कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यावर महायुती आणि महाविकास आघाडीसह तिसऱ्या आघाडीतील नव्या बंडखोरांमुळे डोकेदुखी वाढली आहे. निवडणूक लढणारच असा निर्धार या बंडखोरांनी केल्याने त्यांची समजूत तरी कशी काढायची, याचा पेच ऐन दिवाळीत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना पडला आहे.

या वेळच्या निवडणुकीत महायुतीमध्ये भाजप, एकनाथ शिंदे शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी, तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन प्रमुख पक्ष आहेत. या तिन्ही पक्षांनी निवडणुकीच्या आधी काही महिने मुलाखती घेतल्याने इच्छुकांच्या अपेक्षाही वाढल्या होत्या. आता उमेदवारी न मिळाल्याने अनेक मतदारसंघांत बंडखोरीला ऊत आला आहे. प्रभावी बंडखोरांबाबत कोणती मात्रा लागू करायची, याचा पेच नेत्यांसमोर निर्माण झाला आहे.

ajit pawar allegations on rr patil
आपटीबार: दादा, आभार माना!
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Karuna Sharma Cried
Karuna Sharma : उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने ढसाढसा रडल्या करुणा शर्मा, धनंजय मुंडेंना म्हणाल्या, “तू राक्षस…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
dhangar candidates vidhan sabha
धनगर समाजाच्या पदरी निराशा

हेही वाचा :आपटीबार: दादा, आभार माना!

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसने राजेश लाटकर यांची उमेदवारी जाहीर केली. त्यांना विरोध झाल्याने मधुरिमाराजे छत्रपती यांची उमेदवारी जाहीर केली. संतप्त झालेल्या लाटकर यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने काँग्रेसची कोंडी झाली आहे. आता त्यातच येथील काँग्रेसच्या विद्यामान आमदार जयश्री जाधव यांनी शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केल्याने काँग्रेस पुढील आव्हान आणखी वाढले आहे.

चंदगडमध्ये बंडखोरांचे पेव फुटले आहे. येथे अजित पवार राष्ट्रवादीचे राजेश पाटील हे आमदार पुन्हा रिंगणात असताना त्यांच्या विरोधात भाजपचे शिवाजीराव पाटील यांनी बंडखोरी केली आहे. जनस्वराज्य शक्ती पक्षाचे मानसिंग खोराटे यांची उमेदवारी ही महायुतीची डोकेदुखी बनली आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने नंदिनी बाभूळकर यांना उमेदवारी दिली असताना येथे काँग्रेसचे गोपाळराव पाटील, गेल्या वेळचे उमेदवार विनायक पाटील यांनी अर्ज भरले असल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.

हेही वाचा :धनगर समाजाच्या पदरी निराशा

करवीरमध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेने चंद्रदीप नरके यांना उमेदवारी दिली असली, तरी भाजपच्या सहयोगी पक्ष असलेल्या जनस्वराज्य शक्तीचे संताजी घोरपडे यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे नरके समर्थकांनी पन्हाळ्यात विनय कोरे यांना धडा शिकवण्याची भाषा चालवली आहे.

इचलकरंजीत दोन्ही ठिकाणी बंडाचे झेंडे लागले आहेत. भाजपचे राहुल आवाडे यांच्या विरोधात अजित पवार राष्ट्रवादीचे विठ्ठल चोपडे यांनी बंडाचा झेंडा रोवला आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे मदन कारंडे यांना भाजपचे हिंदुराव शेळके यांनी पाठिंबा दिला असताना येथे माजी आमदारपुत्र सुहास अशोक जांभळे यांनी बंडाचे निशाण रोवले आहे. राधानगरीत पुन्हा उद्धव ठाकरे शिवसेनेचे के. पी. पाटील यांच्या विरोधात त्यांचे मेहुणे ए. वाय. पाटील यांनी पुन्हा बंडखोरी केल्याने महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला आहे.

हेही वाचा : तीन दिवस मुक्काम पोस्ट बारामती : औचित्य दिवाळी; उद्दिष्ट प्रचार!

‘स्वाभिमानी’तही कोंडी

शिरोळमध्ये महायुतीतून राजेंद्र पाटील यांनी अपक्ष शाहू आघाडीच्या माध्यमातून अपक्ष अर्ज भरला असताना येथे भाजपचे विजय भोजे, मुकुंद गावडे यांचे अर्ज दाखल केल्याने डोकेदुखी वाढले आहे. काँग्रेसचे गणपतराव पाटील यांच्यासोबत राहिलेले उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील यांनी ऐनवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश करून अर्ज भरला आहे. स्वाभिमानीच्या उमेदवारीमुळे हातकणंगलेही कोंडी निर्माण झाली आहे. येथे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, उद्धव ठाकरे शिवसेनेतून स्वाभिमानी प्रवेश केल्यानंतर डॉ. सुजित मिणचेकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केल्याने येथेही स्वाभिमानी समोर बंडाचे आव्हान निर्माण झाले आहे.

Story img Loader