मुंबई : विविध रिपब्लिकन गटांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला साथ देण्याचा निर्णय घेतल आहे. या गटांच्या ‘रिपब्लिकन एकता आघाडी’ची बैठक साहित्यिक अर्जुन डांगळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आझाद मैदानात झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : मनसुख हिरेनच्या हत्येची कल्पना फडणवीसांना होती! अनिल देशमुख यांचे प्रत्युत्तर

भाजपला राज्यातील सत्तेपेक्षा राज्यसभेतील बहुमत महत्वाचे आहे. संविधान बदलण्याचा भाजपचा प्रयत्न कायम आहे. विधानसभेला दलितांची मतविभागणी करण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. त्यामुळे बौद्ध समाजाने राज्यात सत्तांतर घडवण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे, असे अशी भूमिका या बैठकीत मांडण्यात आली. मविआतील तीन पक्षांशी संवाद, संपर्क राखण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली. या समितीमध्ये सुरेश केदारे ( दलित पँथर), मिलिंद सुर्वे ( पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र), भाऊ निरभवणे (रिपब्लिकन पक्ष – खोब्रागडे), सागर संसारे ( स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष) रवी गरुड (दलित सेना ), मनोज बागुल ( रिपब्लिकन जनशक्ती), प्रकाश हिवाळे ( लोक मोर्चा), सतीश डोंगरे ( आंबेडकरवादी भारत मिशन), बंधुराज लोणे ( ज्येष्ठ पत्रकार) यांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In maharashtra vidhan sabha election republican groups decided to support mahavikas aghadi print politics news css