कोल्हापूर: पाटगाव धरणातील पाण्याद्वारे कोकणात वीज निर्मिती करणाऱ्या उद्योगपती गौतम अदानी उद्योग समूहाच्या जलविद्युत प्रकल्प विरोधाची धार कोल्हापूर जिल्ह्यात वाढताना दिसत आहे. पाटगाव धरण असलेल्या भुदरगड तालुक्यातील स्थानिक नेतृत्वाने विरोध करीत पहिले आंदोलन छेडले. पाठोपाठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे या आंदोलनासाठी पाठबळ मागितले असून या निमित्ताने या दोघांची लोकसभेसाठी राजकीय युती होताना दिसत आहे. तर आता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीस या प्रकल्पाला विरोध करण्याचा ठराव एकमताने संमत झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेला पाटगाव धरण आहे. तेथून घाटाखाली कोकण आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील माणगाव खोऱ्यातील अंजिवडे गावात उद्योगपती गौतम अदानी समूहाचा जलविद्युत प्रकल्प साकारला जाणार आहे. यासाठी केंद्र शासकीय पातळीवर अत्यंत गोपनीयपणे आणि झपाट्याने मंजुरीचे काम सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित करून पाटगाव धरण पाणी बचाव कृती समितीने या एकंदरीत गतीवर संशय व्यक्त केला आहे.

Sustainability Crusader Award Announced to Alok Kale Founder and Managing Director of Magnus Ventures Pune news
औद्योगिक कचऱ्यातून नवव्यवसायाची निर्मिती! पुण्यातील तरुण उद्योजकाचा प्रवास
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
Illegal building on road in Nandivali Samarth Chowk demolished
मानपाडा-बाह्यवळण रस्ता ते कोपर रस्त्यामधील अडथळा दूर
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
96000 hectares of onion crops fraudulently insured
कांद्याच्या बोगस पीकविम्याचे पेव फुटले; जाणून घ्या, जिल्हानिहाय कांद्याचा बोगस पीकविमा
Sugarcane Cultivation Kolhapur , Sugarcane ,
लोकशिवार… मुरमाड जमिनीतील उसाची दमदार लागवड

हेही वाचा… नवनीत राणांसमोर उमेदवारीचे आव्हान तर विरोधक सक्षम चेहऱ्याच्या शोधात

२१०० मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पासाठी ८३४७ कोटी रुपये खर्च येणार आहे. हा प्रकल्प येत्या अडीच वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी पाटगाव धरणातील पाणी दिल्यामुळे भुदरगड तालुक्यात पिण्याचे पाणी, सिंचनास पाणी कमी पडणार आहे. शिवाय, करारा प्रमाणे कर्नाटकला पाणी देण्यासाठी काळम्मावाडी व चांदोली धरणातून जादा पाणी द्यावे लागणार आहे. शेतकरी नेत्यांच्या मते हा मुद्दा सांगली जिल्ह्यापर्यंत ही पोहोचणार आहे. सांगली जिल्ह्यातील म्हैशाळ योजनेवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे, असे राजू शेट्टी यांचे म्हणणे आहे.

सर्वपक्षीय विरोध

कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक पाणीपुरवठा संस्था शेतीच्या पाणी परवाना मागणीसाठी पाच -सहा वर्ष मंत्रालयात फेऱ्या मारत आहेत. पण त्यांना महाविकास आघाडी सरकार असो कि महायुती मधील मंत्र्यांनी सहकार्य केलेले नाही. पाटगाव धरण प्रकल्पाचा परिसर वनविभागात असून तो संवेदनशील क्षेत्रात आहे. तरीही तेथे केंद्र शासनाच्या पातळीने घाईघाईने परवानगी दिल्याने संशय बळावत चालला आहे. राज्याच्या वन,महसूल, विद्युत निर्मिती, पर्यावरण आदी विभागातील अधिकारी मोकळेपणे माहिती देण्यास तयार नसल्याने स्थानिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. शासन -प्रशासन लोकांसाठी कि उद्योगपतीच्या हितासाठी काम करते ? असा त्यांचा खडा सवाल आहे. यामुळेच भुदरगड तालुक्यातील भाजप, शिवसेनेचे दोन्ही गट, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे, जनता दल , पुरोगामी आदी सर्वपक्षीय नेत्यांनी गारगोटी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून विरोध दर्शवला होता. पाटगाव धरण पाणी बचाव कृती समितीने या आंदोलनाला आणखी धग देण्याचे ठरवले आहे.

ठाकरे – शेट्टी एकत्र

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पाटगाव धरणातील पाण्याच्या वापर करून जलविद्युत निर्मिती प्रकल्पाचा शेतकऱ्यांना फटका बसणार असल्याचा मुद्दा घेऊन आवाज उठवायला सुरुवात केली आहे. यासाठी शेट्टी यांनी मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन अदानी उद्योग समूहाचा वीजनिर्मिती प्रकल्प कोल्हापूर, सांगली जिल्ह्याच्या मुळावर येणार असल्याने येणार असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन छेडणार असून शिवसेनेने पाठबळ द्यावे, असे आवाहन ठाकरे यांना केले. ठाकरे यांनीही धारावी बळकावण्याच्या अदानींच्या राक्षसी प्रवृत्ती विरोधात लढतो आहोत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पाण्याची हक्कासाठी सुद्धा तुमच्या सोबत खंबीरपणे राहू, असे म्हणत समर्थन दर्शवले. अदानी या समान मुद्द्यावर ठाकरे – शेट्टी एकत्र आले आहेत. ठाकरे यांचे पाठबळ मिळाल्याने शेट्टी यांना पाटगाव धरण प्रकल्पाचा लढा अधिक ताकदीने लढणे शक्य होणार आहे. तर या भेटीवरून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शेट्टी हे ठाकरे सेनेच्या गोटातील उमेदवार असतील ही शक्यता वाढीस लागली आहे. पाटगाव आंदोलनाच्या माध्यमातून ठाकरे सेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र आल्याचे राजकारणही दिसत आहे.

लोकप्रतिनिधीही एकवटले

पाटगाव धरण प्रकल्पाची प्रकल्प विरोधात सर्व पक्षांनी आंदोलन चालवले असताना दुसरीकडे त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांना या प्रकल्पाविरोधात एकत्र यावे असे आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. याचा परिणाम कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिसून आला वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अदानी उद्योग समूहाच्या जलविद्युत निर्मिती प्रकल्पाला पाटगाव धरणातून पाणी न देण्याचा ठराव करण्यात आला. मंत्री मुश्रीफ यांनीच ही माहिती माध्यमांना दिली. हा ठराव एकमताने झाला असल्याने जिल्ह्यातील आमदार,खासदार यांचाही एकापरीने या प्रकल्पाला विरोध असल्याचेही आता स्पष्ट होऊ लागले आहे. मात्र हा विरोध वरकरणी आहे कि विरोधाच्या आंदोलनाला खरेच बळ देणार अशीही शंका उपस्थित केली जात आहे.

Story img Loader