छत्रपती संभाजीनगर : गोपीनाथ मुंडे असेपर्यंत ‘तडजोडी’चा रेणापूर मतदारसंघाचे नाव परळी झाले. पुढे पंकजा व धनंजय मुंडे या बहीण – भावाच्या राजकारणामुळे परळी प्रतिष्ठेचा मतदारसंघ बनला. या वेळी परळी विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी होताना धनंजय मुंडे यांच्या विरोधातील उमेदवाराचा चेहरा कोणाचाही असला तरी त्याचे डाव मात्र शरद पवारच टाकतील, अशी भावना परळी मतदारसंघात सर्वत्र आहे.

केवळ परळीच नाही तर मराठवाड्यातील सहा मतदारसंघात विरोधात कोणी नसेल तर शरद पवारच समोर आहेत, असे गृहीत धरुन पुढे जावे लागणार असल्याची मानसिकता मराठवाड्यात राष्ट्रवादीत फुट पडलेल्या सहा मतदारसंघांमध्ये आहे. यामध्ये प्रामुख्याने परळी, माजलगाव, आष्टी, अहदमपूर, उदगीर, वसमत या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. याच मानसिकतेमध्ये तुळजापूर मतदारसंघाचाही समावेश आहे.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
navneet rana and balwant wankhede
Navneet Rana : “मी राजीनामा देतो, पण…”, नवनीत राणांना खासदार बळवंत वानखेडेंचं प्रतिआव्हान!
ravi rana resign
अमरावती : नवनीत राणा म्‍हणतात, “…तर रवी राणा देखील राजीनामा देतील”

हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : गडचिरोलीत राजकीय पक्षांपुढे बंडखोरी रोखण्याचे आव्हान?

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुसरी फूट पाडण्यात भाजपाला यश आले. तेव्हा २०१९ मध्ये राष्ट्रवादीकडून निवडून आलेल्या मराठवाड्यातील आठ आमदारांपैकी बीडचे संदीप क्षीरसागर आणि घनसावंगीचे आमदार राजेश टोपे हे दोघेच शरद पवार यांच्या बरोबर राहिले. उर्वरित म्हणजे मंत्री धनंजय मुंडे, मंत्री संजय बनसोडे. आमदार प्रकाश साेळंके, बाळासाहेब आसबे, बाबासाहेब पाटील आणि राजू नवघरे या आमदारांनी अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारले. याशिवाय शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे हेही अजित पवार हेच आमचे नेते आहेत असे म्हणत महायुतीमध्ये राहिले. त्यांनी अगदी संघ स्वयंसेवकांच्या कार्यक्रमांनाही आवर्जून हजेरी लावली. यामध्ये पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मात्र अलिकडेच बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. मराठवाड्यातील या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होईल असे गृहीत धरले जात आहे. त्यामुळे आता उमेदवार कोण याची चाचपणी सुरू असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीमध्ये सहभागी असणाऱ्या सहा आमदारांना आता विरोधातील डाव शरद पवार टाकतील, याची धास्ती असल्याची चर्चा या सहा मतदारसंघात आहे.

परळीची जागा अधिक प्रतिष्ठेची असेल असे चित्र आहे. राजकीय पटावर अजित पवार यांनी पहिल्यांदा भाजपबरोबर जात शपथ घेतली होती तेव्हा काही तास गायब असणारे नाव धनंजय मुंडे यांचे होते. या शपथविधीनंतर ‘मी झोपलो होतो, मला काय झाले काहीच माहीत नाही, ’ असा खुलासा धनंजय मुंडे यांनी केला होता. पुढे ते समाजकल्याण मंत्री म्हणून कायम राहिले. पुढे राष्ट्रवादीमध्ये दुसरी फूट पडली तेव्हा धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारले. पुढे ते कृषिमंत्री झाले. या कालावधीत पडद्यामागच्या काही हालचालीमध्ये धनंजय मुंडे ‘अग्रेसर’ होते, अशी चर्चा राजकीय पटलावर होती. त्यामुळे परळीतील उमेदवारांची निवड शरद पवार करतील. त्यामुळे परळीची निवडणूक पुन्हा एकदा चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – अपक्ष आमदार किशोर जोरगेवार तुतारी फुंकणार? पवार गटाकडून चंद्रपुरातून निवडणूक लढण्याचे संकेत

चर्चेतील परळी

२००९ पर्यंत परळी हा मतदारसंघ नव्हताच. रेणापूर गोपीनाथ मुंडे यांचा मतदारसंघ. तो लातूरशी जोडलेला. तेव्हा गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांचे राजकीय मैत्र सर्व परिचित होते. त्यामुळे रेणापूर व परिसिमन आयोगाच्या शिफारशीने मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर परळी मतदारसंघ अस्तित्वात आला. तेव्हा चौसाळा हा मतदारसंघ बाद झालाच. पण गोपीनाथ मुंडे यांची परळी राजकारणात सतत चर्चेत होती. २००९ मध्ये पंकजा मुंडे पहिल्यांदा निवडून आल्या. तेव्हा त्यांना ९६ हजार २२२ मते मिळाली होती. पुढे २०१४ पासून परळीमध्ये पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्यामध्ये लढत झाली. पंकजा मुंडे विजयी झाल्या. २०१९ मध्ये धनंजय मुंडे विजयी झाले. तेव्हापासून भाजपमधील सुंदोपसुंदी पुढे येऊ लागली. आता राष्ट्रवादीचा अजित पवार यांचा गट महायुतीमध्ये आहे. पंकजा मुंडे विधान परिषदेच्या आमदार आहेत. या वेळी परळीतून ‘कमळ’ चिन्ह नसेल. मात्र, तरीही ही निवडणूक प्रतिष्ठेची होईल असे मानले जात आहे.

आरक्षण रिंगण विस्तारणारा मतदारसंघ

परळी मतदारसंघातील प्रचाराचा मुद्दा आरक्षण प्रश्नाभोवती फिरला तर त्याचे परिणाम मराठवाड्यातील अन्य मतदारसंघात होऊ शकतात. त्यामुळे या मतदारसंघात ओबीसी एकत्रिकरणाचा प्रयोग जेवढा तीव्रतेने होईल त्याचे परिणाम अन्य मतदारसंघात होऊ शकतात, असे मानले जात आहे.

Story img Loader