मुनगंटीवार सातव्यांदा, भांगडिया तिसऱ्यांदा रिंगणात; राजुरा, चंद्रपूर, ब्रह्मपुरी व वरोरातील उमेदवाराची प्रतीक्षा

भाजपच्या पहिल्याच यादीत बल्लारपूर मतदारसंघातून वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार तर चिमूरमधून आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

in nagpur BJP nominates Sudhir Mungantiwar from Ballarpur and Kirti Kumar Bhangdia from Chimur
मुनगंटीवार सातव्यांदा तर भांगडिया तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. (लोकसत्ता ग्राफिक्स)

चंद्रपूर : भाजपच्या पहिल्याच यादीत बल्लारपूर मतदारसंघातून वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार तर चिमूरमधून आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मुनगंटीवार सातव्यांदा तर भांगडिया तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

मुनगंटीवार यांनी सलग सहावेळा ३० हजारांपेक्षा अधिक मतांची आघाडी घेत विजय संपादन केला. मात्र १९८९, १९९१ व २०२४ अशा तीन लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामनादेखील केला आहे. चिमूरमधून उमेदवारी जाहीर झालेले भांगडिया यांनीही २०१४ व २०१९ अशा सलग दोन निवडणुका जिंकलेल्या आहेत.भाजपने पहिल्या यादीत चंद्रपूर, वरोरा, ब्रह्मपुरी व राजुरा या चार मतदारसंघांतील उमेदवार जाहीर केलेले नाही. चंद्रपुरात अपक्ष आमदार किशोर जोरगेवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याची शक्यता आहे. यासोबतच ते भाजप पक्षश्रेष्ठींच्याही संपर्कात आहेत. त्यांच्या निर्णयानंतरच चंद्रपूरचा उमेदवार जाहीर केला जाईल, असे बोलले जात आहे.

हे ही वाचा…ठाणे मतदारसंघ भाजपकडे कायम राहिल्याने शिंदे गटात अस्वस्थता

राजुरा येथे मुनगंटीवार समर्थक देवराव भोंगळे यांच्यासह माजी आमदार ॲड. संजय धोटे व माजी आमदार सुदर्शन निमकर, असे तीन दावेदार आहेत. त्यामुळे राजुराचा निर्णय प्रलंबित आहे. वरोरा व ब्रह्मपुरी या दोन मतदारसंघांवर शिंदे शिवसेनेने दावा केला आहे. मात्र, हे मतदारसंघ शिंदे गटाला सोडू नये, अशी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. या जागांचा तिढा सुटल्यानंतरच येथील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाईल, असे सांगितले जाते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In nagpur bjp nominates sudhir mungantiwar from ballarpur and kirti kumar bhangdia from chimur print politics news sud 02

First published on: 21-10-2024 at 13:48 IST
Show comments