दयानंद लिपारे

कोल्हापूर : केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांचे चुकीच्या धोरणावर नावाने टीकास्त्र डागत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी राजकीय दिशा कोणती राहणार यावर कोल्हापूरच्या दोन दिवसाच्या दौऱ्यात वारंवार भाष्य करीत आपल्यावरील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याची जवळीक राखताना पवार यांनी पुरोगामी विचारधारा पुन्हा एकदा अधोरेखित केली. निवडणुकीला विचारपूर्वक सामोरे जाण्याची त्यांची भूमिका दिसून आली.

Diwali festival, celebration, relationship, family
दिवाळी: अर्थात नात्यांचा उत्सव
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
assembly elections have led to huge increase in the number of Diwali Pahat events
उदंड जाहल्या ‘दिवाळी पहाट’
Sharad Pawar Nagpur, Sharad Pawar latest news,
जागांच्या अदलाबदलीत पवारांची यशस्वी खेळी, राष्ट्रवादीला नागपूर शहरात एक जागा
akola shivsena
परंपरागत काँग्रेसच्या जागांवर शिवसेना ठाकरे गटाचा मोठा डाव; बाळापूर नितीन देशमुख, अकोला पूर्व दातकर, तर वाशीममधून डॉ.देवळेंना संधी; भाजपपुढे आव्हान
Dhananjay munde Bahujan
शरद पवार यांचे चक्रव्यूह भेदण्यासाठी धनंजय मुंडे यांच्याकडून बहुजन तरुणांना साद
Sharad pawar demand supreme court to freeze clock,
‘घड्याळ’ चिन्हाबाबत उद्या सुनावणी; शरद पवार गटाची बाजू ऐकण्याची तयारी
During Deepotsava FDA urged food sellers to follow rules and warned against adulteration
दिवाळीत भेसळ रोखण्यासाठी, अन्न औषध प्रशासन विभाग सज्ज

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये आले. गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी मधील दुभंग, अजित पवार आमचेच नेते अशी विधाने केल्यामुळे शरद पवार दोन्ही डगरीवर पाय ठेवून राजकारण करत आहेत, अशा स्वरूपाची टीका विरोधकच नव्हे तर महाविकासा आघाडी अंतर्गत होऊ लागली होती. परिणामी पवार यांना आपला राजकीय प्रवास नेमका कोणत्या मार्गाने होत आहे, त्याचे स्पष्टीकरण करण्याची गरज भासली असावी. कोल्हापूरची पुरोगामी भूमी आणि त्या विचाराचे पाईक असणारे शरद पवार हे याच नगरीत आपली राजकीय विचारधारा पुनःपुन्हा स्पष्ट करताना दिसले.

हेही वाचा… हितेंद्र ठाकूरांच्या विरोधात भाजपसह सारे विरोधक एकटावले

शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे भांडवल

देशातील आणि राज्यातील शेतकऱ्यांची बिघडलेलया परिस्थितीवर त्यांनी बोट ठेवले. शेतकऱ्यांचे संकट कोणी वाढवले, कांद्याच्या नुकसान कोणी केले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अन्यायकारक वागणूक कोणी दिली,अशी परखड विचारणा करीत पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. याचवेळी केंद्रीय कृषिमंत्री असताना कांदा कर मुक्त ठेवला, कांदा निर्यातीची काळजी घेतली असे नमूद करून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय कसे घेतले याची यादी वाचून दाखवली. संसदेमध्ये विरोधकांचे तोंड कसे बंद केले हे सांगत शेतकऱ्यांचा कैवार घेण्याचा प्रयत्न केला. यवतमाळ मधील २४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याच्या मुद्दयावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेचे तोफ डागली. नवी दिल्लीतील सीमेवर शेतकऱ्यांचे बारा महिने आंदोलन सुरू असताना मोदी सरकारने त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. शेतकऱ्यांचा इतका अपमान देशाच्या इतिहासात अन्य कोणत्याही सरकारने केला नव्हता. हा दृष्टिकोन आज भाजपचा असल्याने अशा लोकांना सत्तेवरून दूर करण्याची गरज स्पष्टपणे व्यक्त करून पवार यांनी प्रभावी विरोधकांची भूमिका निभावताना मुंबईतील आगामी इंडिया आघाडीच्या बैठकीवेळी आपल्याविषयी संभ्रम होणार नाही याची दक्षता घेतल्याचे दिसून आले.ईशान्य भारतातील राज्यातील संघर्षमय परिस्थिती, महिलांवरील अत्याचार वाढत असताना ते थोपवण्याची ताकद सत्तेत असलेल्या केंद्र सरकारकडे नसल्याचे सांगत राजकीय परिस्थितीवरूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

हेही वाचा… सक्षम उमेदवाराशिवाय हिंगोलीत ठाकरे यांचे शक्तीप्रदर्शन

‘ईडी’ वरून टोलेबाजी

राष्ट्रवादीतील फूट आणि ईडीची कारवाई याचा निकटचा संबंध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पवार यांनीही हा मुद्दा कोल्हापुरात अधोरेखित केला. अनिल देशमुख, नबाब मलिक, संजय राऊत यांना विनाकारण तुरुंगात कोणी ढकलले असा प्रश्न उपस्थित करून पवार यांनी जुने सहकारी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा वेगळ्याच शैलीत समाचार घेतला. तपस यंत्रणांचा गैरवापर करणारे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हातातून सत्ता काढून नव्या पिढीच्या हातात ती सोपवण्यासाठी तयार राहा, असा संदेश निवडणुकीचे वारे वाहत असताना द्यायला पवार विसरले नाहीत.

हेही वाचा… समविचारी पक्षांचेच महाविकास आघाडीला आव्हान!

छत्रपती घराण्याशी सख्य

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय मंचावर कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती कसे, त्याचे काही राजकीय संदर्भ आहेत का ? या चर्चेला सभेपूर्वी चांगलेच तोंड फुटले होते. त्यावर दोघांनी आपली भूमिका स्पष्ट करीत संभ्रमाचे सावट दूर केले. ‘ पुरोगामी विचारधारा वाढीस लागण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे,’ असे नमूद करून श्रीमंत शाहू छत्रपती यांनी राजर्षी शाहू महाराजांची विचारधारा बळकट होण्याची गरज पुनश्च बोलून दाखवली. त्यांच्या या विचारसरणीला शरद पवार यांचे पाठबळ राहिले. छत्रपती घराणे आणि लोकसभा निवडणूक याविषयीचा संशयाचे जाळे विणले होते. ते पवार यांनीच ‘ श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी निवडणूक लढावे अशी सर्वांची इच्छा असली तरी ती लढवणार नसल्याचे त्यांनी मला सांगितले आहे,’ असे विधान करून दूर केले. येवला, बीड नंतर झालेल्या सभेची फलनिष्पत्ती उद्दिष्ठाकडे जाणारी असल्याचे निरीक्षण पवार यांनी नोंदवले. कोल्हापुरातील सभेला लोकांची प्रचंड गर्दी होती. तरुण पिढी जोमाने पाठिंबा देण्यासाठी पुढे येत आहे. लोकसभा निवडणुकीत कोणती जागा कोणी लढवायची हे समविचारी पक्षांनी एकत्र येऊन ठरवू, असे त्यांनी स्पष्ट केले.