर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांचे पुत्र, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता राहुल पाटील यांनी मतदारसंघात संपर्क वाढवलेला असून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

वडील थांबले तर

जिल्ह्यातील दोन मतदारसंघात नव्या पिढीचे निवडणूक लढविण्याचे स्वप्न वडिलांच्या इशाऱ्यावर अवलंबून असेल. इचलकरंजीत माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे नातू , माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी विधानसभेची तयारी चालवली आहे. त्यांचे वडील माजी मंत्री, आमदार प्रकाश आवाडे हे पुन्हा निवडणूक लढवण्याबाबत कोणती भूमिका घेतील यावर त्यांचा राजकीय प्रवास पुढे अवलंबून राहील. कागल मध्ये ठाकरे सेनेकडून पुन्हा एकदा माजी आमदार संजयसिंह घाटगे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र, घाटगे घराण्यात आजवरच्या निवडणुकीत अपराजित राहिलेल्या जिल्हा परिषदेचे माजी सभापती अंबारीशसिंह घाटगे या धाकट्या पातीला संधी देण्याच्या हालचाली सुरू आहेत.

हेही वाचा : लोकसभेत विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधींकडे कोणते अधिकार असतील?

शाहूवाडीत उत्सुकता

शाहूवाडीचे माजी आमदार बाबासाहेब पाटील यांचे सुपुत्र माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर हे लोकसभेची निवडणूक जिंकू शकले नाहीत. त्यांच्या शाहूवाडी तालुक्यात २२ हजाराचे भक्कम मताधिक्य मिळाले होते. लोकसभा निवडणुकी वेळी सरुडकर यांनी खासदार म्हणून काम पाहावे तर विधानसभेसाठी रणवीरसिंग गायकवाड यांना संधी द्यावी अशी चर्चा झाली होती. माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड यांचे नातू , जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांना संधी मिळाली तर ते विधानसभा निवडणूक लढवताना दिसतील.

हेही वाचा : लोकसभा उपाध्यक्ष पदाला इतके महत्त्व का? आजवर किती वेळा विरोधी पक्षाच्या खासदारांनी उपाध्यक्षपद भूषवलं?

महिलांना संधी

चंदगड विधानसभा मतदारसंघात विधानसभेचे दिवंगत अध्यक्ष बाबा कुपेकर, माजी आमदार संध्याराणी यांच्या कन्या नंदिनी बाभुळकर या शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यादृष्टीने त्यांनी संपर्क वाढवलेला आहे. कोल्हापूर दक्षिण मध्ये भाजपकडून अमल महाडिक यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. पण महिलांना संधी हा मुद्दा आला तर त्यांच्या पत्नी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या नावाची चर्चा आहे. अशा पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात मातब्बर घराण्यातील पुढची पिढी रिंगणात उतरतील असे चित्र आहे.

Story img Loader