रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीची रंगत आता चांगलीच वाढू लागली आहे. निवडणुका जवळ आल्याने पालकमंत्री उदय सामंत आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. एकेकाळी खांद्याला खांदा लावून काम करणारे आता एकमेकाच्या विरोधात उभे ठाकले आहेत. चक्क राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना या निवडणुकीत पाडण्याचा विडा उचलला आहे.

राजापूर विधानसभा मतदार संघातून पालकमंत्री उदय सामंत हे आपले मोठे बंधू किरण सामंत यांना शिंदे गटातून उभे करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी राजापूर मतदार संघातील गावोगावी किरण सामंत यांच्या लोकांबरोबर भेटिगाठी वाढल्या आहेत. आमदार राजन साळवी यांच्या विरोधात सभा घेऊन मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते शिंदे गटात घेण्यास सुरुवात केली आहे. एकेकाळी राष्ट्रवादी पक्षातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे उदय सामंत यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम करुन शिवसेना पक्षात प्रवेश केला. मात्र यावेळी त्यांना शिवसेना पक्षात घेण्यासाठी आमदार राजन साळवी यांनी पुढाकार घेतला . शिवसेनेतून उदय सामंत यांनी आमदारकीची निवडणूक लढवली आणि निवडून ही आले. यासाठी राजन साळवी यांनी मोठे प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते. मात्र आता शिवसेना फुटल्यावर या दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले आहे.

LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
RSS, BJP, Mohan Bhagwat
भाजपला धोरणबदलाचा अप्रत्यक्ष सल्ला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
bjp bihar pattern in Maharashtra
‘बिहार पॅटर्न’ला बगल? संघ सक्रिय झाल्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…

हेही वाचा : भाजपला धोरणबदलाचा अप्रत्यक्ष सल्ला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका

२०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत पालकमंत्री उदय सामंत यांना रत्नागिरितून पाडण्याचा आम्ही संकल्प केला आहे. तो पुर्ण केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा इशाराच राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. माझ्यावर स्वत:साठी झटणारा आमदार अशी टीका करणाऱ्या उदय सामंत यांनी स्वत:चा इतिहास पहावा. मी गेली ४० वर्षे शिवसैनिकच आहे व भविष्यातही पक्षाशी एकनिष्ठच राहणार अशी ग्वाही दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सहीत शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आमदार म्हणून राजापूर, लांजा व (साखरपा ) संगमेश्वर या पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याना विभागवार बैठका लावण्यासाठी पत्र दिले होते. मात्र पालकमंत्री उदय सामंत यांच्या दबावापोटी त्या घेवू दिल्या नसल्याचा गौप्यस्फोट आमदार राजन साळवी यांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे नाव न घेता केला आहे.

पालकमंत्री म्हणून उदय सामंत हे जिल्हा नियोजन मधील निधी जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदार संघांवर अन्याय करुन फक्त राजापूर विधानसभा मतदारसंघात खिरापतीसारखा वाटत असल्याची टीका आमदार राजन साळवी यांनी केली आहे. पालकमंत्री उदय सामंत हे निवडणुकींवर डोळा ठेवून जिल्हा नियोजनच्या ३०० कोटीच्या निधीपैकी २५० कोटी रुपये फक्त राजापूर विधानसभा मतदार संघात दिल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा : जातीनिहाय जनगणनेसाठी संघ अनुकूल; राजकारणासाठी वापर होऊ नये, अशी अपेक्षा

उदय सामंत यांचे बंधू व रत्नसिंधु समितीचे सदस्य किरण सामंत यांनी केळवली येथे केलेल्या वक्तव्याचाही चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल राजापूरात होण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न केले असून त्याचे पुर्ण श्रेय हे आपलेच आहे. ही बाब किरण सामंत यांच्या लक्षात आल्याने त्यांनी राजकिय नैराश्यातून केळवली येथे माझे स्वीयसहायक हा विषय घेवून आपल्याकडे आल्याचे विधान केले.

गेली चाळीस वर्ष मी शिवसेनेत आहे. त्याच एका पक्षातून मी विविध राजकिय पदांवर काम करत गेली तीन टर्म राजापूरचा आमदार म्हणून त्याच शिवसेना पक्षातून कार्यरत आहे. मात्र उदय सामंत यांनी आपला राजकिय इतिहास स्वत:च तपासुन पहावा असे आव्हानही यावेळी आमदार राजन साळवी यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना दिले आहे. प्रथम ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातून आमदार झाले. त्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसुन शिवसेनेची वाट धरली. आमच्या पक्षाचा एक आमदार वाढावा म्हणून मी उध्दव ठाकरेंच्या आदेशानुसार त्यांना निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. उध्दव ठाकरे यांनीही त्यांना शिवसेनेचा आमदार म्हणून प्रथम म्हाडाचे अध्यक्ष पद व दुसऱ्या टर्म मध्ये मंत्रीपद बहाल केले. मात्र त्यानंतर त्यांनी शिंदे गटाची वाट धरुन उध्दव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे.