नागपूर : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने कामकाजाला सुरूवात केल्यावर पहिल्या १०० दिवसात काय करायचे याचा कार्यक्रम निश्चित केला व त्यानुसार कामाला सुरूवात केली. याच निमित्ताने विविध खात्यांच्या मंत्र्यांचे नागपुरात दौरे सुरू झाले. आठ दिवसात पाच मंत्री भेट देऊन गेले. त्यांनी घेतलेल्या आढावा बैठकांचे स्वरुप लक्षात घेता तो आढावा होता की निव्वळ औपचारिकता ? असा प्रश्न निर्माण होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर हे राज्याची उपराजधानी शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा गृहजिल्हा असल्याने कार्यक्रम सरकारचा असो ,किंवा संघटनेचा. त्यांची सुरूवात नागपूरपासून केली जाते. फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्व विभागाची एक बैठक घेऊन सरकारचा १०० दिवसाचा कार्यक्रम निश्चिति केला. कोणत्या विभागाने कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचे असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे. त्यादृष्टीने प्रत्येक मंत्र्याची व त्यांच्या विभागाच्या वाटचाल सुरू आहे. याच निमित्ताने मागील सात दिवसात नागपूरमध्ये पाच मंत्र्यांनी भेटी दिल्या. त्यात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, मत्स व्यवसाय मंत्री नितेश राणे, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचा समावेश आहे. महसूल मंत्रीचंद्रशेखर बावनकुळे यांचे दौरे होतच आहे कारण ते नागपूरचे पालकमंत्री आहेत. कधी-कधी तर एका दिवसी दौन-दोन मंत्र्यांचे दौरे नागपुरात झाले या सर्व मंत्र्यांनी त्यांच्या-त्याच्या विभागाच्या बैठका घेतल्या. बैठकीत अधिकाऱ्याकडून आकडेवारी सादर केली. त्यावर , मंत्र्याकडून ‘ कामांना गती द्या, अंमलबजावणीतील अडचणी दूर करा, असे ठरावीक साचेबद्ध आदेश अधिकाऱ्यांना दिले. यातून काय साध्य होते हाच खरा प्रश्न आहे. मंत्र्याच्या दौऱ्यानिमित्त संबंधित विभागाची यंत्रणा तर्त्पर राहते, मंत्री गेले की पुन्हा जैसेथे. त्यामुळे शासनाच्या १०० दिवसाच्या कार्यक्रमांचा खरच आढावा घेतला जातो की केवळऔपचारिकता पूर्ण केली जाते, असा प्रश्न पडतो. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी जिल्हा आराड्याच्या नियोजनाची सर्व जिल्ह्यांची बैठक मुंबईतून ऑनलाईन घेतली. वरील बैठकाही तशा घेतल्या जाऊ शकल्या असत्या. हे येथे उल्लेनीय.

मस्यव्यवसाय मंत्री नारायण राणे यांचा शुक्रवारी नागपूर दौरा झाला. त्यांनी आढावा बैठक घेऊन विदर्भात मत्सव्यवसायाला वाव आहे, असे सांगितले. पण ही बाब सर्वाणा ठाऊक आहे, ह सांगण्यासाठी राणेंची गरज नाही, मत्सव्यवसायाला विदर्भात वाव असूनही तो वाढत का नाही हा प्रश्न आहे व तो सोडवण्यासाठी मंत्री म्हणून राणे काय करणार हे सांगणे अपेक्षित आहे. पण बैठका घेऊन , सूचना देऊन मंत्री रवाना झाले. अशीच बाब ग्रामविकास व पचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या दौऱ्याची आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेऊन त्यांनी औपचारिकता पूर्ण केली. त्यांच्या खात्याअंतर्गत येत असलेल्या घरकुल बांधणीचे अनेक गावांचे ,जिल्ह्यांचे उदिष्ट पूर्ण झाले नाही, त्यात काय अडचणी आहे, सरकारकडून वेळेत निधी का मिळत नाही अशा अनेक समस्या आहेत. पण कामाला गती द्या, ऐवढे सांगून मंत्र्यांनी बैठक आटोपली.

मात्र याला काही काही अपवाद यालाही आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा दौरा. त्यांनी नागपुरात येऊन विभागीय आयुक्तांच्या दालनात बसून बैठक न घेता गावात जाऊन शाळांची पाहणी केली. काही शाळांना आकस्मिकभेटी दिल्या. यातून शिक्षण विभागाच्या योजनांची अंमलबजावणी कशी होते याची त्यांना कल्पना आली. आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी थेट मुलांच्या शाळेत जाऊन त्यांच्याशी संवाद साधला.