भाजपच्या ९९ उमेदवारांच्या पहिल्या यादीत मुंबईतील तीन विद्यमान आमदारांची उमेदवारी जाहीर झालेली नसल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ११ विद्यमान आमदारांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे.

भाजपच्या यादीत मुंबईतील १२ जणांचा समावेश आहे. यापैकी एक वगळता सर्व विद्यमान आमदार आहेत. पक्षाच्या पहिल्या यादीत सुनील राणे (बोरिवली), भारती लव्हेकर (वर्सोवा) आणि पराग शहा (घाटकोपर पूर्व) या तीन विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. यामुळे या तिन्ही आमदारांना पुन्हा संधी मिळण्यााबत साशंकता व्यक्त केली जाते.

Vanchit Bahujan Aghadi, Bahujan Samaj Party,
आंबेडकरी पक्षांच्या उमेदवारांचा वेलू गगनावरी !
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
vikas kumbhare
भाजप आमदाराचा थेट काँग्रेस उमेदवाराला आशीर्वाद… मध्य नागपूरात…
warora assembly constituency
वरोऱ्यात सर्वच उमेदवार नवखे, अभूतपूर्व रणधुमाळीत कोण बाजी मारणार ?
pm modi rally Kharghar
खारघर मोदीमय! भाजपचे हजारो कार्यकर्ते खारघरमध्ये दाखल
Bunty Shelke arrived with a fogging machine due to the increase in mosquitoes nagpur news
नागपुरात डासांचा उद्रेक…अन् काँग्रेस उमेदवार प्रचार सोडून फाॅगिंग…
Mallikarjun Kharge criticize BJP in nagpur
“बाटना और काटना हे भाजपचे काम” मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
Four candidates from Nashik absent from PM Narendra Modis meeting
मोदी यांच्या सभेस चार उमेदवार अनुपस्थित; देवळालीतील सरोज अहिरे व्यासपीठावर, शिंदे गटाच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह

आणखी वाचा-भाजपच्या पहिल्या यादीत, फडणवीस, बावनकुळे; सावरकरांना डच्चू, खोपडे, मेघे, मतेंना पुन्हा संधी

मनीषा चौधरी (दहिसर), मिहिर कोटेचा (मुलुंड), अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), योगेश सागर (चारकोप), विद्या ठाकूर (गोरेगाव), अमित साटम (अंधेरी पश्चिम), पराग आळवणी (विलेपार्ले), राम कदम (घाटकोपर पश्चिम), आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), तामिळ सेल्वन (सायन कोळीवाडा), कालिदास कोळंबकर (वडाळा) या ११ विद्यमान आमदारांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. याशिवाय मालाड पश्चिम मतदारसंघातून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मिहिर कोटेचा यांचा लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघात पराभव झाला होता. मुलुंडमध्ये उमेदवारीसाठी अनेक इच्छूक होते. पण पक्षाने कोटेचा यांनाच पुन्हा संधी दिली आहे. सायन-कोळीवाडा मतदारसंघात सरकार सारे ‘लाड’ पुरविणाऱ्या प्रसाद लाड यांना उमेदवारी हवी होती. पक्षाने विद्यमान आमदार सेल्वन यांच्यावरच पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे.

आणखी वाचा-१२० मतदारसंघांत ‘मराठा शक्ती’च्या जरांगे प्रयोगाचा महाविकास आघाडीला फटका?

बोरिवली मतदारसंघात गेल्या निवडणुकीत विनोद तावडे यांना उमेदवारी नाकारून सुनील राणे यांना पक्षाने संधी दिली होती. या वेळी राणे यांना फेर उमेदवारीची शक्यता कमी आहे. माजी खासदार गोपाळ शेट्टी यांचा आग्रह आहे. घाटकोपर पूर्व मतदारसंघात मावळत्या १४व्या विधानसभेतील सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा यांच्या उमेदवारीबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माजी मंत्री प्रकाश मेहता यांनी टोकाची भूमिका घेतल्याने पक्षाने सावध भूमिका घेतली आहे. वर्सोवा मतदारसंघातून विद्यमान आमदार भारती लव्हेकर यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे पक्षात सांगण्यात येते.