लातूर : लातूर जिल्ह्यात२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची घसरण सुरू झाली. गटातटात भाजप मोठ्या प्रमाणावर विखुरल्याचे चित्र स्पष्ट झाले. अहमदपूर व उदगीर या दोन तालुक्यात भाजपची पुरती वाताहत झाली. अहमदपूरमध्ये भाजपात दोघांनी बंडखोरी केली तर उदगीरमध्ये बंडखोरी न करता विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारल्यामुळे भाजपचा पराभव झाला होता. त्यानंतर भाजपात अंतर्गत घसरण सुरूच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उमेदवार बदलला व सुधाकर शृंगारे हे पावणेतीन लाखापेक्षा अधिक मताधिक्याने विजयी झाले. आता नव्याने २०२४ च्या निवडणुकीला सामोरे जाताना लोकसभा निवडणुकीत उमेदवार कोणी असला तरी विजय भाजपाचा आहे, याची खात्री वाटत असल्याने भाजपमध्ये उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी आहे. माजी खासदार सुनील गायकवाड हे स्वतः नव्याने इच्छुक आहेत .रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अनिल गायकवाड यांचे सुपुत्र विश्वजीत गायकवाड हेही लोकसभेचे दावेदार आहेत. त्यांनी ‘हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम लातूरकरांसाठी मोफत घेऊन हवा आपल्याकडे येईल, अशी आशा बाळगली आहे. या व्यतिरिक्त सुमारे अर्धा डझन भाजपात उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक आहेत.

हेही वाचा : महायुतीत मावळचा तिढा कायम, भाजपच्या दाव्याने शिंदे गटात चलबिचल

पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर असताना जिल्ह्यात सर्वत्र भाजपचा दबदबा होता. मात्र, २०१९ च्या निवडणुकीनंतर व विशेषतः महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर भाजपातील सुंदोपसुंदी शिगेला पोहोचली. प्रत्येकाचा स्वतंत्र गट निर्माण झाला. आमदाराने आपली ताकद आहे असे गृहीत धरले तरी जे आमदार नाहीत अशी मंडळीही आपला गट तयार करण्यासाठी धडपडत आहेत . वेगळा गट करण्यात कार्यकर्ते पुढे सरसावलेले दिसतात. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अहमदपूर मतदारसंघात ज्यांनी भाजपात बंडखोरी केली त्या दिलीपराव देशमुखांना भाजपात घेण्यात आले व त्यांना थेट जिल्ह्याचे अध्यक्ष पद देण्यात आले. आमदार अभिमन्यू पवारांचा व आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचा वेगळा गट नेहमीच चर्चेत असतो.

हेही वाचा : पंजाबमधील सुखविलास रिसॉर्टचा वाद काय? मुख्यमंत्री मान यांनी शिरोमणी अकाली दल आणि भाजपावर काय आरोप केले?

आमदार रमेश कराड यांनीही वेगळा गट बांधला आहे. माजी आमदार सुधाकर भालेराव यांचाही वेगळा गट आहे. लोकसभा निवडणुकीत ‘मोदी है तो मुमकीन है’ यामुळे कोणालाही उमेदवारी मिळाली तरी तो निवडून येणारच., असे मानून प्रत्येक जण आपला गट पुढे कसा रेटता येईल यासाठी धडपडतो आहे. पूर्वी काँग्रेस पक्षाची अवस्था जशी होती त्याच दिशेने भाजपची वाटचाल सुरू आहे. राज्यातील सर्वाधिक गटबाजी असलेला जिल्हा म्हणून लातूरची नोंद होईल असे चित्र आहे.