कोल्हापूर : उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे हे भाजपात प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे कागल विधानसभा मतदारसंघातील राजकारणात मोठे फेरबदल अपेक्षित आहेत. सध्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले समरजित घाटगे हे पुन्हा भाजपशी जवळीक साधण्या आधीच तेथे संजय घाटगे हे विधानसभेचे उमेदवार म्हणून दावा करू शकतात. यायोगे एका घाटगेंकडून दुसऱ्या घाटगे यांची राजकीय कोंडी करण्याची शक्यता दिसते. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि संजय घाटगे यांच्यातील मैत्री सर्वश्रुत असून उभयतांच्या राजकारणाचा हा परिपाक मानला जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कागल तालुक्याचे राजकारण नेहमीच धगधगते राहिले आहे. या मतदारसंघात सलग सहाव्यांदा विजय मिळवत हसन मुश्रीफ यांनी षटकार ठोकला आहे. २०१९ सालच्या निवडणुकीवेळी भाजपात असलेले समरजित घाटगे यांना युतीची उमेदवारी मिळण्याची चिन्हे होती. पण संजय घाटगे यांनी मातोश्रीशी जवळीक साधून युतीची पुन्हा एकदा उमेदवारी मिळवल्याने ते रिंगणात राहिले. परिणामी समरजित घाटगे यांना अपक्ष लढावे लागले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत घाटगे यांनी शरद पवार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. या दोन्ही निवडणुकीत मुश्रीफ यांनी विजयी झाले आहेत. जिल्ह्यात राजकीय पातळीवर तशी शांतता असताना कागल मधील राजकारण नवे वळण घेत असून ते चांगलेच चर्चेत आले आहे.
हेही वाचा…गुलाबराव देवकर यांची पाऊले आता भाजपकडे, अजित पवार गटात पक्षप्रवेशास विरोध
कागल मतदारसंघातील राजकीय परिस्थिती लक्षात येऊन पक्ष विस्तार करण्याच्या दृष्टीने काही वर्षांपूर्वी भाजपने संजय घाटगे यांना प्रवेशासाठी विचारणा केली होती. तेव्हा प्रतिसाद मिळाला नव्हता. अलीकडेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संजय घाटगे व त्यांचे सुपुत्र अंबरीश घाटगे यांनी चर्चा केली. घाटगे पिता पुत्र लवकरात भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शह – प्रतिशह
घाटगे यांचा भाजप प्रवेश इतक्यापुरती ही घटना खचितच मर्यादित असणार नाही. त्यामागचा अन्वयार्थ काही वेगळेच दर्शवतो. संभाव्य राजकारणाची पाळेमुळे त्यामध्ये खोलवर रुजली असल्याचे दिसते. समरजित घाटगे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळकीचे संबंध आहेत. त्यातून ते कदाचित भाजपात प्रवेश करण्याची एक शक्यता वर्तवली जात आहे. ती गृहीत घरून प्रतिपक्षाने, म्हणजे समरजित घाटगे यांनी हाती कमळ घेण्यापूर्वीच संजय घाटगे तेथे पोहचलेले असतील. खेरीज, ते पुढील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारीचा दावा करतील,अशी या मागची राजकीय चाल आहे.
हेही वाचा…मंत्रीपदांच्या वाटणीतून कोकणावर कब्जा मिळवण्याचे भाजपाचे डावपेच
घाटगे विरुद्ध घाटगे
अर्थात, यामागे हसन मुश्रीफ – संजय घाटगे यांच्या मैत्रीच्या राजकारणाची किनार आहे. घाटगे यांचे राजकारण मुश्रीफ यांच्या इशाऱ्याने आणि त्यांना पूरक ठरणारे असते असे कागलकरांचे निरीक्षण आहे. याशिवाय घाटगे विरुद्ध घाटगे या जुन्या वादाची यामागे पार्श्वभूमी आहे. संजय घाटगे यांना या मतदारसंघात दोनदा पराभव स्वीकारावा लागला. तेव्हा त्यांना विक्रमसिंह घाटगे यांनी मदत केली नव्हती, याची सल या गटामध्ये आहे. त्यामुळे काही झाले तरी समरजित घाटगे यांना राजकारणात पुढे जाऊ द्यायची नाही अशी या गटाची मानसिकता आहे. भविष्यातील राजकारणात समरजित घाटगे यांच्या रूपाने भाजपाला संजय घाटगे यांच्या पेक्षा चांगला पर्याय मिळू शकतो. तेव्हा पहिले घाटगे हे दुसऱ्या घाटगे यांची उमेदवारी मान्य नाही असे सांगून नवा राजकीय पर्यायी चोखळू शकतात. अशा साऱ्या गृहीतकांमुळे कागलच्या राजकारणात पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत नेमके काय वाढून ठेवले आहे याचे कुतूहल आतापासूनच वाढू लागले आहे.