लातूर: लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन हे लातूरला येत नाहीत. जिल्हा वार्षिक आरखड्याच्या बैठकाही ते ऑनलाईन घेतात. जिल्हा नियोजन समितीवर भाजप कार्यकर्त्यांच्या नियुक्त्याच झाल्या नाहीत, अशा अनेक तक्रारी भाजप कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या बैठकीत केल्या. या बैठकीला प्रमुख म्हणून पंकजा मुंडे यांची उपस्थिती होती. निवडणुकीला दाेन महिने राहिलेले असताना भाजप कार्यकर्त्यांची अशी अवस्था आहे. महायुतीमध्ये दोन मतदारसंघ राष्ट्रवादीला आणि लातूर ग्रामीण मतदारसंघ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटणार असेल तर भाजप कार्यर्त्यांनी काय करावे, असा प्रश्न पंकजा मुंडे यांच्यासमोर उपस्थित करण्यात आला.

विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये होणाऱ्या जागावाटपावरुन लातूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांमधील मोठीअस्वस्थता आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अहमदपूर ,उदगीर या मतदारसंघात भाजपला फटका बसला. हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे जाणार असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. भाजपची वरिष्ठ मंडळी लातूर जिल्ह्याबद्दल गांभीर्याने लक्ष देत नाहीत. वर्षानुवर्षे गोपीनाथ मुंडे यांच्या कारकिर्दीपासून विलासराव देशमुख यांच्या सोयीचे राजकारण भाजपचे नेते मंडळी करत आली. त्याच पद्धतीने सध्याची सत्तेतील मंडळी ही देशमुख यांच्या सोयीचे राजकारण करत असल्याची खंत लातूर मधील कार्यकर्ते व्यक्त करतात.

Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Eknath shinde, shiv sena role, Airoli, belapur assembly election
ऐरोलीतील बंडखोरांना शिंदे गटाचे अभय? बेलापुरात कारवाई, ऐरोलीत आस्ते कदम
maharashtra assembly election 2024 religious polarization experiment in solapur city central assembly elections
लक्षवेधी लढत : धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग यशस्वी होणार?
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’
Chief Minister Eknath shinde understanding of independent parties in Thane print politics news
ठाण्यातील स्वपक्षीय नाराजांची मुख्यमंत्र्यांकडून समजूत,प्रचाराला लागण्याचे आदेश; केळकर यांनाही कार्यकर्त्यांना जपण्याचा सल्ला
Saravankar campaign in front of Shiv Sena Bhavan Participation of MP Shrikant Shinde
शिवसेना भवनासमोरून सरवणकर यांची प्रचारफेरी; खासदार श्रीकांत शिंदे यांचा सहभाग

हेही वाचा : शून्य आमदार नि एक खासदार! पश्चिम बंगालमध्ये राजकीय विजनवासात जाण्यापासून काँग्रेस स्वत:ला कसं रोखणार?

लातूर जिल्ह्याच्या बैठकीत आमदार संभाजी पाटील निलंगेकर ,अभिमन्यू पवार ,रमेश कराड ,भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख ,शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांच्यासह वीस जण उपस्थित होते. जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघ भाजपने लढवले पाहिजेत यासाठी आग्रह धरा, अशी विनंती कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांना केली.

हेही वाचा : तमिळनाडूमध्ये महिनाभरात ५ राजकीय कार्यकर्त्यांची हत्या; काय आहे कारण?

जिल्ह्यातील लातूर शहर ,औसा व निलंगा हे तीन मतदार संघ भाजपकडे राहतील अहमदपूर व उदगीर हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार आहेत व लातूर ग्रामीण मतदारसंघ पूर्वी शिवसेनेने लढला होता आता शिवसेना शिंदे गट दावेदार आहे. पक्षात नव्याने आलेले नेते आमच्यावर लादू नका असे नाव न घेता आग्रहपूर्वक अनेक जणांनी मत मांडले .शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर या लातूर शहर विधानसभा मतदारसंघात दावेदार आहेत त्या पार्श्वभूमीवर शहरातील कार्यकर्त्यांनीच ही भूमिका मांडल्याचे सांगण्यात येते. पंकजा मुंडे यांनी काय झाले हे आपल्या सर्वांना माहिती असल्यामुळे त्याची चर्चा नको. काय होणार आहे याची चर्चा करू या असे सांगत बैठकीस सुरुवात केली. पण त्यांच्यासमोर कार्यकर्त्यांमधील खदखदच व्यक्त झाली.