नागपूर : रामटेक विधानसभा मतदारसंघाच्या जागेबाबतचा तिढा महाविकास आघाडीत सुटला नसल्याने ही जागा शिवसेनेला (ठाकरे) सुटणार की काँग्रेसचे प्रयत्न फळाला येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र रामटेकच्या जागेवरून महाभारत रंगणार अशीच चिन्हे दिसू लागली आहे. रामटेकच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेत रस्सीखेच अजूनही सुरू आहे. या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. गेल्या दहा वर्षांपासून येथे काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र मुळक तयारी करीत आहेत. मात्र शिवसेनेचा रामटेकचा आग्रह अधिक आहे. ते रामटेकसाठी अडून बसले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुपारपर्यंत काँग्रेस-शिवसेनेत या जागेवरचा वाद मिटला नव्हता. ही जागा सेनेला सुटल्यास मुळक कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, मात्र आपण काँग्रेसनिष्ठ आहोत, कुठल्याही पक्षात जाणार नाही, अशी भूमिका मुळक यांची आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत सध्या रामटेकवरून महाभारत सुरू आहे.
हेही वाचा : घराणेशाही आणि बाहेरून आलेल्यांचे लाड होत असल्याने भाजप निष्ठावंतांमध्ये असंतोष
शिंदे सेनेची कसोटी
शिवसेनेने (शिंदे) आशिष जयस्वाल यांना उमेदवारी दिली आहे. परंतु यासोबतच जयस्वाल यांना पक्षातील त्यांच्या समर्थकांचे आणि भाजपमधील एका नाराज गटाचे आव्हान पेलावे लागणार आहे. मागील निवडणुकीत युती विरुद्ध आघाडी अशी लढत झाली होती. भाजप आणि काँग्रेसच्या लढाईत अपक्ष उमेदवाराने बाजी मारली होती. काँग्रेसला ३२ हजार ४९७ मते मिळाली होती आणि भाजपला ४३ हजार ६ मते मिळाली होती. तर शिवसेनेचे बंडखोर आशिष जयस्वाल हे ६७ हजार ४१९ मते घेऊन विजयी झाले होते. तर प्रहार जनशक्ती पक्षाला तब्बल २४ हजार ७३५ मते मिळाली होती. भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांचा गट जयस्वाल यांच्यावर नाराज आहे. त्यांना भाजपने पक्षातून निलंबित केले आहे. तर आमदार आशीष जयस्वाल यांचे खंदे समर्थक नरेश धोपटे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. नरेश धोपटे तीन वेळा जिल्हा परिषद सदस्य होते. दोन वेळा त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य होत्या. ते सध्या जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहे. रेड्डी आणि धोपटे यांनी उघडपणे जयस्वाल यांना आव्हान दिले आहे. त्यामुळे जयस्वाल यांची कसोटी लागणार आहे.