दयानंद लिपारे

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पश्चिम महाराष्ट्रातील पहिली सभा उद्या शुक्रवारी कोल्हापूरात होत असताना ती अनेक कारणांनी गाजू लागली आहे. पवारांची पुरोगामी विचारसरणी, त्यातून शाहू महाराजांचे सभेचे अध्यक्षस्थान, हसन मुश्रीफ यांच्या विषयीचे भूमिका याबाबत कोल्हापूरच्या भूमीत ते नेमके काय बोलणार याकडे लक्ष वेधले आहे.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ajit Pawar meet Sharad Pawar
Ajit Pawar meet Sharad Pawar : अजित पवार-शरद पवार एकत्र येणार का? शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ते पवार आहेत, कधीही…”
PM Narendra Modi interaction with Chief Secretaries across country for two days
पंतप्रधान मोदी देशभरातील मुख्य सचिवांशी साधणार दोन दिवस संवाद
Ajit Pawar Sharad Pawar Meet in Delhi
Ajit Pawar Sharad Pawar Meet: अजित पवारांची प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शरद पवारांशी भेट; कशावर झाली चर्चा? उत्तरादाखल म्हणाले, “मंत्रीमंडळ विस्तार…”
Ajit Pawar Sharad Pawar Meet in Delhi
Ajit Pawar Sharad Pawar Meet: दिल्लीत अजित पवार-शरद पवार भेट; युगेंद्र पवार म्हणतात, “एकत्र येण्यासाठी प्रयत्न…”
Lawyer charter suspended , Police Patil, Lawyer Police Patil, Lawyer,
पोलीस पाटील पदावर काम केल्यामुळे वकिलाची सनद निलंबित
Gulabrao Deokar, Gulabrao Deokar latest news,
गुलाबराव देवकर यांच्या पक्ष प्रवेशास अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांचा विरोध, पक्ष प्रवेशाच्या विरोधात फलक झळकला

कर्नाटक विधानसभा निवडणुकी वेळी शरद पवार यांची निपाणी येथे सांगता प्रचार सभा झाली होती. त्या निमित्ताने ते काही कोल्हापुरात उपस्थित होते. पुढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुभंग निर्माण झाला. पक्ष बांधणी करण्यासाठी पवार यांनी राज्यव्यापी मोहीम हाती घेतली आहे. येवला येथे झालेल्या सभेत त्यांनी छगन भुजबळ यांना लक्ष्य केले होते.आता पवार कोल्हापुरात येत असताना ‘ माझी छाती फाडली तर त्यात शरद पवार दिसतील’ असे म्हणणारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विषयी ते काय भूमिका घेतात याचे कुतूहल निर्माण झाले आहे. ‘ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष एक कुटुंब आहे. आमचा पक्षही एकच आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांनी सरकार बरोबर येण्यासाठी त्यांना साकडे घातले आहे, अशी वक्तव्य मुश्रीफ यांनी नुकतेच केले असल्तीयाने सत्तेत सहभागी होण्याबाबत पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष असेल.

हेही वाचा… उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी शिंदे गटाकडून कावड यात्रेची फलकबाजी

बडवे – विठ्ठलाचा वाद

येवला येथील सभेवेळी छगन भुजबळ यांनी ‘ शरद पवार हे आमचे विठ्ठल आहेत. विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे. त्यांना बाजूला करा. आम्ही तुमच्याकडे परत येऊ, असे विधान केले होते. त्याचा रोख लक्षात घेऊन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘शरद पवार यांनी पक्ष स्थापन झाल्यावर प्रदेश अध्यक्षपदासाठी पहिले नाव छगन भुजबळ यांचे घेतले होते. त्यावेळी बडवे आडवे आले नाहीत.’ असे प्रतीत्तुर दिले होते. याबाबत बोलायला बऱ्याच गोष्टी असल्या तरी वाद घालायचा नाही,असे म्हणणारे जयंत पाटील हे पवार यांच्या सभेच्या निमित्ताने कोल्हापुरात आले असताना ‘ पवार कोणाकोणाचे विठ्ठल राहतात हे ही लवकरच कळेल,’ असे विधान करीत पुन्हा बडवे- विठ्ठलाचा वाद उकरून काढला असल्याने साहजिकच शरद पवार यांची नेमकी राजकीय भूमिका कोणती आणि ते नेमके कोणाचे विठ्ठल होणार याचा उलगडा या सभेत होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा… ‘एकला चलो’तून मायावतींचे काँग्रेसशी छुप्या युतीचे संकेत?

