लातूर : राजकारणात बऱ्याच वेळा सोंगट्या सोयीच्या पडतात त्यातून अनेक मंडळी पटापट पुढे जातात त्याच पद्धतीने राज्याचे नूतन क्रीडामंत्री संजय बनसोडे यांची राजकारणातली वाट आहे . गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अंतर्गत वादामुळे दोन वेळा निवडून आलेले सुधाकर भालेराव यांना भाजपने उमेदवारी नाकारली व या संधीचा योग्य फायदा उठवत संजय बनसोडे यांनी भाजपला बालेकिल्ल्यात धूळ चारली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये पहिल्यांदाच निवडून येऊनही त्यांना राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. अजित पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे थेट राज्याचे क्रीडामंत्रीपद त्यांना मिळाले व बढती मिळाली. राजकारणाची वाटचाल टप्प्याटप्प्याने असते, काहीजण सावकाश पावले टाकतात तर संजय बनसोडे हे ढांगा टाकतच राजकारणात वरच्या पायऱ्या गाठत आहेत.

लातूर जिल्ह्यात भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे तिसऱ्यांदा निवडून आल्याने त्यांचा मंत्रिपदावर दावा होता. मात्र भाजपाच्या अंतर्गत राजकारणामुळे व मंत्री पदांची संख्याच कमी असल्यामुळे संभाजी पाटील निलंगेकर यांना संधी मिळाली नाही. नव्या राजकीय समीकरणात संजय बनसोडे हे जिल्ह्याचे मंत्री झाल्यामुळे व १५ ऑगस्ट व १७ सप्टेंबर दोन वेळा लातूरमध्ये झेंडावंदनाची संधीही त्यांना मिळाल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले होते.

controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
pressure politics Ajit Pawar backing Dhananjay Munde NCP Beed walmik karad
अजित पवार हे धनंजय मुंडे यांना पाठिशी का घालत आहेत ?
influence of right wing ideology in the United States the European Union and some countries in Asia print exp
अमेरिका, इटली, हंगेरी, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया… प्रगत देशांतही उजव्या विचारांचा प्रभाव… मतैक्य कशावर? मतभेद कशाविषयी?
संजय राऊतांच्या विधानाने युतीच्या चर्चेला बळ
lokmanas
लोकमानस: लोकशाही की एकाधिकारशाही?
congress mla vijay wadettiwar accused election commission of Acting on BJP s warnings
निवडणूक आयोग मनुवादी, भाजपच्या इशाऱ्यावर चालतो… वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे…
Swayamsevak will be personal secretaries of ministers
भाजप, संघ स्वयंसेवक मंत्र्यांचे स्वीय साहाय्यक

हेही वाचा : डॉ. विजयकुमार गावित यांना पक्षांतर्गत वाद आणि शिंदे गटाची नाराजी भोवली

उदगीर परिसरातील भाजपच्या कार्यकर्त्यांत चांगलाच जळफळाट सुरू झाला होता. पालकमंत्री पदाची संधी संजय बनसोडे यांना दिली तर जिल्ह्याच्या राजकारणावर ते चांगलीच पकड बसवतील. कारण पालकमंत्र्यांकडे कोणाला निधी द्यायचा याचे अधिकार असतात व त्याचा लाभ ते उठवतील या भीतीपोटीच भाजपचे तिन्ही आमदार व पक्ष कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे यासंबंधीचे म्हणणे मांडले आणि ते म्हणणे लक्षात घेऊनच संजय बनसोडे यांना लातूरचे पालकमंत्री पद मिळाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना सोय म्हणून परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री पद देऊ केले. परभणीत भाजपची स्थिती फारशी बरी नसल्याने त्यांनीही परभणीसाठी होकार दिला. संजय बनसोडे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले असल्यामुळे पालकमंत्री पदासाठी ते फारसे अडून न बसता त्यांनी जे मिळाले ते योग्य अशी समजूत करून तडजोड केली आहे.

Story img Loader