लातूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या दोन पुत्रास लातूर शहर व लातूर ग्रामीण या दोन विधानसभा मतदारसंघातून २०१९ व २०२४ असे सलग दोन वेळा उमेदवारी देण्यात आली. मात्र, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र व प्रदेशचे जेष्ठ कार्यकर्ते अशोक पाटील निलंगेकर यांची उमेदवारी मात्र नाकारण्यात आली आहे .

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेस मधील या दुजाभावाबद्दल निलंगेकर समर्थकांत असंतोष व्यक्त होत आहे. विलासराव देशमुख यांच्यापेक्षा शिवाजीराव पाटील निलंगेकर हे जेष्ठ ,त्यांनी काँग्रेस पक्षासाठी अतिशय निष्ठेने काम केले, विलासराव देशमुखांच्या नंतर त्यांचे दोन्ही चिरंजीव राजकारणात सक्रिय आहेत. काँग्रेसने दोघांनाही सलग दोन वेळा विधानसभेत संधी दिली आहे .शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अशोक पाटील निलंगेकर यांनी यावेळी निलंगा विधानसभा मतदारसंघाकडून उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. मराठवाड्याचे नेतृत्व अमित देशमुख यांच्याकडे नुकतेच आले आहे, त्यांनी तातडीने निलंगेकरांचा पत्ता कट करण्यात यश मिळवले आहे, असे मानले जाते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nanded district dissatisfaction in congress about one justice for deshmukh and another for nilangekar family print politics news asj