पुरोगामित्व आणि छत्रपती घराणे

शरद पवार यांनी नेहमीच पुरोगामी विचाराची जपमाळ ओढली आहे. कोल्हापुरात आल्यावर तर ते हमखास पुरोगामी विचारधारेवर काही वेळ आवर्जून बोलत असतात. रोहित पवार यांनी पुरोगामी विचार, शिव, शाहू आंबेडकरांचा विचार आणि विचारांची ताकद संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला दाखवायची असल्याने शरद पवार यांनी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा मैदान सभेसाठी निवडले आहे, असे विधान नुकतेच कोल्हापुरात करून पवारांच्या विचारसरणीचे दिशादर्शन केले आहे. त्यामुळे बदललेल्या पक्षीय वातावरणात पवार यांच्याकडे भूमिकेकडे राज्यातील पुरोगामी विचारसरणीच्या नेते, कार्यकर्त्यांचे ही लक्ष असणार आहे. शिवाय, ही सभा दसरा चौक या कोल्हापुरातील ऐतिहासिक ठिकाणी होत आहे. कोल्हापुरातील छत्रपती कुटुंबीयांकडून याच जागेवर सीमोल्लंघन सोहळा होत असतो. पवार यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा निवडीनंतर ‘ पेशवे छत्रपतींची निवड करू लागले आहेत,’ असे म्हणत छत्रपती कुटुंब आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचले होते .आता याच छत्रपती घराण्याचे प्रमुख शाहू महाराज यांना अध्यक्षस्थान देवून शरद पवारांची सभा होत असल्याने याचा राजकीय सांगावा काय आहे? याची चर्चा रंगली आहे. शाहू महाराज हेही थेट राजकीय मंचावर जात असल्याने त्यांच्या भूमिकेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. ते राष्ट्रवादीकडून लोकसभेची निवडणूक लढवतील, या चर्चेला तोंड फुटले आहे. यातूनच पवार, छत्रपती घराणे, पुरोगामित्व याविषयी नेमके काय घडणार याचे कुतूहल आहे.

हेही वाचा… ठाणे जिल्हा नियोजन समितीला पालकमंत्र्यांची प्रतीक्षाच

शरद पवार आणि अजित पवार यांची यांच्या पुण्यातील भेटीवरून उठलेले वादळ अजूनही शमलेले नाही. याबाबत कोल्हापुरात बोलताना अजित पवार यांनी ‘ मी उजळ माथ्याने फिरणारा कार्यकर्ता आहे. शरद पवार यांना भेटण्यासाठी कधी लपून गेलो आहे ते सांगा,’ असा प्रतिप्रश्न केला होता. तर पवार यांची कोल्हापुरात सभा होत असताना अजित पवार यांनी ‘ शरद पवार यांनी कुठे सभा घ्यावी हा त्यांचा अधिकार आहे. प्रशासनावर पकड आणण्याचे काम आम्ही करत आहोत. यातून आम्ही आमच्या टेंभा मिरवतो असे समजू नका. काही वेळेस विचारधारा वेगळे असू शकते,’ असे भाष्य केले आहे. काका – पुतण्यातील वैयक्तिक आणि राजकीय संबंधावरून वातावरण गढूळ असताना काका पुतण्याविषयी काय विधान करणार हेही महत्त्वाचे ठरले आहे.

Story img Loader