राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यासाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणीही सुरू आहे. एकंदरितच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असताना दुसरीकडे मात्र महत्त्वाचे राजकीय नेते आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचे चित्र आहे. अद्यापपर्यंत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वाधिक नेत्यांचा पक्षप्रवेश झाला आहे.

एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजपा आणि शिंदे गटातील पाच नेत्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. गुरुवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धरमरावबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेश केला. यावेळी बोलताना भाग्यश्री आत्राम म्हणाल्या, की ज्या पद्धतीने त्यांच्या वडिलांनी शरद पवार यांचा पक्ष सोडून अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, तो त्यांना आवडलेला नाही. अजित पवार यांचा पक्ष जनतेला खोटी आश्वासनं देत आहेत.

LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
BJP prepares for election in Shinde group constituency in Khanapur politics news
खानापूरमध्ये शिंदे गटाच्या मतदारसंघात भाजपची कुरघोडी
Ajit Pawar Amol Kolhe
Amol Kolhe : अजित पवार म्हणाले, “आता आपणच साहेब”, अमोल कोल्हे प्रत्युत्तर देत म्हणाले, “राज्यात दोनच साहेब, एक शरद पवार, दुसरे…”
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
What Eknath Khadse Said About CD?
Eknath Khadse : एकनाथ खडसेंचा दावा, “मुलीशी चाळे करणाऱ्या भाजपा नेत्याची क्लिप…”
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
bjp bihar pattern in Maharashtra
‘बिहार पॅटर्न’ला बगल? संघ सक्रिय झाल्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह

हेही वाचा – रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराच्या मतदारसंघावर अजित पवार गटाचा डोळा

खरं तर या पक्षांतराला लोकसभा निवडणुकीपूर्वीच सुरुवात झाली होती. या वर्षांच्या सुरुवातीला म्हणजेच एप्रिल महिन्यात भाजपाने लोकसभेची उमेदवारी नाकारल्याने माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला होता. त्यांना शरद पवार गटाने माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या अखेरीस आमदार निलेश लंके यांनीही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांना अहमदनगर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली.

महत्त्वाचे म्हणजे, धर्यशील मोहिते पाटील आणि निलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीच महाविकास आघाडीला ४८ पैकी ३० जागांवर विजय मिळाला, तर महायुतीला केवळ १७ जागांवर विजय मिळवता आला. महायुतीच्या घटक पक्षांमध्ये भाजपाला ९, शिंदे गटाला ७ तर अजित पवार गटाला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला.

याशिवाय गेल्या जून महिन्यात माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी दहा वर्षानंतर भाजपाला सोडचिट्ठी देत पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर जुलै महिन्यात माजी राज्यमंत्री माधवराव किन्हाळकर यांनीही भाजपाची साथ सोडत शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हातात घेतली. पुढे १७ जुलै रोजी पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित गव्हाणे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देत शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा – कथोरेंना कोंडीत पकडण्याचे सर्वपक्षीय प्रयत्न ?

पुढे ४ सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे कोल्हापूर जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी ते कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तसेच काही दिवसांपूर्वीच जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतली. याशिवाय वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून प्रचाराची सुरुवात करणारे भाजपाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी यापूर्वीच राष्ट्रवादीच्या (एसपी) चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बापूसाहेब पठारे यांच्या पक्षप्रवेशाला दुजोरा दिला नसला, तरी आगामी काळात राज्यातील अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( शरद पवार गट ) प्रवेश करण्यास इच्छूक असून आम्ही त्यांची कामगिरी बघून त्यांना पक्षप्रवेश देऊ, असं ते म्हणाले.