सोलापूर : ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबियांनी भाजपच्या विरोधात बंड पुकारल्याने माढा मतदारसंघातील समीकरणे बदलली आहेत. ‘सोपी वाटणारी निवडणूक अवघड झाली’ या मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे भाजपसाठी ही निवडणूक अवघड बनल्याचे चित्र दिसत आहे. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोलापूर जिल्ह्यात लागोपाठ दोन दिवस सभा घ्याव्या लागल्या. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजपमधील या चुरशीच्या निवडणुकीत माढ्याची जागा कायम राखण्याचे भाजपपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

विद्यमान खासदार भाजपचे रणजितसिंह नाईक- निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यातील लढत कमालीची चुरशीची होत आहे. शह-प्रतिशहाच्या राजकारणात विजयाची गणिते जुळविण्यात मोहिते-पाटील यांनी आघाडी घेतली असताना अखेरच्या टप्प्यात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा घेऊन प्रामुख्याने धनगर समाजासह ओबीसी वर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते-पाटील यांच्या विरोधात गुंडगिरी, दहशत माजविल्याचा आरोप करून त्यांच्यापासून माळशिरस तालुका भयमुक्त करण्याचे आक्रमक विधान केल्याने तसेच शरद पवार यांचे काही सहकारी फोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे माढ्याची लढत अधिक चुरशीची ठरली आहे. भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पुनःश्च संधी देताना विजयसिंह मोहिते-पाटील आणि रामराजे निंबाळकर आदी ज्येष्ठ नेत्यांचा कानोसा न घेता उलट उमेदवारीचा मुद्दा प्रतिष्ठेचा बनविला. त्यातूनच भाजपविरोधात मोहिते-पाटील यांनी मजबूत मोट बांधली. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी परिस्थितीचा नेमका अंदाज घेऊन मोहिते-पाटील कुटुंबीयांशी पूर्वी तुटलेले संबंध पुन्हा जुळविले आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे धैर्यशील यांची उमेदवारी पुढे आली. एव्हाना, मोहिते-पाटील विरोधी समविचारी आघाडीचे बबनराव शिंदे (माढा), त्यांचे बंधू संजय शिंदे (करमाळा), राम सातपुते (माळशिरस), शहाजीबापू पाटील (सांगोला), जयकुमार गोरे (माण-खटाव) आदी सर्व आमदारांनी रणजितसिंह निंबाळकर यांच्यामागे ताकद उभी केली. भाजपनेही याच मोहिते-पाटीलविरोधी समविचारी आघाडीवर विसंबून राहात राजकीय व्यूहरचना आखली. पक्षात भरतीही सुरू केली. परंतु त्याला प्रतिशह देण्यासाठी मोहिते-पाटील यांनी फलटणचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांच्यासह शेकापचे दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत आणि डॉ. बाबासाहेब देशमुख (सांगोला), नारायण पाटील (करमाळा), आमदार जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे, निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख (माण-खटाव) आदींची एकजूट साधली आहे. मोहिते-पाटील यांनी स्वतःच्या माळशिरस तालुक्यातील पारंपारिक विरोधक उत्तम जानकर यांच्याशी असलेले जुने वैमनस्य संपुष्टात आणत त्यांना जवळ केले आहे.

New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Ignoring voter growth led to Assembly elections defeat Vishal Patil admits
मतदार वाढीकडे केलेले दुर्लक्ष विधानसभा निवडणुकीत भोवले; विशाल पाटील यांची कबुली
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare
Bharatshet Gogawale : “एक दिवस तुमच्या सुसंस्कृतपणाचा पाढा…”, भरत गोगावलेंचा सुनील तटकरेंना थेट इशारा
Sharad Pawar, Ajit Pawar share stage at Baramati event
शरद पवार-अजित पवार पुन्हा एकाच व्यासपीठावर; ‘व्हीएसआय’च्या सर्वसाधारण सभेत उद्या उपस्थिती
supriya sule latest news
“असंविधानिक पदनिर्मितीत महाराष्ट्र सर्वांत पुढे”, खासदार सुप्रिया सुळे यांची टीका
loksatta editorial on devendra fadnavis
अग्रलेख : आजचे बालक; उद्याचे पालक!
Chandrakant Patil will be responsible for party expansion in Sangli
सांगलीत पक्ष विस्ताराची जबाबदारी चंद्रकांत पाटलांवर

हेही वाचा : पवन खेरा यांनी कर्नाटक लैंगिक शोषण प्रकरणावरून मोदींवर साधला निशाणा

माढा मतदारसंघात पाच वर्षांपूर्वी भाजपची ताकद नव्हती. मतदारसंघातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील आमदारांपैकी एकही आमदार भाजपचा नव्हता. राष्ट्रवादीचे प्राबल्य होते. स्वतः विजयसिंह मोहिते-पाटील २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असतानासुध्दा राष्ट्रवादीकडून माढ्यातून निवडून आले होते. मागील २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीतून थेट भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हाच भाजपला आधार मिळाला होता. मोहिते-पाटील यांनी ताकद पणाला लावून भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजाविली होती. स्वतःच्या माळशिरस विधानसभा निवडणुकीतही भाजपने शेवटच्या क्षणी संघ परिवारातील राम सातपुते यांच्या रूपाने लादलेला उमेदवारही मोहिते-पाटील यांनी निवडून दिला. त्या मोबदल्यात विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह यांची विधान परिषदेवर वर्णी लागली. त्यांच्या ताब्यातील साखर कारखान्याला १२५ कोटींचा वित्तीय पुरवठाही झाला. कृष्णा-भीमा स्थिरीकरण हा मोहिते-पाटील यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. त्यानुसार मोहिते-पाटील यांनीही पाठपुरावा सुरू केला असता दुसरीकडे यासंदर्भातील देवेंद्र फडणवीस यांच्या बैठका मात्र मोहिते-पाटील यांना डावलून रणजितसिंह निंबाळकर यांना सोबत घेऊन होऊ लागल्या. कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचे नावही हळूच बदलले गेले. या श्रेयवादाच्या राजकारणात मोहिते-पाटील दुखावले गेले.

हेही वाचा : एकमेव मुस्लीम खासदाराने सोडली एनडीएची साथ; डाव्या पक्षाच्या उमेदवाराला दिला पाठिंबा

या पार्श्वभूमीवर अखेर अपेक्षेनुसार धैर्यशील मोहिते-पाटील रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात शड्डू ठोकले आणि विजयाची गणिते जुळवून आणली असता भाजपच्या अडचणी वाढल्या. कालपर्यंत आदरणीय वाटणारे मोहिते-पाटील आता एका रात्रीत गद्दार, गुंड, दहशत माजविणारे वाटू लागले. स्वतः फडणवीस यांनीच अकलूजमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या सभेत मोहिते-पाटील यांच्या विरोधात तसा आक्रमक पवित्रा घेतला. मोहिते-पाटील घराण्यातील भाऊबंदकीतून विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांना भाजपने जवळ आहे. त्यामुळे माढ्यातील वातावरणात तणावही दिसतो. या लढाईत फडणवीस यांचा डाव पणाला लागत असताना शरद पवार आणि मोहिते-पाटील हे भाजपचे आव्हान कसे परतावून लावतात याचीही उत्सुकता आहे.

Story img Loader