कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर होण्याच्या प्रक्रियेने गती घेतली असताना महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडाचे झेंडे रोवले जात आहेत. इचलकरंजी व चंदगड मध्ये दोन्हीकडे तर   कोल्हापूर  उत्तर, करवीर, हातकणंगले येथे एका पक्षात बंडखोरी निश्चित असून ती रोखाने दोन्ही आघाड्यांसमोर आव्हान असणार आहे.  

  भाजपच्या पहिल्या यादीत कोल्हापूर दक्षिण मध्ये माजी आमदार अमल महाडिक तर इचलकरंजीत राहुल आवाडे यांचा समावेश आहे. आवाडे यांना उमेदवारी मिळणार हे गृहीत धरून भाजपमधील एक गट नाराज होता. याची चुणूक प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित झालेल्या मेळाव्यात दिसली. त्यांची पाठ वळताच माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी आवाडे यांच्या उमेदवारीला विरोध करीत अपक्ष म्हणून लढण्याची घोषणा केल्याने भाजपमधील पहिली बंडखोरी पुढे आली. शुक्रवारी भाजप कार्यालयात आवाडे पिता पुत्रांच्या प्रवेशावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी शेळके यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. आवाडे यांच्या उमेदवारीबाबत एक वर्ग पडद्याआडून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने वा राष्ट्रवादीचे महानगर अध्यक्ष विठ्ठल चोपडे यांना पाठबळ देण्याची शक्यता आहे. एकूणच नाराज ‘विठ्ठलाचा झेंडा’ हाती घेतील अशा हालचाली आहेत.याच मतदारसंघात शरद पवार राष्ट्रवादीकडून मदन कारंडे तर काँग्रेस कडून शहराध्यक्ष संजय कांबळे यांनी उमेदवारीचा प्रबळ दावा केला असताना संजय तेलनाडे यांची बंडखोरी अटळ मानली जात आहे.

PM Narendra Modi on Swachh Bharat Abhiyan
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं विरोधकांना उत्तर, “स्वच्छ भारत योजनेची खिल्ली उडवणाऱ्यांना सांगतो, आम्ही रद्दी विकून २३०० कोटींचा निधी…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
What Rahul Gandhi Said?
Rahul Gandhi : राहुल गांधींचं वक्तव्य, “मेक इन इंडिया चांगली योजना, पंतप्रधानांनी प्रयत्नही केले पण…”
controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
JPC Waqf Amendment Bill by approving 14 amendments moved by NDA members
वक्फ विधेयकाला हिरवा कंदील; रालोआच्या १४ दुरुस्त्या ‘जेपीसी’मध्ये मंजूर, विरोधकांच्या सर्व सूचना अमान्य

हेही वाचा >>>नरेश म्हस्के यांच्या खासदारकीला आव्हान; जप्त मतदान यंत्र पुन्हा निवडणूक आयोगाकडे

 चंदगड मध्ये सत्तारूढ आणि विरोधकांत बंडाचे वारे जोमाने वाहत आहे. अजित पवार यांनी आमदार राजेश पाटील यांची उमेदवारी जाहीर केली असताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गतवेळचे बंडखोर शिवाजी पाटील यांच्या नावाची घोषणा केल्याने महायुतीत ठिणगी पडली आहे. येथे शिवाजी पाटील यांची बंडखोरी अटळ आहे. दुसरीकडे शरद पवार  राष्ट्रवादीकडून विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबा कुपेकर यांच्या कन्या नंदा बाभुळकर यांना विरोध करीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे नेते एकवटलेले आहेत. बंडखोरांपैकी एकास उभे करून सांगली पॅटर्न राबवण्याची खलबते सुरु आहेत.

कोल्हापूर उत्तर मध्ये काँग्रेसला उमेदवारी देण्याला शिवसेना – राष्ट्रवादीने विरोध केल्याने मविआ अंतर्गत वारे तापले आहे. याची परिणीती बंडखोरीत होण्याची शक्यता वाढली आहे.  करवीर मध्ये एकनाथ शिंदे यांचे समर्थक माजी आमदार चंद्रजीत नरके आणि  जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे यांच्यात कमालीची चुरस असून याचे पर्यवसन बंडखोरीत  होणार असे दिसत आहे. हातकणंगले राखीव मध्ये आमदार राजू आवळे यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत असताना उद्धव ठाकरे सेनेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी सवतासुभा मांडण्याचे डावपेच सुरु केले आहेत. यामुळे जिल्ह्यातील निम्म्या मतदारसंघात बंडखोरीचे झेंडे रोवले जात असून हे प्रमाण वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. 

Story img Loader